तिचा केविलवाणा प्रश्न….कधीतरी माझ्या जागी तुला ठेवून बघं…!
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे (चिंतामणी चौक)
तुम्ही सर्वांनी ते चित्र पाहिलं असेल कदाचित, ज्यामध्ये एक व्यक्ती सहा 6 या आकड्याच्या इकडच्या बाजूने उभी असते, आणि दुसरी व्यक्ती तिकडच्या बाजूने, आता जी इकडच्या बाजूने उभी आहे, ती व्यक्ती सहाचं म्हणणार….
आणि जी व्यक्ती तिकडच्या बाजूने उभी आहे, ती त्याला नऊच म्हणणार …… आता वास्तविक दोघे बरोबरच असतात ,पण फरक असतो फक्त ज्याच्या त्याच्या जागी राहून पाहण्याचा…..
आपल्या आयुष्याच्या प्रवासात सुद्धा असेच असते ,आपण आपल्या जागी बरोबर असलो, तरी समोरचा सुद्धा चुकीचा नसतो, फक्त थोडं त्याच्या जागी स्वतःला ठेवून समजून घेतलं तर …
ती घरासाठी झिंजत असते,
तोही राबतचं असतो,
ती घराला सजवत असते,
तो ही घर फुलवतचं असतो,
ती घराला घरपण देते ,
तो हि घराचं मांगल्य असतो,
ती ही माणसं जोडत जाते,
तो ही नाती जपत असतो,
ती ही झटत असते घराला पुढे नेण्यासाठी,
तो ही पै-पै साठवतो आपल्या लेकरांसाठी ……
स्त्री म्हणून जगताना हवं तरी काय असतं…. वेदनेच्या सुरात तिच्या प्रेमाचा स्पर्श हवा असतो…. आपण व्यस्त असतो आपल्या कामात तरी तिची लगबग सुरूच असते, बोलत नसते स्त्री कधी तिच्या दुखण्यावर …माहिती असतं , सर्व तिला जबाबदारी घराची असते तुमच्यावर… पण ती ही घराचं गोकुळ फुलवत असते रोजचं…..
तिच्या निरागस प्रेमाला नाही हवं सोनं- चांदी ,नकोचं काही दागिने मिरवायला, नाही हवे तिला साडी-चोळी आणि बांगड्या… कितीही स्वातंत्र्य असलं तरी तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेवर अनेक असतात मर्यादा…..
ती रुसते, ती चिडते ,ती रागावते, देखील ती सुद्धा मानव आहे, तिला सुद्धा भावना आहेत परंतु सर्व अपेक्षा तिच्याकडुनच का ….?
ती आहे म्हणून घराचं घरपण शाबूत आहे, ती आहे म्हणूनच आपल्या अंगणातील तुळशी ला सुगंध आहे, तिच्या कितीतरी भूमिका ती रोजच निभावत असते,
काही आपल्याला माहितीसुद्धा नसतात ……
पण ती विनातक्रार रोजच निभावते ….
ती विश्व निर्माती आहे, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून आपली जबाबदारी न विसरता रोजचं संघर्ष करीत असते,
ती आपल्या विश्वात एवढी रममाण होते ,की स्वतःचं काही विश्वा असते याची तिला भुरळ पडते….
आपल्याला कधी कधी ह्या गोष्टी दिसतच नाही… कामाचा प्रेशर मुळे किंवा काही न पेलवणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे,
आपली चिडचिड होते, राग येतो, आणि आपण नकळत कधी कधी तिच्यावरचं उतरवतो……
तरीही तुम्हांला ती समजून घेते, प्रत्येक परिस्थितीत तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी असते…
सासर आणि माहेर या मधला ती एक दुवा असते ,
कितीही झालं काही तरी सर्व पोटात घालून चेहरा मात्र हसत ठेवते ,
सांगा तरी तिला काय हवे असते, आपण तिला आपल्या घरी आणलेलं असतं..,
आपला तिच्यावर हक्क गाजवण्यापेक्षा तिलाही काही हक्क असतात,
पुरुषप्रधान असला की सारं घरच त्याच्या मर्जीने चालावं अशी त्याची इच्छा असते….,
पण घरात प्रत्येकाला एकमेकांच्या कष्टाची जाणीव असावी, प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची आपापल्या पद्धतीने जगण्याची मुभा असावी,
ती सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते ,कधी कधी कमी पडत असेल ,काही गोष्टी नाही जमत असतील ,पण ती ज्या विश्वासावर आपल्यासोबत आलेली असते ….,
त्या विश्वासाला आपण कायम जपलं पाहिजे …..
मी असं म्हणत नाही की सर्वचं याबाबतीत सारखे असतील ,
परंतु असं वाटणं स्वाभाविक आहे,
स्त्रीच्या त्या कितीतरी असीम त्यागाभोवती तिने सहन केलेल्या किती तरी रोजच्या महिन्याला द्याव्या लागणाऱ्या अग्नि परीक्षेसाठी तिचा केविलवाणा प्रश्न असतो …..
‘कधीतरी माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ…..!
स्त्री आपलं दुःख कधीच बोलून दाखवत नाही, कारण तिला माहिती असतं आपण आपल्या घराला सांभाळण्यासाठी आपल्या दुःखाची ती कधीच जाणीव होऊ देत नाही….
मनाच्या खोलावरती कितीतरी असंख्य दुःखाचे काटे दाबून ठेवलेले असतात …
आज अचानक बायकोविषयी मनात विचार आला ,
तिचा चेहरा बोलका वाटू लागला,…
सांगायचं तिला भरपूर काही असतं …..मला बघून शांत होऊन जाते ,
तिला कळतात माझ्या मनीचे भाव सर्व,
पण मला पडतात का तिच्याबद्दलचे……?
मी कसाही असलो तरी ती सांभाळूनच घेते मला ,
माझ्या लेकरांना आई बाबांना मी मात्र रममाण असतो, माझा विश्वात,
पण तिचा केविलवाणा चेहरा बघून सगळा शीण नाहीसा होऊन जातो …..जगण्याची उमेद निर्माण होते …….!
ती नेहमीच माझ्यासोबत उभी असते मग परिस्थिती कशीही असो…….
” कशाची उपमा नाही खरंच तिच्या प्रेमाला,
तिच्या जागी ठेवून बघा स्वतःला, हा प्रश्न पडलाच पाहिजे प्रत्येक पुरुषाला”……..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


