नवरा-बायकोच्या वादाचे प्रमुख ९ कारणे पाहूया.
सोनाली जे
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे.. हा खूप मोठा विषय आहे खरे तर..
नवरा बायको म्हणले की भांड्याला भांडे लागणारच कधी भांडणे ..कधी दुरावा..मग विरह..त्या विरहातून एकमेकांची विनवणी , आणि मग परत एकत्र येण्याचा गोडवा असे हे चक्र सुरू असते. छोट्या कारणापासून मोठ्या कोणतीही कारणे वाद घडवू शकतात.ते त्यावेळची दोघांची मानसिकता , शारीरिक ता , सभोवतालचे वातावरण यावर अवलंबून असते.
नवरा – बायको मध्ये खूप चांगले नाते असेल तरी काही वेळेस वाद होतातच .या वादांची प्रमुख कारणे पाहूया.
१. मीच का करायचे / मलाच करावे लागते सगळ्यांचे :
नवरा आणि बायको खरे तर दोघेही संसारा करिता सारखीच धावपळ , कष्ट करत असतात. पुरुष बरेचदा अर्थार्जन करतो आणि स्त्री घर सांभाळते शिवाय आजकाल नोकरी करणाऱ्या महिला ही आहेतच. नवरा ऑफिस , जाणे येणे , तिथला कामाचा ताण तणाव, बॉसचे bossing हे सहन करीत , आर्थिक कमाई शिवाय खर्च यांचा ताळमेळ घालत असतो..घरखर्च, लाईट बिल, वाणी समान , इतर टॅक्स, इन्शुरन्स, mediclaim, घराचे भाडे असेल तर ते नाही तर गृहकर्ज हप्ता, गाडी चा हप्ता असेल तो , गॅस , मुलांचे शिक्षण , क्लासेस , कपडे , सणवार, आजारपण, घरात येणारे पाहुणे असतील . आणि इतके करून सगळ्यांच्या भविष्याकरिता तरतूद .असंख्य हिशोब डोक्यात घोळत असतात .बजेट सांभाळता सांभाळता कसरत सुरू असते..
तरीही घरी आले की हसतमुख बायको जे म्हणेल त्याला हो ला हो ..की तिला दुखवयला नको..मुले असतील ती म्हणतील तसे, शिवाय आई वडील असतील तर त्यांना सांभाळून ..हा balance सांभाळताना परत हसत खेळत.
बायकोचे ही तसेच घरातले देवाचे असेल, स्वैपाक सकाळ संध्याकाळ , breakfast , मग भाजी घेवून येण्यापासून , निवडणे ते करणे असेल किंवा घरातली साफ सफाई असेल, कोणाचे आजारपण ,घरतल्या वृद्धांची काळजी असेल की मुलांना. शाळेत वेळेत पाठविणे, त्यांचा अभ्यास , डबे , मुलांना शाळेतून दमून आल्यावर काही खावू करून ठेवणे असेल , किंवा नवरा दमून आला म्हणून चहा खाणे असेल , येणारे पाहुणे असतील त्यांचे आदरातिथ्य असेल, शेजार सांभाळणे असेल , स्वतः नोकरी करत असेल तर तिथला कामाचा ताण , बॉस सगळे सांभाळून परत घरचे वेळेत होणे यात तारांबळ उडते..
मग कधी कधी घाई गडबड उडते अशावेळी दोघांचे असे होते की हे काम मीच का करायचे . मलाच सगळ्यांचे करावे लागते..
२. पुरुष प्रधान संस्कृती आणि त्यामुळे नवऱ्याचे आई वडील सोबत राहत असतात त्यांच्यात आणि सूनेत खटके :-
आपल्या आई – वडिलांनी आपल्या करिता एवढे कष्ट काढले आहेत, म्हणून त्यांना थोडासा आराम मिळावा , सुख मिळावे या हेतूने मुलगा प्रयत्न करत असतो.पण बरेचदा सासू – सुनेचे खटके उडतात..कारण सासूने इतकी वर्ष स्वतः केलेले असते .मग ते पदार्थ असेच करायचे तसेच असोत किंवा भाजी अशीच चिरायची असो किंवा स्वच्छता असेल , बर सगळे वेळेत पाहिजे..त्यांच्या औषधे गोळ्या यांच्या वेळा जमविणे..
अगदी याउलट ही सासू सारखे मला काही तरी काम दे..आणि कामाचा उरक खूप असेल तर सुनेला हे करू का ते करू का विचारले तरी सुनेला कामात disturbance वाटतो. किंवा वयस्क असतील , होत नसेल त्यांना तरी सगळे करावे लागते म्हणून सुनेची चिडचिड. त्यावरून खटके उडतात.आणि मग हे सगळे रूपांतर आपल्या हक्काचा नवरा त्याच्याबरोबर हे असे तसे करून वादात च होते..
३. काही खास तारखा, सण विसरले तर : –
नवरा बायको दोघांपैकी कोणीही एकमेकांचे वाढदिवस , anniversary असतील ते विसरले , किंवा बायको जास्त करून दिवाळी पाडवा , लक्ष्मीपूजन याकरिता काही खास गिफ्ट ची वाट बघत असतेच नवऱ्याकडून आणि अशा प्रसंगी तो विसरला किंवा आपण एकत्र जावू म्हणून राहून गेले तर त्यांच्यात वाद नक्कीच होता..एकच दिवस हक्काचा असतो तो ही विसरणे म्हणजे काय..
तसेच आहे नवऱ्याने अशा खास दिवशी surprise प्लॅन केला असेल आणि घरातल्या वयस्क लोकांच्या प्रोब्लेम मुळे असेल , मुलांच्या परीक्षा , अचानक आजारपण असेल किंवा बायको ला रजा नाही मिळाली, तिची घरकाम यात surprise प्लॅन उधळला गेला तरी दोघेही एकमेकांशी वाद घालतात मी एवढा प्लॅन केला तरी जमवू शकत नाही..बायको म्हणते असे surprise plan करावेत कशाला मी काय रिकामी असते का दिवसभर ..माझ्या मागे सतराशे साठ व्याप असतात. झाले वादाला तेवढे ही कारण पुरेसे झाले.
४. मुलांची शिस्त : –
बहुदा नवरा मुलांची बाजू घेत असतो .बायको मुलांना हे जागेवर ठेवा ते जागेवर ठेवा..हा पसारा काढू नका..मला आवरायला लागते नंतर ..हातासर्शी गोष्टी जाग्यावर ठेवा ..वेळेत उठून , अंघोळ करून आवरा . का तर तिची पुढची कामे कपडे धुणे वेळेत होते..
यावरून नवरा म्हणतो मूल च आहेत ग थोड्या त्यांच्या कलाने घे..मोठी झाली की आहेच हे सगळे आता जरा मोकळीक दे.. पण बायकोचे एक की जेवढ्या लवकर त्यांना शिस्त लागेल ते चांगले .. यावरून नवरा बायकोे मध्ये टोकाचे ही वाद होतात.
५. मुलांचे अभ्यास :
आई वडील दोघांचे ही ध्येय असते की मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, करियर घडवावे, चांगला जॉब , व्यवसाय करावा , मानाने आणि अधिकाराने मोठे व्हावे.. त्याकरिता दोघेही सगळ्या सुविधा मुलांना देत असतात..त्यातून जेव्हा मुले अभ्यासाचा कंटाळा करतात, खेळण्यात ओढा जास्त , मित्र मैत्रिणी ..तेव्हा नवरा उलट खुश असतो की मुलांचे सामाजिक वर्तुळ ही वाढत आहे पण आई मुलांच्या मागे सारखा अभ्यास करा , अभ्यास करा म्हणून मागे लागते..
यातून नवरा बायको मध्येच वाद होतात..की सारखे अभ्यास अभ्यास काय ..त्यांना रिकामा मोकळा श्वास घेवू देत.. थोडे बदल म्हणून इतर गोष्टी करू देत..तर त्यावरून वाद की एकदा ध्येय पूर्ण झाले की सगळे करता येते छंद असतील बाकी गोष्टी..पण बायको ला या स्पर्धेच्या काळात लक्षात येत नाही की मुलांना ही या रेस मध्ये थोडी विश्रांती लागते म्हणजे अजून जास्त प्रेरणेने ते पुढे जातात.
थोडक्यात मुलांचा अभ्यास हा नवरा बायको मधला अजून एक वादाचा मुद्दा असतो.
६. नवरा बायको एकमेकांस वेळ देत नाहीत :
हा दोघांचा ही वादाचा मोठा मुद्दा असतो..दोघेही बिझी असतात..एकमेकांसोबत निवांत बसून चहा घेणे हे निमित्त त्यातून एकमेकांची विचारपूस , गरजा काय आहेत , भावना काय आहेत हे समजते..पण आजच्या या धावपळीच्या काळात बरेचदा एकमेकांना वेळच नसतो बोलायला , काही गरजा समजून घेण्यासाठी , किंवा घरात वयस्क असतील, मुले असतील तर त्यांच्या समोर कसे बोलणार म्हणून थोडा संकोच.
किंवा बाहेरून काही आणायचे असेल , कुठे जायचे असेल तर दोघा पैकी एकाला वेळ नसेल त्यावेळी तरी आताच जायचे हा अट्टाहास ..थोडे एकमेकांच्या सवडीनुसार घ्यावे तर ते जमत नाही तेव्हा फक्त राग कारण मी आता म्हणले म्हणजे आताच केले पाहिजे ..त्यातून मग वेळच नसतो तुम्हाला ..तुला हे वादाचे कारण डोके वर काढते.
७. एकमेकांच्या आवडी – निवडी न समजणे, न जपणे :
जसे कधी नवऱ्याला सिनेमाची आवड असते पण बायकोला नसते त्यामुळे ती त्याच्या सोबत जाण्यास विरोध करते .याउलट बायकोला बाहेर फिरण्याची आवड असते, पिकनिक असेल,v नवीन जवळपासची स्थळे असतील , शॉपिंग मग घरासाठी , स्वतः साठी मुलांकरिता
तेच तेच सारखे काय करायचे , पैसे नको तिथे खर्च करायचे..असे म्हणून दोघांनाही. एकमेकांच्या आवडी न समजणे . किंवा जपता न येणे .त्यामुळे तू माझ्या आवडीचा कधी विचार करतच नाही तुला पाहिजे तसेच करायचे कायम हा एक वादाचा मुद्दा असतो..
८. शारीरिक गरजा समजून घेणे , भावनिक गरजा समजून घेणे :
नवरा – बायको यांच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात.की काही वेळेस घर , बाहेर सगळे सांभाळता सांभाळता मानसिक थकवा येतो , सततचा ताण , काळजी यातून आपल्या पार्टनर ने आपल्याला थोडासा आधार द्यावा ..कधी तरी आपले कौतुक करावे की तू दमते ..खूप करावे लागते…एखादा पदार्थ छान झाला तर तुझ्या हाताला किती छान चव आहे..कौतुक करावे ही अपेक्षा बायकोची असतं. कधी आधार द्यावा मी आहे सोबत तू कसली चिंता करू नकोस..
सतत बायको ला हेच झाले नाही तेच झाले नाही , वेळेत एक गोष्ट होत नाही , शेजारची बघ , अशा तुलना ही त्रासदायक असतात..
तेच नवऱ्याच्या बाबतीत ही घडते..बायको ने दमून आलात एव्हढे म्हणले, आल्यावर पाण्याचा ग्लास दिला , फ्रेश मुड ने छान आवरुंन स्वागत केले तरी नवऱ्याला उत्साह येतो पण रोजच्या सवयी झाल्या की या छोट्या गोष्टींकडे लक्ष ही दिले जात नाही.
जसे भावनिक गरजा असतात तसे एकमेकांच्या शारीरिक गरजा समजून , ओळखून त्या क्षणी एकमेकांना वेळ देणे गरजेचे असते..
बरेचदा मी दमलो, मी दमले , मुले आहेत, सासू सासरे, आई बाबा काय म्हणतील हे बाकी विचार करण्यात वेळ आणि energy घालवित असतात याउलट त्याक्षणी एकमेकांची गरज समजून घेणे आणि वेळ देणे गरजेचे असते. त्यातून ही जेव्हा समजून घेतले जात नाही तेव्हा नवरा बायको मध्ये हे वाद होत असतात.
९. एकमेकांवर विश्वास , आदर नसणे :-
एकमेकांवर कोणत्याही परिस्थितीत विश्वास असणे गरजेचे आणि एकमेकांचा आदर करणे गरजचे..कोणी ही काही ही सांगितले तरी किंवा चुकून काही घडले तरी एकमेकांवरील विश्वास आणि आदर कमी होवू देवू नये..
बरेचदा ऑफिस मध्ये होणारा उशीर , कामात सोबत असलेली स्त्री किंवा पुरुष सहकारी.कधी कधी उशिरा पर्यंत मीटिंग, ऑफिस कामाकरीता बाहेर जावे लागणे ..
अगदीं काही नाही तर कधी मित्र मैत्रिणीसोबत मोकळेपणाने भेटणे , एखादे gt , यातून बाहेरच्या करिता वेळ असतो ..पासून काही आहे बाहेर अशी शंका आणि आरोप यातून वाद ..
आर्थिक , सामाजिक ,भावनिक , शारीरिक , शाब्दिक आधार दिला नाही…तर त्यातून चिडचिड ..मी कसे पैसे manage करायचे पासून , माझे च चुकते विनाकारण च शाब्दिक वाद ..तुम्हाला किंवा तुला किती वेळा सांगितले तरी समजत नाही .. किंवा एखादी वस्तू आपल्याकडे नाही तर शेजारणी ने घेतली असेल तर किती छान आहे म्हणून आपल्याला पाहिजे हे स्पष्ट न सांगता आपल्या मनातील ओळखून आपल्यासाठी करावे ही अपेक्षा..
आपल्याला जे वाटते ते बोलून न दाखविता मनात च विचार आणि अपेक्षा करणे त्या पूर्ण झाल्या नाहीत तर वाद..
अशी आणि अनेक छोटी मोठी कारणे , तुम्ही – तू असेच का केलेत , असेच का बोलले , असेच का केले पासून फोन का केला नाही , घेतला नाही , मेसेज का नाही..
अशी असंख्य कारणे असतात…जी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या किंवा तिच्या घरची परिस्थिती , एकमेकांची मानसिकता, शारीरिक भावनिक गरजा समजून न घेणे यातून असेल पण वाद होताच असतात..पण हे वाद तसेच मनात धरून ठेवू नयेत..जसे गोड ,खारट, तिखट या सगळ्या चवी ना महत्व आहे तसे वाद मर्यादित ठेवून त्यातून समेट ही घडवून नात्यातला गोडवा वाढवावा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


