केलेली शारीरिक मागणी सध्या नको असल्यास प्रेयसीने कसे ठणकावून सांगावे.
टीम आपलं मानसशास्त्र
हॅलो स्वीटहार्ट…काय करतेय माझी जान ? रोहन ने अगदी लाडात येऊन साक्षीला विचारले. काही नाही यार, असच मूव्ही बघत होते. कंटाळा आला आहे. चल ना मग, थोडं रिफ्रेश होऊन येऊ. तसही बरेच दिवस भेटलो नाहीय आपण. तू फक्त हो बोल, लगेच उद्याचे बुकिंग करतो.
अरे नो यार…तिथे नको. मला नाही आवडत सारखे सारखे. प्लीज, हवे तर असेच नॉर्मल हॉटेल मध्ये जाऊ.
ओके, तुला नाही यायचं तर ? ठीक आहे, जा तुझ्या बेस्टीला घेऊन. मला पण वेळ नाहीय. तुला राग आला का ? रोहन समजून घे ना रे, असे सतत नाही बरे दिसत आणि कोणी ओळखीच्यानी बघितले तर किती प्रॉब्लेम होईल माहित आहे का तुला ? कम ऑन बेबी, तुला नसेल इंटरेस्ट माझ्यात तर बोल तसे अशी उडवा उडवीची कारणं नको देऊस.
अच्छा बाबा नको रागावू…सांग किती वाजता भेटायचे. आहा, लव्ह यू डियर…उद्या ठीक १० वाजता गेट जवळ ये, मी न्यायला येतो. तिथून जाऊ आपल्या नेहमीच्या ठिकाणी. असे बोलून रोहनने फोन ठेवला.
रोहन आणि साक्षीने एकाच कॉलेज मधून डिग्री घेतल्यानंतर जॉब सुध्दा एकाच ऑफिस मध्ये करत होते. दोघांचे खूप प्रेम होते एकमेकांवर. एक, दोन वर्षात लग्न सुद्धा करणारं होते. कॉलेज मध्ये असताना एकदा सगळे मित्र मैत्रिणी मिळून फार्म हाऊसला गेले असताना, तिथले वातावरण तसेच जवानीचा जोश ह्यामध्ये दोघे वहावत गेले आणि आपले सर्वस्व एकमेकांना देऊन बसले.
त्या दिवसापासून दोघांमध्ये अजूनच प्रेम वाढले, परंतु लग्नाआधी हे सर्व चुकीचे असते ह्याचा विचार न करता तारुण्याच्या वाटेवर सर्व सीमा पार करत गेले. आता हीच गोष्ट त्यांना रोजच हवी हवीशी वाटू लागली. ह्याचे जास्त आकर्षण रोहनला वाटू लागले. तो सतत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. सुरुवातीला नवं नवीन म्हणुन तिने सुद्धा कधी नकार दिला नाही मात्र आता रोजचच होत चाललं आहे म्हटल्यावर तिला हे नकोस वाटू लागले. ज्या दिवशी ती नकार देई त्या दिवशी रोहन आणि तिच्यात कडाक्याचं भांडण होत असे.
अखेर प्रेमापोटी ती राजी होते. पण असे किती दिवस चालणारं ? लग्न न करता असे शरीर संबंध ठेवणे म्हणजे अयोग्यच. कितीदा त्याची समजूत काढून सुद्धा त्याला मान्य होत नसे. आज ना उद्या आपण लग्न करणारं आहोतच ना मग ह्या गोष्टीसाठी नकार कशाला हवा ? मस्त मज्जा करायचे दिवस आहेत आणि तू अशी रडत बसतेस. रोहनच्या अशा बोलण्यावर साक्षी क्षणात स्वतःचा विचार बदलत असे. कधी कधी तिच्या मनाविरुद्ध जाऊन रोहन शरीर सुख घेत असे. पण ह्या सर्व गोष्टी सांगणार कोणाला ? तो मला त्याच्या हक्काची समजतो म्हणून हक्काने सर्व काही मागतो, मी नकार देऊन सुद्धा काहीच होत नाही.
ठरल्याप्रमाणे रोहन आणि साक्षी दुसऱ्या दिवशी रूम वर गेले. बऱ्याच दिवसांनी भेटल्याचा आनंद तर होताच पण सोबत शरीराची आग सुद्धा मिटवायची होती. दोघांनीही अगदी मनमुराद उपभोग घेतला. बराच वेळ एकमेकांच्या मिठीत नुसते पडून भविष्याची स्वप्न रंगवू लागले.
रोहन, ह्यापुढे प्लीज आपण ह्या साऱ्या गोष्टी न केलेल्या बऱ्या. आता तूच बघ ना किती सवय झाली ह्या सर्वाची आपल्याला. भेटलो नाही तर राहवत नाही. लग्न व्हायला अजून बराच अवधी आहे. मला असे वाटते की आपण निदान ह्या गोष्टी तरी कमी करूयात.
वाह, म्हणजे सगळं तुझं तूच ठरवणारं ? माझं मत कुठे असतं का नाही ? रोहनचा वाढलेला स्वर बघून साक्षीने विषय बदलला आणि लगेच दुसऱ्या गप्पांमध्ये त्याचे मन गुंतवले.
काही दिवस गेल्यानंतर पुन्हा रोहन साक्षीला शरीर सुखाची मागणी करू लागला. या वेळेस मात्र साक्षीचा निर्णय ठाम होता. नो रोहन, मी तुला आधीच सांगितले होते, नेक्स्ट टाईम पासून मला नाही जमणारं. आता काही करायचं असेल ते लग्नानंतर…
प्लीज साक्षी, तुझं पुन्हा ते रडगाणे सुरू झाले. तुला ना हे असले नको ते विषय काढून काय मिळतं ते तुझं तुलाच माहित. सगळा मूड ऑफ करतेस. तुझा ना माझ्यावर विश्वास नाहीय म्हणून नेहमी असली नको ती कारणं देत असतेस.
असे अजिबात नाहीय रोहन, पण तुलाही कुठे समजून घेता येते, मला जे बोलायचे आहे त्याचा नेहमी वेगळाच अर्थ काढत असतोस. विश्वासाचा प्रश्न येतोच कुठे ? विश्वास नसता तर आजवर जे झालं ते continue केले असते का ? निदान काही गोष्टी बोलताना विचार करून तरी बोलत जा…
ओके, म्हणजे मी जे बोलतो त्याला काही अर्थ नसतो, तुला समजून घेत नाही…अजून काय आरोप करणारं आहेस ? ते एकदाच करून घे.
हे बघ रोहन, मला तुझ्याशी भांडायच नाहीय. फक्त आपण जे काही सतत करतोय ते कुठेतरी थांबले पाहिजे असे वाटते. ह्या सर्व गोष्टी लग्नानंतर योग्य आहेत. प्लीज मला यापुढे फोर्स नको करुस. आणि तुला माझा निर्णय मान्य नसेल तर मला आपल्या नात्यातून मुक्त कर. कधीतरी ह्या गोष्टींचे अप्रूप वाटते पण अतिरेक झाला की किळस येतो. कधी कधी असे वाटते तू माझ्यावर जबरदस्ती करत आहेस. हवा हवासा वाटणारा तुझा स्पर्श मला काटेरी भासू लागतो. But this time No means No..मला समजून घे.
साक्षीला रडताना बघून रोहन तिला घट्ट मिठीत घेतो, I’m sorry यार, तु इतकी hurt होत असणारं ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. तुला ह्यापुढे कधी फोर्स नाही करणारं. जेव्हा तुला मनापासुन माझी व्हाविशी वाटेल तेव्हाच मला जवळ कर. मला तू हवी आहेस, तुझं शरीर नको.
जी व्यक्ती तुमच्यावर खरंच मनापासुन प्रेम करते ती शरीर सुखासाठी कधीच जबरदस्ती करत नाही. ज्या व्यक्तीचं आपल्या अस्तित्वावर प्रेम असतं तिच व्यक्ती तुमचा योग्य जोडीदार बनू शकते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


