उत्तम वैवाहिक जीवन असलं तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार येत नसेल का?
सोनाली जे
हा सुद्धा तसा वरवर दिसणारा पण सखोल विषय आहे.
उत्तम वैवाहिक जीवन हे काही वेळेस इतरांना भासत असते. कारण सगळेच गोड गोड दिसत असते. प्रगती , यश , स्थैर्य , मानसिक स्थैर्य , गाडी , मोठा फ्लॅट , घरात असलेल्या विविध वस्तू, बंगला, सोने , नाणे मुले , बाळे हे बघून वरकरणी लोकांना वाटत असते की यांचे वैवाहिक जीवन उत्तम आहे. पण बरेचदा असे होते की ” दिसते तसे नसते म्हणून तर जग फसते.”
याउलट खरेच एखाद्याचे उत्तम वैवाहिक जीवन असते. म्हणजे नेमके काय पती पत्नी यांची दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असतील तरी एकमेकांच्या आवडी निवडी समजून घेवून , विचार सरणी , स्वभाव , भिन्न व्यक्तिमत्त्व याचा स्वीकार करून एकमेकांना समजून घेवून कौटुंबिक समाधान , शांती मिळविणे , आपली आणि कुटुंबाची प्रगती होण्याकरिता प्रयत्न करणे , शिक्षण , तंत्रज्ञान असेल शिकणे आपल्या पुढील पिढीला शिकविणे हे ही कर्तव्य च. शिवाय कुटुंबाच्या गरजा समजून घेवून एकत्रितरित्या पूर्ण करणे. जसे घर ही सेफ्टी need पूर्ण करणे , आर्थिक स्थैर्य , बचत ही भावी काळासाठी उपाययोजना ,
या शिवाय एकमेकांना वेळ देणे , वाद असतील तरी ते सोडून एकमेकांना समजून घेणे , माफ करणे , प्रेमाने आणि आनंदाने राहणे , एकमेकांना भावनिक , मानसिक आधार देणे , जोडीदार आणि त्याच्या / तिच्या शारीरिक गरजा समजून घेवून तशी उत्तम साथ देणे. स्वतः आनंद घेणे आणि देणे ही. समाधानी आणि सुखी असणे.
उत्तम वैवाहिक जीवन असेल तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार येत नसेल का ?
तसे म्हणले तर विवाह झाला म्हणून भिन्न लिंगी आकर्षण कमी होत नाहीच ना.. अर्थात स्त्रियां मध्ये मर्यादा , संस्कार. आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा यामुळे फारसे प्रमाण स्त्रियांचे विवाहानंतर कोणाविषयी विचार करण्याकडे दिसत नाही.
पुरुष हा सुधा संस्कार , विचार याने मर्यादाशील असेल, मानसिक आणि शारीरिक , वैचारिक दृष्ट्या आपला आताचा जोडीदार आहे तसा योग्य आहे , जे आहे तेच पुरेसे , त्यातच गोडवा आहे असे समजून किंवा हेच उत्तम मानणारे ही पुरुष आहेत त्यांना बाहेरची कोणतीच आकर्षणे त्याला विचलित करू शकत नसतील , स्वतः चा तोल ढळू देत नसेल. किंवा क्षणिक मोह याचे आकर्षण होवून ही मनावरचा कंट्रोल त्याला नक्कीच विवाहबाह्य संबंध याची कल्पना, विचार किंवा कृती यापासून दूर च ठेवत असतो .
तरीही आजची बदलती परिस्थिती , आयुष्यभर मन मारून जगणे , आहे त्याचा स्वीकार करणे , आपल्या इच्छा पूर्ती करणे , सिनेमा , सोशल मीडिया यांचा वाढता प्रभाव , पॉर्न व्हिडिओज, स्त्री पुरुष यांच्या मध्ये आलेला मोकळेपणा यामुळे बरेचदा पुरुष असेल किंवा स्त्री वैवाहिक जीवन उत्तम असेल तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार काही प्रमाणात येत असेलच.
मानवी वृत्ती च अशी आहे की अजून काही तरी राहिले , अजून काही तरी चांगले मिळेल , वेगळे काही तरी करायचे आहे , नावीन्य पाहिजे यातून उत्तम वैवाहिक जीवन असेल तरी काही तरी नवीन करण्याकरिता , आकर्षण असेल ,सोशल मीडिया , मित्र मैत्रिणी , सहकारी यांच्या विचारांचा प्रभाव , त्यांनी जर तसे केले असेल तर आपण ही करू या किंवा मित्र मैत्रिणीचे force ही असे वेगळे विचार करण्यास कारणीभूत ठरतात.
जसे आपण अगदी latest Mobile घेतला तो तेव्हा खूप आवडतो , त्यात आपल्याला खूप आनंद ही मिळाला पण लगेचच दुसरा नवीन त्यापेक्षा advanced mobile Che model आले तर साहजिकच आपले मन हळहळत. आणि त्या नवीन मोबाईल मॉडेल ..version कडे आकर्षित होते .
पुरुषांच्या शरीराची रचनाच तशी आहे, त्याला सेक्स मध्ये विविधता सगळयाच बाबतीत आवडत असते, नावीन्य पाहिजे असते, जे आहे त्याचे आकर्षण असतेच ते टिकवून ही असतो , परंतु समोरचे अजून काही चांगले असेल ही जिज्ञासा , हुरहूर यातून नक्कीच पुरुष उत्तम वैवाहिक जीवन असलं तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार करतो आणि स्त्री तशी दबलेली (कारण काहीही असो) असते, कुटूंब प्रिय असते त्यामुळे जर वैवाहिक जीवन सुखी असेल तर त्या कुटुंबात ती पूर्ण रमते.
पूर्वीच्या काळी ही एका राणी सोबत उत्तम वैवाहिक जीवन असेल तरी राजाच्या अनेक राण्या असतं ना. आणि ते कमी म्हणून गणिका असतं. एका दृष्टीने विचार केला तर त्यांनाही नाविन्याचा ध्यास असणार , सुंदरतेचे आकर्षण असणार , आणि जसे आपल्या basic गरजा , Freud यांच्या नियमानुसार भूक ही basic need , गरज आहे त्यात ही भिन्नता आहे, एखाद्याला एकावेळी थोडेच खाणे जाते, तर एखादा व्यवस्थित खातो , पण एखाद्याचे खाणे राक्षासासारखे असते. आणि बरं हे एकदा खाल्ले म्हणून पोट भरून राहिले , तृप्तता राहिली ती थोडावेळ. परत थोड्या वेळाने भूक लागते मग खाणे.
तसेच ही शारीरिक सबंध ही एक मानवी किंवा प्राण्यांची ही गरज च आहे. भूक आहे. कोणाची थोडी असते. कोणाची जास्त असते. तर कोणाला सतत थोड्या वेळाने पाहिजे असते. अशावेळी साहजिक च जरी सगळे समाधान घरी मिळत असेल तरी अजून मिळावे मग बाहेर काही वेगळे असेल अजून चांगले याची ओढ आकर्षण निर्माण होते.
काही लोकांना आयुष्यात काही तरी weird करण्याची इच्छा , ध्यास असतो. आयुष्यात एकदा वेगळा अनुभव घेवुन बघायचा असतो.
यातूनच उत्तम वैवाहिक जीवन असलं तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार येत असतो. कोणाला काय वाटते हा प्रश्न त्याच्या त्याच्या मनावर, भावना , सुप्त इच्छा , विविधता , नावीन्य , जिज्ञासा , काही तरी नवीन बघणे , करणे , कोणी तरी ते करण्यास force किंवा प्रोत्साहित करणे. किंवा मित्रांचे अशा प्रकारचे अनुभव आणि ते त्यांनी रंगवून सांगणे , आणि विरुद्ध लिंगी व्यक्तींच आकर्षण , सुंदरता या सगळ्या गोष्टींचा परिणाम तर कधी कधी या सगळ्या वर कंट्रोल ..त्या कोणत्याच मोहाचे आकर्षण नाही.
पण पुरुषाला स्त्रीचे रूप , सौंदर्य , तिचा नीट नेटकेपणा, आकर्षक कपडे , साडी , रंगसंगती , हलकासा पण आकर्षक मेकअप असेल, तिची फिगर असेल, तिचे पाणीदार डोळे असतील किंवा नाजूक ओठ या सगळ्याचे आकर्षण यातून उत्तम वैवाहिक जीवन असलं तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार येत असणारच .
अर्थात माझ्याच पाहण्यात असे ही आले आहे की उत्तम वैवाहिक जीवन असलं तरी विवाहबाह्य संबंधांचा विचार मनात येतो , काही वेळेस भिन्न लिंगी नाही तर समलिंगी सुधा असे ही करणारे आहेत. ते ही अनुभव घेणारे / घेणाऱ्या आहेत.
म्हणजे काय की पूर्वी अनेक गोष्टी लपून छपून होत होत्या , आता बरेचदा ते मोकळेपणाने मुक्त पणे बोलून , सांगून , प्रोत्साहित करून ही केले जाते.त्यात कोणाला काही गैर वाटत नाही .जशी त्यांची गरज आहे असेच ते आणि त्यांच्या सोबतचे ही समजतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


