Skip to content

हाताबाहेर गेलेला नवरा आणि हाताबाहेर गेलेली बायको..हा प्रसंग कसा हाताळावा?

हाताबाहेर गेलेला नवरा आणि हाताबाहेर गेलेली बायको..हा प्रसंग कसा हाताळावा?


सोनाली जे


मी नेहमीच जे सांगत आले आहे तेच परत एकदा सांगते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आणि Maslow या मानसशास्त्रज्ञ यांच्या मतानुसार किंवा theory नुसार आपल्या गरजांची hierarchy मांडली आहे. त्यात basic needs , अन्न , वस्त्र , भूक या गोष्टी पूर्ण झाल्या की मनुष्य safety needs पूर्ण करण्यामागे लागतो , जसे नोकरी , अर्थार्जन , घर , गाडी या गोष्टी. त्या पूर्ण झाल्या की तो सोशल needs पूर्ण करण्यामागे प्रयत्न करतो जसे की मित्र, मैत्रिणी , आपली हक्काची व्यक्ती आपला जोडीदार .

हा जोडीदार कधी आपल्या पसंती ने प्रेम संबंधातून निवडला जातो तर कधी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पसंती नुसार. दोन भिन्न लिंगी व्यक्ती लग्नासारखे सामाजिक बंधन पूर्ण करताना कायदा आणि समाज यांची साक्ष असते.

परंतु दोन भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येतात , त्यातून नवरा आणि बायको हे किती ही वेळा पूर्वी भेटले असतील किंवा लग्नानंतर एकत्र असतील तरी ही एकमेकांचे स्वभाव हे भिन्न असतात, विचारसरणी भिन्न असते, शिक्षण , अनुभव , मनावरचे संस्कार भिन्न असतात. सभोवतालचे वातावरण वेगळे असते, तार्किक बुध्दी वेगळी असते. आवडी निवडी वेगळ्या असतात.

लग्न झाल्यावर सुरुवातीला एकमेक समजून घेण्याचा प्रयत्न करतात, सांभाळून घेतात, कधी पटले नाही तरी एकमेकांना समजून घेतात. मग कधी sorry किंवा भेटवस्तू देवून , बाहेर फिरायला घेवून जावून , परत परत गोष्टी सोडून देवून एकत्र येतात.

पण अनेकवेळा एकमेकांना समजून घेतल्यावर त्यांच्यातली समजून घेण्याची क्षमता कमी होत जाते , ego दुखावले जातात , मीच का समजून घ्यायचे प्रत्येकवेळी , मलाच गरज आहे तुला काहीच आणि कधीच गरज नसते. अशी मानसिकता बनत जाते आणि त्यातून एकमेक आणि परिस्थिती हाताबाहेर जाते.

हाताबाहेर गेलेला नवरा आणि हाताबाहेर गेलेली बायको..म्हणजे काय नेमके तर असे जे एकमेकांच्या मधले वारंवार घडणारे प्रसंग , कधी शीत युद्ध असेल तर कधी महायुद्ध असेल , किंवा तडजोड करण्याची क्षमता संपली असेल , एकमेकांना आता कोणती गोष्ट विचारून करण्याची पूर्वी ची सवय आता एकमेकांविषयी एकमेकांना माहिती ही नसते. मग बेफिकिरी वृत्ती वाढते.

प्रत्येक जण आपला आनंद बाहेर शोधण्यात मग्न होते. माझे मी बघेन ही वृत्ती वाढीस लागते. या एकमेकांच्या वादमधून शारीरिक संबंध ही अनेक वेळेस बिघडतात. त्यात ही दोघे एकमेकांच्या गरजा समजून घेत नाहीत. आणि मग हे सुख ही अनेकवेळा बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस फक्त मित्र मैत्रिणी यांच्यासोबत चांगले क्षण घालविले , पार्टी , trips , movies , आजकाल ड्रिंक्स आणि नॉनव्हेज पार्टीज ही वाढल्या आहेत.

घरात जेवण ही वेळेत मिळाले नाही किंवा त्यात नावीन्य नसेल , स्वाद नसेल करायचे म्हणून करायचे , किंवा मीच का करायचे ही वृत्ती असेल तर नवरा आपल्या मित्र , मैत्रिणी किंवा ऑफिस मधल्या लोकांसोबत बाहेरच जेवण करतो कोणीच नसेल तर एकटा च जाईल.

सगळ्यात जेव्हा शारीरिक संबंध पूर्वी पुरुष बाहेर शोधायचे आणि त्यातून आपली शरीराची गरज भागवयचे, जोडीदाराची कमी पूर्ण करायचे , आता स्त्रियाही यात मागे नाहीत..स्वतंत्र विचार, आचासरणी , आर्थिक स्वातंत्र्य किंवा स्वतच्या पायावर उभे म्हणजे स्वावलंबन यांचा परिणाम म्हणून नाती जपण्या पेक्षा त्यात बेफिकिरी आली. नवरा बायको हा शिक्का लागला म्हणून एकत्र राहायचे एवढेच. बरेचदा मुले , घरची वडीलधारी , समाज आणि काही वेळेस आर्थिक स्थैर्य नसेल तर पुढचे पावूल जसे विभक्त होणे टाळले जाते. आणि मग जशी परिस्थिती असेल त्यातच राहावे लागते. मग ती हाताबाहेर गेलेली परिस्थिती असेल किंवा , हाताबाहेर गेले ले नवरा बायको. एकत्र राहून ही विभक्त असल्यासारखेच.

ही नवरा बायको मधली परिस्थिती किंवा नवरा आणि बायको हाताबाहेर जावू नयेत म्हणून काय करावे किंवा हे प्रसंग कसे हाताळावे या करिता काही गोष्टी विचारात घेवू आणि त्या आचरणात आणल्या तर हे प्रसंग नक्कीच टाळता येतील…

१. नवरा आणि बायको दोघांनी ही एकमेकांच्या गरजा समजून घेणे गरजेचे आहे. मग मानसिक असतील , शारीरिक असतील. त्याकरिता एकमेकांना वेळ देणे आणि एकदा वेळ दिला म्हणून संपले असे न करता परत परत वेळ देणे , एकमेकांस समजून घेणे , गरजा पूर्ण करणे आणि तेही खूप आवडीने उत्साहाने तर त्यांच्यातले understanding ही वाढते आणि ते कायम टिकून राहते.

२. हाताबाहेर जेव्हा समजा नवरा गेला .किंवा बायको ही.जसे की शरीरसंबंध त्याला बायको साथ देत नसेल तर तो बाहेर सुख मिळवीत असेल , याउलट बायकोचे ही तसेच नवरा कमी पडत असेल , तर , नवरा आणि बायको ने खूप प्रयत्नपूर्वक गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये आणल्या पाहिजेत की कुठे आपण कमी पडतो आहोत , काय गरज आहे , वेळ देवू शकत नसेल , दमून , घरची , बाहेरची कामे , ऑफिस ची कामे , मुले घरातले वडीलधारी यांचे करताना शरीर थकत असेल तर ते उत्साही राहण्याकरिता व्यायाम , meditation , पौष्टिक आहार घेतला पाहिजे .

त्या सोबत विश्रांती ही घेतली पाहिजे. कधी कधी डॉक्टर , डाएटिशियन यांचा सल्ला आणि मार्गदर्शन ही घेणे जरुरीचे असते. एकमेकांना आपल्या बिझी schedule मधुन कधी सुट्टी काढून , कधी बाहेर जावून , कधी घरात मुले आणि वडीलधारी मंडळी यातून वेळ देवू शकत नसतील तर बाहेर जावून , ट्रिप कधी जवळपास दोन चार दिवस एकमेकांसोबत घालविणे गरजेचे असते.

३. एकमेकांच्या आवडी निवडी लक्षात घेवून पूर्वी सांभाळत होतो तसे परत संभालाव्यात. कधी आवडते छंद जपावेत , कधी खाण्यापिण्यात आवडी निवडी जपाव्यात ,. कधी आवडते कपडे . साडी शर्ट घ्यावेत.

४. एकमेकांच्या बरोबर मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. त्यातून एकमेकांना समजून घेणे , प्रॉब्लेम्स समजून त्यातून मार्ग काढणे सोपे जाते. त्याकरिता तेवढी शारीरिक आणि मानसिक जवळीक परत निर्माण करणे आणि एकमेकांवर विश्वास आहे याची खात्री पटवून देणे गरजेचे असते.

५. काही वेळेस भावनेच्या भरात , रागात नवरा बायको पैकी कोणीही हाताबाहेर गेले असेल तर त्यांना समजून घ्या , परिस्थिती काय होती ते समजून घ्या आणि त्यातून मार्ग काढा. कधी कधी मनाचा मोठेपणा दाखवून माफ करा. जे झाले त्याकरिता त्याला / तिला दोषी धरू नका . आणि विसरून जा . त्यांनाही विसरायला लावून काही झालेच नाही असेच आपले वागणे चांगलेच ठेवावे. आणि परत कधी ही त्याच गोष्टींचा उल्लेख करू नये.

६. काही वेळेस समजून घेण्याची मानसिकता राहिली नसेल जो किंवा जी हाताबाहेर गेली आहे , त्या परिस्थिती ती मध्ये काही वेळेस वडीलधारी मंडळी यांचा धाक , मुले यांच्या मनावर होणारे संस्कार , परिणाम याची जाणीव करून द्यावी . तर कधी कायदा आणि पोलिस, समाज यांचा धाक आणि बंधने नजरेस आणून द्यावीत.

७. कोणत्या गोष्टींमुळे नवरा / बायको हाताबाहेर गेले आहेत ती गोष्ट समुजन घेवून , मुळापर्यंत जावून तीच गोष्ट काढून टाकली पाहिजे , दूर केली पाहिजे.

जसे एकमेकांची सततची भांडणे , आर्थिक गोष्टी वरून भांडणे असतील . नवरा कमावता नसेल आणि बायको मुले यांच्या दैनंदिन गरजा ही पूर्ण करू शकत नसेल तर आणि बायको स्वतः कमविण्याकरिता पात्र नसेल तर बाहेरून या गरजा पूर्ण करण्याकरिता मदत घेते मग त्यात शरीर आणि मन आणि आर्थिक गरज यांची पूर्ती ही ती बाहेरून करता असेल तर पुरुषाने , नवऱ्याने ही हाताबाहेर गेलेली बायको संभाळण्या करिता अर्थार्जन करणे त्याकरिता कष्ट घेणे , प्रयत्न करून बायकोला तो सांभाळू शकतो याची खात्री तिला पटवून देणे गरजेचे असते. तिला मानसिक , आर्थिक आणि शारीरिक सुरक्षितता देण्याकरिता यशस्वी प्रयत्न नवऱ्याने करावेत.

८. आरोपी म्हणून वागवू नका : काहीवेळेस असे होते की नवरा / बायको पैकी कोणी हाताबाहेर गेले तर तो / ती अशीच आहे असे म्हणून दुर्लक्ष केले तर परिस्थिती अजून चिघळते. जसे नवरा व्यसनी असेल आणि बायको ते व्यसन कमी होण्याकरिता प्रयत्न करणे सोडून तो तसाच आहे , पैसे आहेत उडवीत असतो , असेना का व्यसन त्याचे तो बघून घेईल समजत नाही का त्याला , मी कशाला बघू असे बायको विचार करत असेल किंवा नवरा बायको कडून समाधानी नसेल आणि बाहेरच्या स्त्री मध्ये गुंतला असेल तर बायको ला त्याची ती चूक च वाटते , त्यात तिची काही चूक आहे असे वाटतच नाही , जावू दे त्याला समजत नाही का ?

त्याने शेण खाल्ले ..माती खाल्ली त्याला मी काय करू आता मी काहीच देणार नाही त्याला त्याचे तो बघेल हा स्वतः चा इगो बाळगू नका , बायको ने अशावेळी आपला स्वाभिमान बाजूला ठेवून प्रेमाने , आकर्षण वाढवून , गोड बोलून , समजून , नवऱ्या ला काय अपेक्षित आहे ते बदल स्वतः मध्ये घडवून त्याला आकर्षित केले पाहिजे .

आरोपी म्हणून आपल्या मनाला वाटेल ती एकतर्फी शिक्षा देवून रिकामे होवू नका. स्वतः ही यात कुठे तरी चूक आहोत हे लक्षात घ्या . कारणीभूत आहोत हे विचार करा आणि मग ही करा आणि जपण्याचा प्रयत्न करा.

९. कधी ही टोकाची भूमिका घेवू नका .. तर सामंजस्य कधी शांत राहून , परिस्थिती , विचार , गरज समजून घेवून पुढचे पावूल योग्य दिशेने टाका.

१०. कान टोचणी ही करा . कधी कधी सगळे असते . आर्थिक स्थैर्य , एकमेकात चांगले संबंध तरीही बाह्य जगाचे आकर्षण यातून नवरा बायको हाताबाहेर जातात , कधी स्त्री आकर्षक , तोकडे कपडे पसंत करते ते घालते यात नवऱ्याला , त्याच्या विचारांना महत्व देत नाही . तेव्हा नवऱ्याने तिची कान टोचणी योग्य मार्गाने केली पाहिजे.कधी समजून सांगून ,कधी परिणामाची जाणीव करून देवून , कधी अधिकाराने रागावून .योग्य वेळी योग्य action घेतली पाहिजे.

११. एकमेकांना एकमेकांची गरज आहे हे पटवून दिले पाहिजे . एकमेकांच्या भावना जपल्या पाहिजेत. गरजा समजून स्वतः मध्ये बदल करणे गरजेचे आहे. तुम्हाला त्याची तिची गरज नाही , काही फरक पडत नाही असे न वागता एकमेक आपल्यासाठी , मुलांच्या करिता किती महत्वाचे आहेत हे शब्दातून , कृती , भावना , डोळ्यांमधून , स्पर्शा मधून व्यक्त करा. त्यांना पटवून द्या. विश्वास द्या.

आयुष्य सुंदर आहे. चारचाकी सुधा काही वेळा रस्ता सोडून , अचानक कोणी आडवे आले तर स्पीड मध्ये असू तर आपल्या कंट्रोल बाहेर जाते तेव्हा आपण शांत आणि संयम ठेवून , परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आपल्या भावना नियंत्रित ठेवून आणि अचूक निर्णय क्षमता तेही वेळेत घेवून पटकन ब्रेक दांती ,स्पीड कमी करतो , स्टिअरिंग wheel योग्य दिशेने वळवून , कधी direction बदलून असे परिस्थितीनुसार पटकन निर्णय घेवून तसे वागून परिस्थिती नियंत्रणात आणतो तसेच आहे आयुष्यात ली परिस्थिती असेल किंवा हाताबाहेर चाललेली , गेलेली नवरा किंवा बायको असेल तर ती परिस्थिती कशी योग्य प्रकारे हाताळता येईल याचा विचार करा , कृती करा आणि ते technique आत्मसात करा.

आयुष्य सुंदर आहे. मन , भावना , जोडीदार यांना हाताबाहेर जावू देवू नका. वेळीच त्यांना योग्य direction द्या. आणि कोणतीही वेळ जात नाही गेलेली नसते. खचून जावून , हार मानून , शस्त्र हातातून टाकून युद्ध भूमीतून पळून जावू नका. जे आहे त्याचा स्वीकार करून त्याला धैर्याने , सामर्थ्याने तोंड द्या.

बचेंगे तो और भी लढेंगे ..अशी वृत्ती ठेवा.. इतरांनी समजून घेण्यापेक्षा आपणच आपल्या लोकांची काळजी आणि त्यांना समजून घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “हाताबाहेर गेलेला नवरा आणि हाताबाहेर गेलेली बायको..हा प्रसंग कसा हाताळावा?”

  1. Kamble Prabhatraj

    मी खूप समजवून घेतो पण माझी बायको कधीच मला समजून घेत नाही
    ती तीच्या आईच्या सांगण्यानुसार वागते
    तीची आई जसं सांगेल तसं ती वागते
    मी तीच्या साठी खूप काही केला पण तिला तीची जाणीव नाही

  2. हे असं ज्याच्या बरोबर घडलं आहे त्याला अशा प्रकारे हाताळणे शक्य होणार का?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!