नियमित कामजीवनाचे महत्व आणि फायदे जाणून घ्या!
सोनाली जे.
आपल्याला जशी भूक लागते , तहान लागते, झोप येते, तशीच कामजीवन ही आपली basic need आहे असे Freud हे प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ यांनी मांडले आहे. प्रत्येकाची भूक सारखी असते का ? नाही ना? काही जण एका वेळी थोडे खातात आणि त्यातून त्यांना समाधान मिळते. तर काही एका वेळी खूप खाणारे असतात आणि मग पोट भरले की मनाचे ही समाधान मानणारे असतात. तर काही वेळा असेही असतात एकावेळी थोडे थोडे खाणारे पण दिवसभरात पाच सहा वेळा खाणारे. तर काही दिवसभरात दोन वेळा च खाणारे.
आता हे का असे ? तर प्रत्येकाच्या गरजा , आवडी निवडी नुसार, खाण्याच्या क्षमतेनुसार त्यांची ही भूक भागविण्याची पद्धत असते .
तसेच सेक्स ही एक माणसाची गरजच आहे. आता बरेचदा सल्ला घेण्याकरिता येणारे लोक हेच विचारतात की नियमित काम जीवनाची गरज आहे का? त्याचे महत्त्व आपल्या आयुष्यात आहे का ?आणि त्याचे फायदे काय आहेत ?
कामजीवन ही मानवी च काय पण प्राणी आणि पशूंची ही गरज आहे.
नियमित काम जीवनाची गरज काय ? या महत्व काय ? प्रश्नांचे उत्तर हे तुमच्याकडेच आहे खरे तर. जसे की तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला याची किती आवड आहे , दोघांच्या ही गरजा किती आहेत. हे वैयक्तिक असते. प्रत्येकाची गरज , आवड निवड ही वर सांगितल्याप्रमाणे जशी भुकेची तशीच लैंगिक संबंधाची. एखाद्याची गरज रोजची असेल, एखाद्याची दिवसातून दोन वेळा असेल , कधी आठवडा , पंधरा दिवस .हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्या जोडीदाराच्या आवडी निवडी वर , साथ देण्यावर आहे. म्हणून एकमेकांना समजून घ्या. त्यांच्या गरजा लक्षात घ्या.
काही वेळेस एकाला खूप आवड असते , आणि त्यांना ती गरज पूर्ण करायची इच्छा ही असते परंतु जोडीदार जर निरुसाही असेल, किंवा जोडीदार जर तेवढी सततची साथ देत नसेल तर औदासीन्य येते, निराशा येते. आणि तुमच्या इंच्छांचे दमन , तुमच्या इच्छा दाबून ठेवाव्या लागतात.
तर काही वेळेस स्त्री जोडीदाराची साथ नसेल तर किंवा तिला आवड नसेल , तिच्या लैंगिक गरज या मर्यादित असतील अशा वेळी पुरुषाची गरज जास्त असेल तर मग कधी पुरुष त्या पूर्ण करण्याकरिता पॉर्न व्हिडिओज बघेल , हस्तमैथुन यातून गरज पूर्ण करेल. परंतु गरज पूर्ण करणे ही गोष्ट वेगळी आणि जसे खाताना वाढलेल्या ताटात विविधता असतें चटणी, कोशिंबीर , लिंबाची फोड, लोणचे , पापड , कुरडई, भाजी , आमटी , वरणभात , पोळी कधी मसाले भात , तर कधी पुरणपोळी, दहीभात ..अशा विविधता निर्माण केली तर खाण्याची आवड ही वाढते. आणि पोटभर खावून तृप्तीचा ढेकर म्हणजेच समाधान, तृप्तता ही वाढते.
तसेच आहे जेव्हा जोडीदार एकमेकांना समजून घेवून, आवडत्या गोष्टी करून , एकमेकांची मने जाणून , भावना जाणून , गरजा जाणून लैंगिक संबंध प्रस्थापित करतात तेव्हा त्यांचं कामजीवन मन आणि शरीर , भावना या सर्व बाबतीत एकरूप होतात आणि त्यातून सगळे मानसिक ताण तणाव विसरून जावून आनंद आणि सुखाच्या परमोच्च बिंदूवर पोहचताना आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आहे , आपल्याला सुरक्षितता मग शारीरिक असेल, भावनिक असेल देणारी आपली व्यक्ती आहे. यातून सगळे दुःख , राग , चिडचिड , तणाव यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होवून आनंद , उत्साह , सुख , समाधान , शांतता तृप्तता देते.
कामाच्या ठिकाणी , व्यवसायात , दैनंदिन कामात येणारा तणाव , चिंता , भीती , त्रास कमी करण्याकरिता रिलॅक्स होण्याकरिता आणि परत उत्साहाने काम करण्याकरिता नियमित कामजीवन / सेक्स मदत च करते.
स्त्रियांमध्ये फायदे :
लग्नापूर्वी स्त्रियांमध्ये मासिक पाळी संबंधी , हार्मोन्स संबंधी अनेक समस्या असतात. काही वेळेस ovaries चे प्रॉब्लेम्स असतात. अशा वेळी लग्नानंतर जोडीदारासोबत चे नियमित होणारे संबंध, कामजीवन स्त्रियांच्या या समस्या कमी करत असतात.
Harmonal imbalance मुळे होणारे प्रॉब्लेम्स , यातून होणारी विनाकारण ची चिडचिड , अस्वस्थता या सर्व समस्या कमी करण्याकरिता योग्य आणि नियमित कामजीवन मदतच करतात. आणि त्यातून शांतता , अस्वस्थता कमी होते.
पुरुष आणि स्त्री या दोघांच्या करिता फायदे शिर :
नियमित कामजीवन / लैंगिक समाधान मिळविणाऱ्या जोडप्या मध्ये ,satisfaction ही जास्त असते. आणि त्यांचे आयुष्य ही जास्त असते. असे scientific study मध्ये आढळून आले आहे.
याउलट ज्यांच्यात नियमित कामजीवन नाही ,ज्यांच्यात सेक्स कमी प्रमाणात आहे , त्यांच्यात satisfaction कमी , आणि हृदयविकार , हायपर टेन्शन , डायबिटीस , स्ट्रेस , anxiety यांचे प्रमाण जास्त आढळून असते असे आढळून आले आहे.जे नियमित सेक्स करतात त्यांच्यात हे प्रमाण कमी आढळून आले आहे.
दोघांनी ठरविले की आपण जसे आपले शरीर आणि मन स्वास्थ्य ठेवण्याकरिता जसे योगा, प्राणायाम , व्यायाम करतो तसे दोघा जोडीदारानी एकमेकांच्या गरजा लक्षात घेवून, एकमेकांच्या संमतीने , पुढाकाराने नियमित व्यायाम करतो तसे नियमित सेक्स केले तर healthy आणि आनंदी लाईफ जगू शकता.
याशिवाय अजून एका scientific study मध्ये असेही लक्षात आले आहे की जे नियमित कामजीवन / सेक्स करतात त्यांचे आयुष्य उत्साही , काही तरी नावीन्य शोधण्यात जास्त असते आणि ते creativity वाढवितात. याखेरीज आयुष्यात , बिझनेस मध्ये , नोकरी मध्ये जे उच्च पदावर आहेत, यशस्वी आहेत त्या मागे त्यांचे असणारे समाधानी , सुखी आणि नियमित असणारे कामजीवन आहे.
तुमचे मन , शरीर शांत होवून तुम्हाला नवीन energy देण्याचे काम नियमित कामजीवन / सेक्स देत असते.
ओशो यांनी सेक्स हा मोक्ष प्राप्ती करिता योग्य मार्ग सांगितले आहे. या नियमित कामजीवनातून तुम्हाला तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करता येतात.नाही तर सतत काही तरी अपूर्ण आहे असे वाटत राहते. आणि ही अपूर्णता तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्ती किंवा तुमच्या अंतिम ध्येयात त्रासदायक ठरत असते. अडथळा आणत असते.
याखेरीज आपल्या कडची आहे ती ऊर्जा खर्च केली तर नवीन ऊर्जा मिळेल. त्या करिता नियमित कामजीवन हाच उपाय आहे.
बरेचदा कामजीवन नाही मिळाले योग्य मार्गाने ,, ती इच्छा अपुरी राहिली तरी मन अस्वस्थ होते आणि त्यातून च लैंगिक अत्याचार याचे प्रमाण वाढते. यावर आळा घालायचा असेल तर आपल्या जोडीदाराने एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आणि नियमित सेक्स केले पाहिजे.
जेवढ्या नियमितपणे , मोकळेपणाने , मुक्तपणे , एकमेकांच्या गरजा समजून जोडीदार नियमित कामजीवन / सेक्स मध्ये एकत्र येतील तेवढे जास्त सुख , आनंद आणि यशस्वी , उत्साही होण्याकरिता , concentration करण्याकरिता मदत करते. Focus करण्याकरिता , ध्येय पूर्ती मध्ये आणि इच्छित साध्य प्राप्त करण्याकरिता जीवन जगण्यास मदत करते.
आयुष्य सुंदर आहे .अजून सुंदर आणि परिपूर्ण करण्याकरिता आपल्याला उत्साही ठेवणारे नियमित काम जीवनाचे महत्व लक्षात घ्या आणि त्याचा फायदा करून घेवून आयुष्य सर्वार्थाने यशस्वी करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



उत्तम माहिती. आभार
सर/मॅडम
नमस्कार मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या ब्लॉग वाचतो. आपण प्रत्यक्ष जीवनात येणाऱ्या अडचणी वर कशी मात करावी या बाबतचे आपले लेख खूप मार्गदर्शक ठरतात.
आणि आमचा जीवनातील नैराश्य दूर होण्यास मदत होते. त्या करिता आपले मनःपूर्वक आभार.