जोडीदाराचे बाह्यसंबंध??हा मनातील संशय की सत्य?? हे कसे ओळखावे.
कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे
जोडीदाराचे बाह्यसंबंध????हे फक्त कानावर जरी ऐकू आलं तरी मुंबईत असणारं मन अगदी क्षणभरात जगाला प्रदक्षिणा घालून येतं.हे तर कानालाही सहन होत नाही.पण मग हे वास्तव असेल तर काही बघायलाच नको.जोडीदाराचे बाह्यसंबंध?? हे फक्त ऐकल्यावर आपण इतके गोंधळून जातो.आणि गोंधळून म्हणजे नुसतं गोंधळून नाही जात आपण तर असंख्य प्रश्नांच्या पंक्ती आपल्या मनात जेवायलाच बसल्या असतात.खरं तर ‘हिरवळ’ हा शब्द खूप सकारात्मक आहे.
पण तरीही मनात संशय हा एखाद्या हिरवळीसारखाच पसरत जातो.आणि हळुहळू ती संशयाची हिरवळ दाट होत जाते.आणि मग त्या हिरवळीला छाटणं अवघड होत जातं. कारण एकदा का संशयाच भूत मानगुटीवर बसलं की ते जिथे जाईल तिथे आपल्या सोबतच असतं.त्याला हाकलून लावणं फार कठीण…!!
पण हा केवळ संशय असतो की वास्तविक जीवनात खरच जोडीदाराचे बाह्यसंबंध असतात हे मात्र आपण कधी सहसा ओळखतच नाही. किंवा ओळखायला चुकतो तरी.कारण संशय नेहमीच खरा असेल असं नाही. आणि खोटा असेल असही नाही. त्यामुळे जरा सांभाळून….!!कारण “संशय” हाच ज्वालामुखीसारखा कधी कधी पेटून उठतो.संशयापुढे कोणाच काही ऐकून घ्यायलाही आपण तयार नसतो.
पण हा संशय फक्त संशय आहे की खरच असं काही आहे हे ओळखणं मात्र खूप महत्त्वाचं ठरतं. नाहीतर काहीही नसताना केवळ संशयामुळे नाती उध्वस्त होतात.आणि असेलच असं काही तर आपण उगाचच गुंतून राहतो. त्यामुळे संशय की सत्य हे ओळखणं गरजेचच आहे.
मनात जर खरच जोडीदाराबद्दल संशय वाटत असेल ,किंवा जोडीदाराचे बाह्यसंबंध आहेत असं वाटत असेल तर ते ओळखायच कसं असा बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतो. पण करायच काय ते मात्र समजत नाही. आपण संशय घेऊन लगेचच टोकाची भूमिका घ्यायला तयार असतो.तर अशी कोणतीही टोकाची भूमिका न घेता शांतपणे त्या मनातील संशयाचा वेळीच निचरा केला पाहिजे.
तो/ती…अर्थात जोडीदार आपली टाळाटाळ करतोय.आपल्याशी जास्त संवाद साधत नाही.आपल्याला वेळ देत नाहीये.आपल्याला बऱ्याचदा असही वाटतं की जोडीदार काहीतरी लपवतोय.उगाचच आपल्यावर चिडतोय. आधी असं नव्हतं वगैरे वगैरे आपल्याला वाटत असतं.इतकच नाही तर आजुबाजुला काही विचीत्र लोकं सुद्धा काहीबाही अशा विषयांवर कुजबुजत असतात. तसेच अजून एक गोष्ट म्हणजे आपण विविध मालिका , चित्रपट , वेब सिरीज वगैरे पाहत असतो.जरी कथानक काल्पनिक असलं तरी सुद्धा कळत नकळतपणे आपण तसाच विचार करायला लागतो. त्यावरून आपण वेगवेगळा अंदाज बांधायला सुरुवात करतो.
आणि मग आपल्याच हाताने आपण आपल्याच मनात संशयाला हक्काच स्थान देऊन बसतो.आणि कधी कधी हा संशय केवळ संशयच असतो.वास्तविक असं काही घडलेलच नसतं.पण त्या संशयामुळे मात्र नात्यात उगाचच दरी निर्माण होते.दुरावा येतो.संशय शब्द छोटा वाटत असला तरीही तो जीवघेणा आहे. क्षणात सगळं बदलून टाकतो.आणि कानांवर,डोळ्यांवर ,अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आधी सगळं पडताळून पहा.नाहीतर सगळच अवघड आहे.असा विचार हा केवळ मनातील संशय असु शकतो.कारण सत्य आपल्याला माहित नसतं.पण कधीकधी हाच संशय खरा ठरतो.आणि संशयाचं सत्यात रुपांतर होतं.संशयाचा उलगडा होऊन गोष्टी अगदी टोकाला पोहोचतात.
पण आपल्याला जे काही वाटतं, जाणवतं ते नेहमीच तसच असेल असं नाही.कारण सगळ्यांचे बाह्यसंबंध असतातच असं नाही. काही ताणतणावामुळेही त्यांच्या वागण्या-बोलण्यात थोडा फरक जाणवतो.त्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे. हा केवळ आपल्याला वाटणाला संशय असतो.
पण हो…कधी कधी हेच सत्यही असतं.आपल्याला वाटतं आपण आपल्या जोडीदारावर उगाचच संशय घेतोय .काही नसेलच असं म्हणून आपण सोडून देतो.पण समोरच्याला काही कळत नाहीये. किंवा आहे तसं चांगल चाललय.याचाच फायदा घेऊन समोरचा आपल्याला केव्हा गुंडाळतो समजतही नाही. आणि मग कधीतरी वास्तव समोर येतं आणि सगळच कोलमडून जातं.
पण शेवटी इतकच की , प्रत्येकाला आपापला जोडीदार चांगला माहीत असतो.त्यामुळे संशय आणि सत्य दोन्ही बाजू व्यवस्थित हाताळल्या तर गोष्टी ओळखायला कदाचित सोपं जाईल. आणि प्रत्येक गोष्टीला काही अपवाद असतातच तसच…प्रत्येकवेळी अशा कारणांमुळे जोडीदारावर संशय घेणं चुकीचही आहे.
कारण दोघांच आयुष्य एक असलं तरीही दोघांना स्वतःचं स्वतंत्र एक अस्तित्व असतं हे आपण विसरता कामा नये.गोष्टी जशा खऱ्या असु शकतात तशाच त्या खोट्याही असु शकतात. अगदी तसच जोडीदाराचे बाह्यसंबंध…???हा केवळ संशय असु शकतो किंवा मग सत्यही असु शकतं.त्यामुळे शक्य होईल तितका मोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न दोघांनीही केला पाहिजे. म्हणजे संशय,सत्यता यामध्ये आयुष्य जास्त गुंतत जाणार नाही…..!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



Best