Skip to content

मानसिक रोग बरा होऊ शकतो का ?

मानसिक रोग बरा होऊ शकतो का ?


कोमल मानकर
mankarkomal756@gmail.com


अनेकांच्या आयुष्यात युटर्न घेणारे प्रसंग घडतात , त्याने त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं…

माझ्याही आयुष्य असचं काहीस घडलं , ज्याने माझं आयुष्यच बदलून गेलं . मित्रांनो , मृत्यू आणि कोणतीही बिमारी ह्या दोन अश्या गोष्टी आहेत ज्या कधीच सांगून येत नाही .
काही बिमाऱ्यावर उपचार असतो तर काहींवर उपचार असूनही त्याचा फायदा होत नाही .
काही ना तर जिवंत राहण्यासाठी गोळ्या खाव्या लागतात. जिवंत राहयचं गोळ्या खात जगायचं … छे ! ही संकल्पनाच मनाला कुठेतरी बोचते …

उन्हाळ्याचे दिवस होते . माझे बारावीचे पेपर संपलेत आणि आता रिझल्टची वाट होती . पास झाल्यावर एखाद्या चांगल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायची हे स्वप्न सर्वांप्रमाणे मी ही रंगवलेले होतं . पण काहीच दिवसात माझ्या ह्या स्वप्नांवर पाणी फेरलं .

माझी आई एका कॉन्व्हेट मध्ये प्रेन्सिपल होती . शाळेत मॅडमच्या वागण्याने ती अगदी कंटाळलेली होती . रिजाईन करायचं म्हटलं तर घरखर्च कसा भागेल माझं पुढचं शिक्षण . आई ह्याच विचारात असायची सतत . गेली आठ दिवस ती घरी सर्वांशी फार कमी बोलायला लागली . फक्त हो नाही एवढंच … रात्र रात्र ती झोपायची नाही . आपल्याच विचारात असायची . शाळेचा वाद आईच्या डोक्यात घर करून बसला होता . आणि एक दिवस अचानक . आईच वागणं बदलून गेलं . सर्व व्यवस्थित असतानाही . तिला गोष्टीत confusion व्ह्याला लागलं . चिडचिड वाढली . झोपणं बंद झालं . इथून आईच्या मानसिक आजाराला सुरवात झाली होती . दोन तीन दिवसात आईच असं वागणं बघून घरच्यानी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं . एक महिना भरती राहिली . डॉक्टरांनी सांगितले की गोळ्या बंद करायच्या नाही . त्या नेहमीसाठी चालू ठेवायच्या . पण काही दिवसात तब्येत ठीक होताच आईने गोळ्या बंद केल्या . परत तब्येत जैसे थे ..!! काही दिवसांनी तर आईने ‘मला काय झालं’ म्हणून चक्क गोळ्या घेणं बंद केल्या . गेली दोन वर्षे आईच्या नकळत मी तिला चहात गोळ्या टाकून दिल्या . पण मन आतल्या आत खूप दुःखी व्ह्याचं . तिच्या पासून कोणतीच गोष्ट न लपवणारी मी तिला असं तिच्या न कळत चहात गोळ्या देते म्हणजे काहीतरी खूप मोठा गुन्हा केल्या सारखं वाटायचं . त्याही गोळ्या एखादी दिवस आईला दिल्या नाहीतर ती रात्रभर झोपू शकत नव्हती .

ह्यावर खूप रिसर्च केलं , कोणी म्हणायचं मानसिक रोगी कधीच बरा होऊ शकत नाही . घरचे नातेवाईक म्हणायचे आता हे कायमच दुखणं मागे लागलं तुझ्या . मी सुद्धा असे काही पेशन्ट बघितले जे मरेपर्यंत गोळ्या खाऊन जगतात . आणि डॉक्टरांनी स्वतः माझ्या वडिलांना सांगितलेलं गोळ्या कधीच बंद करू नका . पंधरा दिवस एक महिना झाला की मी ह्या गोळ्यात खंड पाडून बघायचे . आता एवढे दिवस झाले आई ह्या गोळ्या घेते आहे, मग झाली असेल ना बरी …. म्हणून मी गोळ्या द्यायची नाही . पण त्याचा त्रास आईची तब्येत बिघडल्यावर घरच्यांना व्हायचा . मग सतत दोन वर्षे गोळ्या चालू होत्या .

तरी माझ्या मनाने हार मानली नव्हती , मला मुळात गोळ्या खात जगणं एखाद्याच पटतच नाही . का म्हणून गोळ्या खात जगायचं ? आयुष्य एवढं सुंदर आहे त्याला आपल्या हुबीने जगता यायला पाहिजे .

मी नेहमी सकाळी मॉर्निग वॉकला जायची पहाटे पाच वाजता मैत्रिणी सोबत . दिवाळीच्या सुट्यामध्ये ती मामाच्या गावी गेली . मग मी आईला कसं तरी पटवून ती येईपर्यंत माझ्या सोबत पहाटे फिरायला उठून चालण्याची विनंती केली . ती अगदी चार पाच दिवस माझ्या सोबत फिरायला आल्यावर मला हळूहळू तिच्यात आधी जशी ती होती तसा फरक जाणवू लागला . आधीची आई तिच्यात दिसायला लागली . खळखळून हसणारी , सर्वांशी गप्पा करणारी . मला आईला पूर्वी सारखं हसताना बघून छान वाटायला लागलं . तिला पण मग सकाळी फिरायला यायची सवय झाली . त्या सवयीमुळे ती फिरून आल्यावर रोज पहाटे दोन ग्लास पाणी प्यायची . त्यामुळे सकाळी चहा घेणं ही बंद झालं . मग मी गोळ्या देणार कशात ? मग गोळ्या देणंही बंद झालं .

गोळ्या बंद झाल्यानंतर हळूहळू दुपारी तिला खाली वेळ मिळाल्यास मी मेडिटेशन करायला सांगितलं . आधीचे काही दिवस तिला कंटाळा आला पण आता ती रोज स्वतः मेडिटेशन करते . मेडिटेशमुळे मनात येणाऱ्या विचारावर ताबा असतो , आणि तेच हवंय . मनात असंख्य विचाराच्या गर्दीत माणूस पिंजल्या गेला की मानसिक रोगाला आमंत्रण देतो .

म्हणून एखाद्या गोष्टीचा फार फारतर विचार कधीच करू नये . जे होईल ते बघितल्या जाईल म्हणत हसत खेळत आनंदाने जगावं .

मी अशक्य असणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवलं . डॉक्टरानी मला सांगितलं होतं की मानसिक रोग्यांना गोळ्या कायमच्या देण्याशिवाय दुसरा कोणता उपाय नाही . पण मी ते उपाय शोधून काढले आणि आईला कायमच त्या रोगतून मुक्त केलं …

पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला एक आग्रहाची विनंती आहे . ह्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला स्वतः कडे लक्ष दयायला वेळ नाही , कुटूंब जबाबदाऱ्या पार पाडत एक दिवस आपण स्वतःला ह्यात झोकून देतो . फस्ट्रेट होतो . कुणाशी मन मोकळेपणाने बोलता देखील येत नाही मनातच घुसमट होत जाते . बंद खोलीत गुदमरून पडलेल्या कैद्यासारखी आपली दशा होत्या . ह्याला कारणीभूत आपणच असतो , ह्या अश्या जगण्यातून मुक्त व्हा ! स्वच्छदी आयुष्य जगा … मोबाईल , टीव्ही अशी उपकरण सोडून निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घ्यालवा . सकाळी रोज लवकर उठून मॉर्निग वॉकला जा . रोज अर्धा तास तरी ध्यान करा . एवढं करून बघा … आयुष्य खूप सुंदर होईल .



online counseling घेऊन दिलेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “मानसिक रोग बरा होऊ शकतो का ?”

  1. छान वाटला आणि हो मानसिक रोग नक्की बरा होतो पण त्या साठी घरच्यांची मदत पाहिजे त्या व्यक्ती ला यातून बाहेर काढण्या साठी

  2. ध्यान करण्याचे अगणित फायदे आहेत… ध्यानामुळे मानसिक रोग बरा होण्यास खूप मदत मिळते..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!