Skip to content

शरीरसंबंध ठेवल्यानंतर पटत नसूनही वेगळं होणं अवघड जातं, हे खरंय का?

शरीरसंबंध ठेवल्यानंतर पटत नसूनही वेगळं होणं अवघड जातं, हे खरंय का?


सोनाली जे


तसे लग्नाआधी , लग्नानंतर , कोणत्याही वयात ही शरीर संबंध होवू शकतात.
आज आपण तरुण मुला – मुलींच्या बाबतीत च विचार करूया.

आजकालची तरुण पिढी .सगळेच सुपरफास्ट लागते. Net speed fast. 4 G phone .. या आजकालच्या तरुण मुला – मुलींच्या मध्ये बघितले की लगेच आवडतात , आज कालच्या भाषेत एकमेकांस पटवितात .मग रोज भेटणे , फोन , आजकाल व्हिडिओ कॉल्स असतील , बाहेर फिरायला , movies सगळ्या गोष्टी झटपट.

मग अनेकदा लग्ना आधी चे एकमेकांचे आकर्षण , हलकेसे स्पर्श , भेटीची ओढ यातून काही वेळेस लग्नापूर्वी किंवा मग लग्नानंतर ही शरीरसंबंध ठेवले जातात.. त्यात ती भेटन्यातली हुरहूर असते. एकमेकांविषयी आकर्षण असते. ओढ असते. आणि एक mentality झालेली असते की आपल्या या ओढीचा , हुरहुरीचा शेवट म्हणजे शरीरसंबंध , आणि खरेच अनेकदा यातून शरीर आणि मन त्या वेळी एकत्र येतात. आणि सुखाच्या परमोच्च बिंदूवर पोहचतात.

बरेचदा असे होते की एकमेकांचे जमत नाही , विचार मतभेद , किंवा तात्विक वाद असतात, आर्थिक गोष्टी असतील किंवा घरातल्या इतर व्यक्तीमुळे दोघात वाद होत असतील , एकमेकांना स्वातंत्र्य तर असतेच , काही वेळेस एकमेकांच्या आयुष्यात मित्र मैत्रिणी यांना जास्त स्थान असेल , किंवा अजून दुसऱ्या जवळच्या व्यक्तींना स्थान असेल , किंवा इतर कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टीत वाद असतील , एखाद्याची X मैत्रीण , मित्र असेल तर त्यातून ही काही वेळेस वाद होत असतील , एखादे व्यसन , एखादी वाईट सवय , या त्रासदायक असतील पण शरीरसंबंध या गोष्टी मात्र दोघात खूप चांगल्या असतील मात्र इतर गोष्टी एन्जॉय करताना किंवा वैचारिक , तार्किक , बौध्दीक पातळीवर कमी पडत असतील या गोष्टी मात्र इतर कोणाबरोबर शेअर केल्या जात असतील .

पार्टी , पिकनिक या साठी इतर मित्र मैत्रिणी यांच्या सोबत जास्त एन्जॉय करत असतील आणि त्यांना प्रेफरन्स असेल त्यातून ही वाद की आपण योग्य नाही , मग आपण केवळ शरीर एकत्र येण्यापूरवी आणि तेवढ्या वेळा पर्यंत महत्वाचे असे वादाचे अनेक मुद्दे असतील .

शरीरसंबंध ठेवल्यानंतर पटत नसूनही वेगळं होणं अवघड जातं, हे खरंय का?
जर हो खरे आहे म्हणले तर ,

शारीरिक ओढ ही दोघांना एकत्र घेवून येत असते. पण असेही आहे की ही शारीरिक ओढ टिकून राहते म्हणजे तेव्हा एकमेकांना मानसिक शांतता ही मिळत असते. मन ही तेव्हा जुळत असते. विचार ही जुळत असतात. त्यात ही नावीन्य , ओढ , आपुलकी टिकून असते. आणि दोघे खूप satisfaction देत असतील, आनंद मिळवत असतील , सुख मिळवीत असतील , एकमेकांना देत असतील , तर इतर वादाचे मुद्दे हे त्यापुढे दुर्लक्षिले जातात. एकमेकांमध्ये वाद , मतभेद असतील तरी त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी यावर तेव्हा मात करत असतात. आणि पटत नसूनही त्यांना वेगळे होणे म्हणूनच जमत नाही.

दोघेही एकमेकांना समजून घेतात, परत परत संधी देतात आणि खरे तर त्यांना एकमेकांपासून विभक्त व्हायचे नसतेच पण हे वाद मध्ये येतात तेव्हा काही वेळेस असे वाटते की आपले पटत नाही तर आपण वेगळे व्हावे.पण परत त्यांच्यातल्या strong गोष्टी त्यांना एकत्र आणतात आणि ते सगळे विसरून जातात.आणि मनाचे आणि शरीराचे चक्र ही कुठे तरी पूर्ण व्हावे लागते. जो harmonal imbalance निर्माण होतो तो ही यातून पूर्ण होतो.

परत अशी ही भीती किंवा आपल्यावरच संस्कार ही असतात..की वेगळे झालं तरी इतर कोणाशी परत ती मोकळीक तसे संबंध निर्माण होणारच नाहीत.

एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न , संधी देतो . Give up करण्याची सवय नसते. नाती जोडणे कठीण असते पण तोडणेब सहज शक्य असते पण जोडण्याकरिता घेतलेले कष्ट विचार करता ते सहज तोडणे हा स्वभाव नसतो .ती टिकवून ठेवण्याकरिता प्रयत्न केले जातात.

आपण शरीराने आणि भले काही वेळा पुरते तरी मनाने एकत्र आलो आहोत , वाद कोणाच्या मध्ये होत नाहीत , दोन भिन्न व्यक्ती आहेत म्हणले की विचार , आचार , बुध्दी , आवडी निवडी , क्षमता भिन्न असणारच की. काही वेळेस आर्थिक स्थैर्य नसते त्यामुळे ही वाद होतात. पण आशावाद त्यांना एकत्र ठेवतो. की हे ही दिवस जातील . आणि चांगले घडेल , आपण प्रयत्न करू .

आता आपण एवढ्या पुढे गेल्यावर आपल्याला एकमेकांच्या मनाची जशी माहिती झालेली असते तशी शरीराची सुधा त्यामुळे पटत नसेल तरी वेगळं होवून दुसऱ्या कोणासोबत आपण परत हे करू याची खात्री नसते. तशी शक्यता वाटत नाही कारण नकारात्मकता आलेली असते. आणि परत ही भीती की सोडून दुसऱ्या कोणाला हो म्हणले तर त्याच्या / तिच्या बरोबर ही नाही पटले , ते कसे असतील , परत स्वभाव कसे असतील.

आणि एकदा शारीरिक दृष्ट्या एकत्र आलो तर इतरांच्या सोबत ते करणे ही मानसिकता राहत नाही. काही वेळेस त्यातून विरक्ती येते. समाज काय म्हणेल , नातेवाईक काय म्हणतील , आपले आई वडील यांचे विचार आणि भवितव्य यांचे ही विचार , शिवाय जरी तरुण असू तरी परत आपल्याला कोणी accept करेल का ही भीती , आणि जरी पुढे जावून लग्न करायचे नसेल किंवा लिव्ह इन रिलेशनशिप नको असेल तरी संपूर्ण आयुष्य एकटे कसे काढणार ? असे असंख्य विचार , भावनिक आणि physical attachment ,यातून पटत नसेल तरी वेगळं होणे अवघड जाते.

त्यापेक्षा निदान एकमेकांमध्ये जे चांगले आहे ते टिकवून पुढे जाणे हे विचार केले जातात त्यामुळे पटत नसून वेगळं होणे हे थोडे अवघडच जाते.

याउलट शरीरसंबंध ठेवल्यानंतर पटत नसूनही वेगळं होणं काही वेळेस अवघड जातं नाही. कारण अशी ही नकारात्मक मानसिकता निर्माण होते की केवळ शरीरसंबंध आहेत म्हणून एकत्र यावे हे पटत नाही .. वर सांगितलेले इतर अनेक मुद्दे त्यांना पटत नसतील. आणि काही वेळेस या इतर गोष्टीमुळे मनावर परिणाम होवून त्याचे शरीरसंबंध आणि जवळीक यावर ही विपरीत , नकारात्मक परिणाम होत असतील तर ओढून ताणून ही नाती पुढे घेवून जाण्याची मानसिकता राहत नाही.

आनंद आणि सुख यापेक्षा दुःख जास्त , त्रास जास्त होत असेल , एकमेकांना जबरदस्ती नाती सांभाळतो असे वाटत असेल तर शरीरसंबंध येवून पटत नसेल तर वेगळं होण्याचा विचार जास्त करतात आणि तशी कृती ही घडू लागते.

धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत . अशीच काहीशी अवस्था असते.
किंवा तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना अशी गत.

तुम्ही सगळेच तुमच्या अनुभवातून आणि वैचारिक क्षमातेमधून विचार करा. आणि याचे उत्तर मनापासून विचारा , द्या की,
शरीरसंबंध ठेवल्यानंतर पटत नसूनही वेगळं होणं अवघड जातं, हे खरंय का?

आयुष्य सुंदर आहे . तुमचा वागण्याचा, बघण्याचा दृष्टीकोन , अनुभव , तुमच्या मनावरचे संस्कार , मनाची जडणघडण , वैचारिक क्षमता आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी तुम्हाला तडजोड करायची का नाही , काय योग्य काय अयोग्य याचे निर्णय घेण्यास मदत करत असते!!

तुम्हाला काय वाटते ??


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!