Skip to content

माणसं कशी ओळखावीत ? यामागचं मानसशास्त्र काय!

माणसं कशी ओळखावीत ? यामागचं मानसशास्त्र काय!


आपल्या जगण्यात विविध प्रकारची माणसं येतात. खाजगी तसेच सार्वजनिक जीवनात, दोन्हीकडे भेटणारी माणसं अनेकदा ओळखता न आल्याने काहीवेळा मनस्ताप होतो अथवा निराशा येते. ज्याचा त्रास आपल्यालाच होतो. “तो असा निघेल” किंवा “ती अशी वागेल” असं वाटलं नव्हतं, हे वाक्य एकदा तरी आपण सगळे म्हणतोच.

मग यावर उपाय काय ?

मनस्ताप टाळायचा असेल तर माणसं ओळखता आली पाहिजेत. त्यासाठी एकदोन टिप्स देण्याचा हा प्रयत्न.

सर्वात आधी म्हणजे “मानसशास्त्र” विषयावरच वाचन थोडंफार तरी प्रत्येकाने करावं. पुस्तकातून अथवा गुगल करून, पण वाचलं पाहिजे. आणि जास्त उपयोग करून घ्यायचा असेल तर सरळ कॉलेजची त्या विषयांची पुस्तक आणून वाचली पाहिजेत. (मला स्वतःला हे जमलं आणि त्याचा खूप फायदा नेहमीच मला होतो) म्हणून स्वानुभवाने हे सांगितलं !

आतमध्ये लिहिलंय काय ? याचे उत्तर पूर्णपणे देऊ शकतात का ? पुस्तकांचे आकर्षकपण ठरवू शकते का कि आतील मजकूर खरा आहे? प्रेरणादायी आहे? उपयुक्त आहे ?? आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या जगण्यामध्ये त्याचे किती महत्व आहे ? हे सगळं बाहेरच रंगरूप सांगू शकेल का ?

तर नक्कीच नाही !

पुस्तक जस दिसतंय तसंच ते आहे का ? म्हणजे अंतर्बाह्य सुंदर! हे कळण्यासाठी ते पुस्तक “वाचावं” लागत. आतमध्ये काय लिहिलं आहे हे समजून घ्यावं लागत. त्यासाठी आपल्याला पुस्तकाला “वेळ” द्यावा लागतो. (पुस्तकाला म्हणजे वाचनाला).

खरं ना ?

गंमत म्हणजे हे सगळं तुम्हाला माहित आहेच. यात नवीन असं मी काही सांगत नाहीये. पण जो सेन्स पुस्तकाबद्दल आपण ठेवतो तोच सेन्स जीवनात आलेल्या माणसाबद्दल ठेवतो का ? तर बहुतेक वेळा उत्तर “नाही” असं येईल. आणि म्हणूनच नकळत आपल्याकडून माणसं न ओळखण्याची किंवा चुकीचे निघण्याची शक्यता वाढते.

अगदी पुस्तकाला जसा शांत निवांत वेळ देता तसाच माणसाला समजण्यासाठी, त्याला वाचण्यासाठी देखील वेळ दिला पाहिजे.

पण तुम्ही काय करता ? तर समोरच्या व्यक्तीच्या दिसण्यावर जाता. त्याच्या अपिअरन्सवर जाता.
त्याचे कपडे, त्याचे रंगरूप, सौंदर्य, इत्यादी इत्यादी कडे पाहत बसता आणि मनात एक इमेज करून घेता. त्यावर प्रेम करू लागता.

पण ते केवळ आणि केवळ आकर्षण असते!
पण ते दिसणं, ते आकर्षण हे कायमचे राहत नसते. वयोमानाने त्यात बदल होऊ शकतो. आणि मग तरुणाईची प्रेमकहाणी अथवा इतर लोकांची समोरच्या बद्दलची ओढ हि टिकत नाही. काहीतरी घोळ होतो. मग तुम्हाला वाटायला लागत कि आपण फसले गेलोय. तुटलोय, कोसळतो आहोत इत्यादी निराशा जन्माला येते.

पण यात नक्की चूक कुणाची ? यावर कधी विचार केलाय ?

तर यात संपूर्णपणे चुक ही आपलीच !

कारण ?

आपण त्या व्यक्तीच नेचर “वाचलंच” नाही. त्याच्या वागण्याचे निरीक्षण केलेच नाही. त्यासाठी पुरेसा वेळ तुम्ही दिला नाही.

एखाद्याबद्दलच प्रेम म्हणजे काही “मॅगी नूडल” नाही. जे दोन मिनिटात तयार व्हावं !
निखळ प्रेम समजून घ्यायचं असेल आणि जीवनात ते मिळवायचं असेल तर त्यासाठी “वेळ” द्यावा लागतो. तुमचं अंतर्मन काय म्हणत ? हे ऐकलं पाहिजे. डोळ्यापेक्षा ते मन जास्त चांगला कौल देत. त्यावेळी ते मन सांगत कि समोरची व्यक्ती आपल्या जीवनात हवी कि नको?

हे एकदा उमजलं कि पुढं सगळं सोप्प होत.
आणि हे केवळ तरुणांसाठीच नव्हे तर सर्वच वयातील व्यक्तींना लागू पडते. हेही नक्की.

विचार करा ! नक्की फायदा होईल !!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

9 thoughts on “माणसं कशी ओळखावीत ? यामागचं मानसशास्त्र काय!”

  1. खरच खूपच सुंदर ??
    बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक मनाचे सौंदर्य महत्त्वाचे.
    याप्रमाणे जर माणसांंची पारख केली तर निश्चितच बऱ्याच समस्या दूर होतील.

  2. खरच खूप सुंदर लेख आहे हे समजण्याची खूप गरज आहे की माणसं कसे ओळखले पाहिजेत… Thank you so much… मला खूप याचा फायदा होईल असे नक्कीच वाटते

  3. Shailaja sanjay sharma

    खरच आहे, प्रेम गुंफाव लागत, जसजशी वीण घट्ट होईल, पुढे जाईल, तसं नात क8नवा प्रेम फुलत जात

  4. Dr.sunita Dharmrao

    मनाला पटला…. कमी शब्दांंत योग्य विचार मांडले….?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!