Skip to content

लग्नानंतरच्या काही वर्षातचं केवळ शारिरीक संबंधासाठी जोडपी एकत्र का येतात ?

लग्नानंतरच्या काही वर्षातचं केवळ शारिरीक संबंधासाठी जोडपी एकत्र का येतात ?


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे (चिंतामणी चौक)


मित्रहो,

लग्नासारख्या पवित्र बंधनात जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, त्या नात्याचं पावित्र्य तितक्याच प्रेमाने निभावला जातं का ?

खरं म्हणजे दोन जीवांचे मिलन होणं हे काही फक्त त्या शारीरिक संबंध पुरतेच मर्यादीत नाही, कारण की दोन जीव जेव्हा लग्नाची सप्तपदी हातात हात घेऊन चालतात, तेव्हा त्या सप्तपदीत त्यांनी एकमेकांना वचन दिलेले असते, एकमेकांचे सुख दुःख, एकमेकांची काळजी ,
एकमेकांना साथ देणे, आयुष्याच्या प्रवासात परिस्थिती कितीही कठीण असली तरी एकमेकांचा सांभाळ करणे, एकमेकांना समजून घेणे, एकमेकांप्रती विश्वास असणे, आणि ही दिलेली वचनं कायम निभावणे ,….

मला असं नेहमी वाटतं की दोघांमध्ये प्रेम हे नेहमी वाढत जाणारं असावं…….खरं म्हणजे शरीराने जवळ येणे यात काहीच विशेष नाही, पण मनाने जवळ येणे हीच प्रेमाची पहिली पायरी…….

तसं पाहिलं तर आपण सर्वांवर प्रेम करतो, आपल्या आई-वडिलांवर, मित्र मैत्रिणींवर , नातेवाईकांवर , स्वतःवर, प्रेम करतो म्हणजे जीव लावतो, काळजी करतो ,पण आपल्या जोडीदाराशी आपले नाते फक्त भावनिक नसून तेथे शारीरिक संबंधाचा खूप मोठा वाटा आहे, किंबहुना एकमेकांची शारिरीक गरज पूर्ण करणे ही त्या नात्याची एक गरज आहे , यामुळे दोघांचे नाते फुलणारं असते, बहरणारं असते ,आणि त्यातूनच दोघांनाही आई बाबा होण्यासारख्या अलौकिक सुखाची प्राप्ती होते,

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा खूप मोठा विषय आहे , परंतु केवळ आपल्या शारीरिक गरजेपोटी आपण एखाद्या व्यक्तीशी जुळवून घेत असू तर ते चुकीचे आहे …,जेव्हा मानवाच्या बाबतीत त्याच्याकडे कुठली गोष्ट नसेल, तर त्या वेळेस त्याला त्या गोष्टीचे कौतुक आणि मिळवण्याची धडपड खूप असते ,

एकदा ती गोष्ट मिळाली की बस…! नव्याचे नऊ दिवस संपले की त्याचे नाविन्य माणसाच्या आयुष्यात नसतेच ……. व्यक्तीची मानसिकता ती गोष्ट मिळाल्यावर ती आता आपलीच आहे ,कुठे जाणारं असं म्हणून त्याबद्दल काही विशेष नाही वाटत, “परंतु जे आपलं असतं त्याला आपण जपायचं असतं ”

वयात आलेली सर्वच मुलं मुली वयानुसार शरीरात झालेले हार्मोन्स बदल आणि आकर्षणाचे बडी होण्याचा सर्वात जास्त धोका या कोवळ्या वयातच असतो, कधीकधी वयाच्या या पटलावर अनेक चुकीची पाऊल टाकली जातात , एखादी व्यक्ती आवडणे हे आकर्षण असते ,
आणि यालाच प्रेम समजून काही जण आपल्या आयुष्यात खूप मोठ्या समस्यांमध्ये अडकून जातात, चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनचं नसते ती काचसुद्धा असू शकते, याचा मात्र विसर पडतो आणि एकाकडून प्रेम प्रामाणिक असले, तरी दुसऱ्यासाठी ते तितकंचं सिरीयसली असेल, असं नाही काही लोक स्वार्थासाठी या माध्यमातून अनेक लोकांना अडकून पैशांची लूटमार करतात…अशा कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला होतांना दिसतात…..

एक नवीन लग्न केलेलं जोडपं त्यांच्या गालावर पडणारी गुलाबी खडी , नवीन नवीन कसं सर्वचं एकदम छान छान असतं, परंतु लग्नाचे नव्या नवरीचे नऊ दिवस संपतात, तसे हळूहळू चित्र बदलते, जोपर्यंत एखाद्या गोष्टीत सस्पेन्स असतो , तोपर्यंत त्या गोष्टीबद्दल खूप उत्साह जाणवतो,

मानसशास्त्रानुसार व्यक्तीच्या ज्या काही गरजा असतात, त्यामध्ये तहान-भूक, आरोग्य, लैंगिक गरज, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे, शारिरीकसंबंध ही नात्याची नीव असली, तरी लग्नानंतरच्या काही वर्षातच केवळ शारीरिक संबंधासाठी जोडपी एकत्र का येतात ?

असा प्रश्न निर्माण होतो लग्नानंतर त्या जोडप्यात शारीरिक संबंध असावे , परंतु ते दोघेही केवळ त्यासाठी एकत्र येत असतील, आतापर्यंतच्या आयुष्यात असं जवळचं कुणी नसते , आणि कुठेतरी त्या एकटेपणाच्या त्या वाटेवर साथीदार सोबत असावा , आणि त्याच्या सोबत आयुष्याचे पुढचे क्षण आनंदाने टिपून घ्यावेत, यासाठी जोडीदाराला मायेने जवळ घ्या, त्याला काही तुमच्याशी बोलायचे असेल, तर मोकळे होऊ द्या,
डोक्यावरून हात फिरवताना त्याला तुमच्या मायेची कुशी द्या…,

धकाधकीच्या जीवनात विसाव्याचे क्षण द्या.., कष्ट आणि मेहनत करून थकला असेल तर त्या थकलेल्या मनाची व्यथा जाणा…., एकमेकांची मनं जुळली तर एकमेकांची साथ कायम असते, म्हणून आधी मन जुडवा , तुमच्या आयुष्याची साथीदार उभा जन्म तुम्हाला कधी अंतर देणार नाही, एकमेकांची काळजी करणे यातच खऱ्या प्रेमाचं समाधान असते…….!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!