एकदा लग्न झालं की विरुद्ध लिंगी आकर्षण कमी होतं की वाढतं ???
सोनाली जे.
आकर्षणाचा सिद्धांत सगळ्यांनाच माहिती आहे. लोहचुंबक यात जसे दोन विरुद्ध टोके एकमेकांना आकर्षित करतात .तसेच आहे दोन विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये आकर्षण निर्माण होते. स्त्री तिची फिगर , तिचे सौंदर्य , पाणीदार डोळे, चाफेकळी नाक , तिची शालीनता , लज्जा या सर्व बाह्य गोष्टी पुरुषाला आकर्षित करीत असतात च. याखेरीज तिचा स्वभाव , बोलण्यातली मार्दवता, गोडवा , तिची चतुराई , काळजी घेण्याचा स्वभाव यातून पुरुष अजून जास्त आकर्षित होत असतात.
याउलट पुरुष उंच , देखणा , हँडसम , आकर्षक त्याचे ही नाक तरतरीत , डोळ्यात आपलेपणा , आर्जव हे बाह्यरूपाचे आकर्षण झाले , त्याचे बोलणे , त्याचे समजून घेणे , समजावणे , कधी तरी गरज पडेल तेव्हा अधिकार शाही , अनेक गोष्टींचे knowledge, त्याचे पेशंस या गोष्टी स्त्री ला आकर्षित करत असतात
आणि यापुढे जावून एकमेकांचा सहवास, सुसंवाद त्यांना जास्त आकर्षित करीत असतो. आज काल तर खूपच गोष्टी लग्नापूर्वी ही मुला मुलींना माहिती झाल्या आहेत. सोशल मीडिया वर , शाळा , कॉलेज , घरचे मोकळे वातावरण यातून अनेक गोष्टी आधीच माहिती होतात. त्यामुळे आणि वयात येताना होणारे शारीरिक बदल, हार्मोन्स मधील बदल यातून साहजिकच विरुद्ध लिंगी आकर्षण वाढण्यात मदत होते.
लग्न हा हिंदू परंपरेनुसार एक संस्कार , रीतिरिवाज मानला गेला आहे त्यामुळे लग्न म्हणजे कायदा आणि समाज यांनी दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती ना एकत्र येण्या करिता दिलेली परवानगी च जणू.
लग्नानंतर ही आपल्या जोडीदार असेल किंवा विरुद्ध लिंगी आकर्षण हे कायमच राहते. जोडीदाराचे अनुभव , साथ चांगली असेल तर ते आकर्षण अजून जास्त वाढते.. पण याकरिता जोडीदार कसा / कशी समजूतदार आहे , त्याचा किंवा तिचा उत्साह , प्रेम , आपुलकी , नाविन्यता हे त्यांच्यातले आकर्षण वाढविण्यास अजून प्रोत्साहित करतात.
याउलट जरी आपला जोडीदार तेवढा रसिक नसेल, समजूतदार नसेल, किंवा उत्साही नसेल , विविधता आणि नावीन्य नसेल तरी ही लग्नानंतर ही विरुद्ध लिंगी आकर्षण हे वाढतेच .
पुरुषांमध्ये कायमच विरुद्ध लिंगी आकर्षण हे असतेच आणि ते जास्त वाढत जाते..मग त्याचे लग्न झाले तरी सुधा त्याला ते आकर्षण असतेच.. स्वतः ची बायको ही आदर्श असतेच त्याच्या करिता . पण खूप मोकळेपणाने तो एखाद्या स्त्री ची फिगर , तिचे सौंदर्य , काळी सावळी असेल तरी नीट नेटकेपणा याकडे आकर्षित होतो च. आणि बरेचदा आपल्या बायको ने ही असे व्यवस्थित , स्वतः ला मेंटेंड ठेवावे असे वाटते च पण त्याबरोबर update ही.. मग ते फॅशन संदर्भात असेल किंवा knowledge संदर्भात.
आपल्या जोडीदाराची बुद्धिमत्ता , ऑफिस असेल घर यातली प्रगती हे पुरुषाला अजून जास्तच आकर्षित करतात. स्त्री कडची एका वेळेला अनेक गोष्टी करण्याची क्षमता , संयम आणि चिकाटी , आणि सातत्य या गोष्टी पुरुषाला नेहमीच आकर्षित करतात.
याउलट स्त्री चे असे आहे की तिला आवडेल असा, देखणा , समंजस , कर्तबगार , हरहुन्नरी , तिच्यावर प्रेम करणारा, तिला जपणारा असा जोडीदार मिळाला आणि मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दोघांनाही जर satisfaction मिळत असेल तर दोघांच्यात ही विरुद्ध लिंगी आकर्षण वाढते.
स्त्री बाबत तिला जर तिच्या जोडीदाराकडून निराशा पदरी पडली, शारीरिक असेल किंवा मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या , तर तिला थोडी विरक्ती येते. तिच्यात आकर्षण वाढणे हे तर दूरच पण जे आहे त्यापासून ही ती दूर राहू लागते.
पुरुषांमध्ये जर असे झाले तर ते आकर्षण वाढविण्याकरिता मग स्वतः मध्ये असेल किंवा बायको त्यांच्यात जे काही कमी वाटत असेल किंवा जिथे ते आकर्षण वाढविता येईल अशा पद्धती किंवा गोष्टी करतात त्याकरिता प्रयत्न करतात.
अगदी मग ” अजुनी रुसून आहे खुलता कळी खुलेना ” अशा सारख्या गाण्यातून ही मनधरणी असेल , एखादा मोग्ऱ्याचा सुगंधित करणारा गजरा असेल , एखादा प्रेमाचे प्रतीक असणारा लाल गुलाब असेल , एखादी Cadbury असेल , किंवा बाहेर फिरायला घेवून जाणे असेल , वस्तू किंवा एकमेकात मोकळीक ही सुधा एकमेकांच्या मध्ये आकर्षण वाढविण्याकरिता च घेतली गेलेली सकारात्मक भूमिका च ना..!!!
कारण मुळात आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे.आणि पहिल्यापासून पुरुष त्याबाबतीत पुढाकार घेणार ही मनोवृत्ती म्हणा किंवा वडीलधाऱ्या मंडळींची शिकवण यातून स्त्री ही थोडी मर्यादा , लज्जा बाळगणारी. त्यामुळे सबंध सुधरण्याकरिता , किंवा आकर्षण वाढविण्याकरिता , निराशा आली तर ती स्वतः त्यातून फारशी पुढाकार घेताना दिसत नाही..
पण जर साथ असेल चांगली तर विरुद्ध लिंगी आकर्षण अजून जास्त नक्कीच वाढत. असे म्हणतात की सुरुवातीला दोघांनाही अनुभव नसते , माहिती नसते, स्वभाव माहिती नसतात एकमेकांचे , शिवाय शारीरिक रचना माहिती नसते त्यामुळे थोडेसे अज्ञान च असते…उलट लग्नानंतर जसजसे अनुभव येतील तसतसे त्यातले आकर्षण नक्कीच वाढत जाते.
काही अपवाद ही असतात..लग्नापूर्वी काही तरी चुकीच्या कल्पना असतील, किंवा चुकीची माहिती दिली गेली असेल एखादा accident किंवा सुरुवातीला समजून घेताना काही समज गैरसमज झाले तर मात्र हे विरुद्ध लिंगी आकर्षण कमी होते.
पण जसजसे अनुभव चांगले येतील , वाढतील , सुख , आनंद , आपुलकी वाढेल , एकमेकांना समजून घेण्याची , काळजी घेण्याची क्षमता वाढेल , अडी अडचणी संकटे यात साथ , शिवाय रोजच्या व्यवहारात ही , संसारात ही एकमेकांचे स्वभाव , माहिती , तडजोड या गोष्टी वाढल्या , सहवास वाढला , एकमेकांची काळजी घेणे वाढले , एकमेकांना शारीरिक तसेच मानसिक साथ देण्याची सवय लागली , त्यात ओढ वाटू लागली , तरी ही एकदा लग्न झालं की विरुद्ध लिंगी आकर्षण हे नक्कीच वाढतं .
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



सुंदर माहिती
लेख छान आहे
निशब्द
लेख आवडला