Skip to content

पत्नीचे प्रेयसीत रूपांतर करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया

पत्नीचे प्रेयसीत रूपांतर करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया


सोनाली जे


अकबराने बिरबलाने विचारले भाकरी का करपली, घोडा का अडला आणि बायको का रुसली ? त्यावर बिरबल म्हणाला न फिरविल्यामुळे..

बघा पत्नी ही प्रेयसी आहे असे समजून फिरवून आणा..बघा ती खरेच प्रेयसी सारखेच हसून , खेळून , समजून आनंद घेण्याचा आणि देण्याचा ही भरभरून  प्रयत्न करेल.

लग्नापूर्वी ची प्रेयसी जिच्याशी लग्न झाले की प्रेयसीचे रूपांतर पत्नी मध्ये होते.किंवा arrange marriage असेल तर लग्नापूर्वी बघितलेले स्थळ आणि लग्नानंतर  पत्नी च.

लग्नापूर्वी ची प्रेयसी किंवा सांगून आलेली मुलगी यांचे वर्तन लग्नानंतर बदलते असे का वाटते बरे..अगदी साधे बघा लग्नापूर्वी जी पूर्ण वेळ आपल्या करिता उपलब्ध असते , मोकळेपणाने बोलणे , फिरणे असेल समजून घेणे असेल. कधी छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद झाले तरी समजून घेवून शांतपणे एकमेकाला जवळ घेणे असेल किंवा पुढे जाणे असेल.वाद झाले तर ते विसरण्या करिता मग कधी बाहेर फिरायला जाणे , कधी मस्त पैकी candle light dinner,  तर कधी movie अगदीच काही नाही तर लाँग ड्राईव्ह ..जेणेकरून दोघेही मनाने मोकळे होतील ..

लग्नानंतर बरेचदा पती – पत्नी एकमेकांना जास्त गृहीत धरतात. शिवाय संसरतल्या जबाबदाऱ्या , रोजचे routine , नोकरी ,व्यवसाय असेल तर तो यात , मुले बाळे झाली की त्यात, त्यांची शिक्षण , कधी त्यांची आजारपणे, अभ्यास, घरातली कामे , बाहेरची कामे, मुलांच्या activity क्लासेस मध्ये गुंतून पडतात.

आणि यात काय होते की पती – पत्नी ला एकमेकांच्या करिता वेळच मिळत नाही , बोलायला ही नाही , गरजा समजून घ्यायला ही नाही , किंवा पूर्वी सारखे मोकळे पणाने , मनात येईल तेव्हा त्या गोष्टी करण्याकरिता..आणि सगळ्यात महत्वाचे होते काय की एखादी गोष्ट मिळवे पर्यंत आपल्याला तिची जास्त गरज भासते ..ती मिळविण्याकरिता आपण प्रयत्न जास्त करतो. पण जेव्हा ती मिळते तेव्हा ती आपलीच आहे , आपल्याला मिळाली आहे आणि आता ती कुठे जाणार नाही ही मानसिकता निर्माण होते दोघांच्या ही बाबतीत.

पत्नी चे रूपांतर जर परत प्रेयसी मध्ये करायचे असेल तर खरेच काही गोष्टी जरूर कराव्यात  :-

१.आपली पहिली  priority  पती ने पत्नी च्या भावना  तर पत्नी ने पतीच्या भावना जपल्या पाहिजेत एकमेकांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत .शारीरिक असतील किंवा मानसिक.जसे ऑफिस मध्ये कामाचा तणाव असेल तर ते ऐकून घेवून स्ट्रेस किंवा चिंता या गोष्टी मनात कोंडून न ठेवता मोकळेपणाने आपल्या व्यक्तीसोबत बोलताना त्यातून मार्गदर्शन ही मिळते.कधी शारीरिक गरज असते त्यातून ही बरेचदा स्ट्रेस कमी होतो रिलॅक्स होत असतो . hormonal balance होतो.

भावनिक दृष्ट्या ही secure feel करत असतो , प्रेमाचे आपले माणूस आहे , आपली काळजी घेणारी , आपल्या इच्छा समजून घेणारी, आणि मानसिक ताण ही बोलून कमी करणारी ..तसेच स्त्री पुरुष यांच्या मध्ये असणारी नैसर्गिक ओढ , आकर्षण समजून एकमेकांना साथ देणारी असतील, आणि त्यात पूर्वीसारखाच मोकळेपणा असेल , आता या वेळी ही कामे आहेत , हे करायचे आहे , मग घर काम, मुले , इतर जबाबदाऱ्या या न संपणाऱ्या आहेतच ..पण जेव्हा गरज आहे त्याक्षणी ती गोष्ट केली तर पत्नी नक्कीच प्रेयसीची भूमिका अतिशय सुंदर पार पाडू शकेल.

२. पती आणि पत्नी मध्ये विश्वास , आदर , प्रेम , समजूतदारपणा या गोष्टी जर असतील ,जसे समजा पती मोठ्या कंपनी मध्ये कामाला आहे आणि ऑफिस मध्ये  खूप सुंदर मुली आहेत त्याचे रोज कामानिमित्त मुलींबरोबर बोलणे होते, भेटणे,  कामाविषयी चर्चा या होत असतात कधी बाहेर पार्टी होत असतात , येण्यास उशीर होत असतो तेव्हा पत्नी पतीवर अविश्वास दाखवित असते..तो आपल्या हक्काचा म्हणून ती उगीचच  चिडचिड करते .  आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करते..त्या पेक्षा पती जिथे काम करतो तिथले कामाचे स्वरूप आणि गरजा लक्षात घेतले पाहिजे.  आपण बायको म्हणजे आपलाच हक्क असे भाव मनातून काढून टाकले पाहिजेत. पतीला ही त्याची स्पेस , मोकळीक दिली पाहिजे. तो अनुभवी आणि संयमी असेल तर त्याला कारण नसताना विरोध न करता ऐकून घेतले पाहिजे..

कधी त्याने त्याच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्री सहकारी कलिग ची तारीफ केली काम असेल किंवा सौंदर्य तर त्यावर चिडचिड न करता तिचे कौतुक ही केले पाहिजे ..आणि त्यातून आपण शिकण्यासारखे काय आहे हे बघावे..जसे एखादी कलीग तिचा ड्रेसिंग सेन्स खूप सुंदर असतो..साधा पण attractive , काळी सावळी असेल तरी नीट नेटके रहण्यातून जास्त उठून दिसणारी ..तर तिच्याकडून ते गुण घेवून आपल्या पतीला आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करावा , सुंदर अशी केशरचना , हलकासा मेकअप , आकर्षक रंगाचा ड्रेस, साडी , म्हणजे कायम पती पत्नी याच भूमिकेत न राहता ते पूर्वीचे दिवस आठवून किंवा खरेच एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराला भेटायला जाताना कसे छान आवरून , सजून  – सवरून जाते, तसेच

पत्नीने ही ऑफिस मधून पती घरी येण्यापूर्वी घर साफ , नीट नेटके ठेवावे, आणि स्वतः ही छान आवरून,  फ्रेश मुड मध्ये तयार व्हावे, आल्यावर थोडे फ्रेश होवून रिलॅक्स होवू द्यावे दिवस कसा होता , धावपळीचा असेल तर ते ऐकून घ्यावे , कमाचाही ताण बोलून मोकळा होतो आणि प्रसन्न मनाने केलेले स्वागत , आपलेपणाची विचारपूस यातून एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते..आणि टिकून ही राहते .

३. जर ती अनुभवी आणि संयमी असेल तर तिला कारण नसताना विरोध न करता तिचे  पुरुषाने ऐकून घ्यावे., तसेच पत्नी ने ही. Priority  पती आणि पत्नी  च्या भावना ना दयावी मग स्वतःचा पुरुषार्थ किंवा पुरुषी  इगो. आणि खरे तर तसेच पतीच्या ही बाबतीत पत्नी ने ही वागावे , उगीचच बायको म्हणून सतत अधिकार गाजवू नये.. मोकळेपणाने बोलणे , सामंजस्य , कोणाचे चुकले काही , विसरले तरी सतत चुकले कसे यावरून बोलू नये तर विषय सोडून द्यावेत .एकमेकांना समजून घेणे जरुरीचे..

४. जबाबदारीतून थोडा मोकळेपणा : सतत घरच्या जबाबदाऱ्या , मुलांच्या जबाबदाऱ्या , ऑफिस चे ताण तणाव यात राहून चिडचिड होते, तोच तोपणा कंटाळवाणा होतो, मीच का करायचे , माझीच का जबाबदारी यातून वाद  ही होतात , मने कलुशित होतात.

याउलट कधी तरी दोघांनीच वेळ काढावा , सगळे काही काळा साठी विसरून फक्त आपण दोघे हा विचार करून कधी सोबत बसून मस्त वाफाळलेला चहा घ्यावा , गप्पा टप्पा मारत थोडे रिलॅक्स बसावे, घरात निवांतपणा नसेल तर बाहेर हॉटेल मध्ये जावे , कधी तरी मुले , घरातल्या वडील धारी व्यक्तींवर थोडी जबाबदारी सोडून दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणीं फिरायला जावे, कधी movie , तर कधी एकमेकांच्या करिता भेट वस्तू आणावी..

कधी एकत्र शॉपिंग ला जावे, खरे तर यातून एकमेकांच्या आवडी निवडी समजतात , मग खाणे पिने असेल , रंगसंगती असेल , किंवा कशा प्रकारची गोष्ट आवडते हे लक्षात येते..आणि ती अजून जवळीक साधण्यात मदत करते.. जसे प्रियकर प्रेयसी लग्नापूर्वी एकमेकांना खुश ठेवण्याकरिता , त्यांच्या करिता एखादी गोष्ट करून , भेट वस्तू देवून ..वस्तू ही एक निमित्त आहे जवळ येण्याचे किंवा आवडी निवडी समजून घेण्याचे ..तसे लग्नानंतर केले तरी  दोघांमधले अंतर कमी होवून ओढ वाढणार च ना!!

रोजच्या रूटीन मधून हा होणारा बदल ही आपल्यात उत्साह वाढवीत असतो आणि एकमेकांचा सहवास प्रफुल्लित करतो , रिलॅक्स करतो , भावनिक दृष्ट्या मनासिक  आधार ही देतोच पण शारीरिक दृष्ट्या जवळ येण्यास ही मदत करतो..कारण बरेचदा मुले काय म्हणतील, मोठे काय म्हणतील हे विचार , लाज एकमेकांपासून जवळ येण्यास  अडथळा आणत असतात..त्यामुळे एकमेकांनी थोडा आपला सहवास वाढविण्याकरिता वेळ देणे गरजेचे असते तर पत्नी मधली प्रेयसी आणि पती मधला प्रियकर ही जागे होतील..

संसार आणि बंधने हेच विश्व यापेक्षा संसारात ही दोघांची सुरेल आणि सुरेख साथ होवू शकेल.

५. प्रियकर आणि प्रेयसी कसे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात.. जळी,  स्थळी,  काष्ठी, पाषाणी सर्वत्र त्यांना तेच दिसत असतात..फोन करून , भेटून , चौकशी , कधी कधी छान भेटी देवून , एखादे surprise देवून , दोघांच्यात छान वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात..एकमेकांस जपण्याचा प्रयत्न करतात..आणि एकमेकांविषयी ओढ निर्माण करतात..एकमेकांची एकमेकांना गरज आहे..

त्यांना आपल्या जीवनात स्थान आहे..I love you , I miss you, ya वाक्यातून त्यांचे प्रेम , विरह दोन्ही व्यक्त होत असते..कधी आनंद एखाद्या छान मिठी मधून व्यक्त होत असतो तसे आपण ही हे छोटे मोठे आनंद मिळविले तर पती पत्नी दोघेही प्रियकर आणि प्रेयसी सारखे एकमेकांची वाट बघणारे , एकमेकाला जपणारे , एकमेक आयुष्यात टिकविण्यासाठी , प्राप्त करण्यासाठी चे प्रयत्न कायम ठेवले आणि रोज दिवसाची नवीन सुरुवात , काल चा दिवस संपला आज नवीन गोष्टी करताना परत नवीन उत्साह ,आनंदाने सुरुवात करा..जसे प्रियकर प्रेयसी थोडे लांब गेले तरी विरह जानवितो ..

तसेच जरी पती पत्नी मध्ये ही कायम भेटण्याची तीच ओढ राहिली ..कोणीच कोणावर अधिकार गाजविण्याची गरज नाही. रोजच्या दिवशी प्रियकर प्रेयसी सारखे आपल्याला एकमेकांना जपायचे आहे, आपल्या आयुष्यात टिकवायचे आहे ही भावना मनापासून जगा..

६. लग्नानंतर ही बायकोच्या आणि नवऱ्याच्या ही  बकेट लिस्ट मधल्या wish पूर्ण करण्याचा प्रयत्न करा..लग्न झाले म्हणजे इतिकर्तव्यता संपली हेच विचार काढून टाका..तिने किंवा त्याने एकमेकांकडे दुर्लक्ष न करता बारकाईने लक्ष दिले पाहिजे..आयुष्याचा प्रत्येक दिवस भरभरून जगण्याचा प्रयत्न करावा.

७. पती पत्नी ने एकमेकांच्या गुणांचे , सौंदर्याचे आणि छोट्या छोट्या गोष्टींचे ही कौतुक केले पाहिजे ..तर च दुसऱ्या कोणाकडून आपल्या कौतुकाची अपेक्षा राहत नाही ..

८. पती पत्नी ने कधी हे नाही ते नाही , हे असेच ते तसेच अशा कुरबुरी करू नयेत ..निरपेक्ष हेतू ने एकत्र यावे..कोणत्याही अपेक्षा खूप वाढवू नयेत जसे थोडक्यात गोडी..एकमेकांना समजून , बोलून मार्ग शोधावे.अंतिम निर्णय देवून रिकामे होवू नये तर एकमेकांचे स्थान आयुष्यात महत्वाचे आहे हे जाणवून द्यावे.

मनांत खूप साचलं की
कुणाजवळ तरी बोला,
ऐकणाऱ्याचा खांदा
होऊ द्या की ओला.

धरण पूर्ण भरल्यावर
जसे दरवाजे उघडतात,
माणसं तसं वागत नाहीत
म्हणून तब्येती बिघडतात.

त्यामुळेच आग्रह आहे
मन मोकळं करा,
एखाद्या तरी मित्राची
गरज हात हातात धरावे असे वाटत असेल तर आपला नवरा च आपला मित्र , प्रियकर आहे असे समजून मन मोकळे करायला काय हरकत ??

जे वाटतं ते बोलून टेन्शन
करा कमी,
व्यक्त होण्यातच
आरोग्याची हमी.

जर कुढत बससाल तर
विपरीत परिणाम होणारच,
बीपी, शुगर, ECG
कमी जास्त होणारच.

दुःख सांगायला कोणी नसणे
जागतिक समस्या आहे,
अनेक रोगाचं कारण हे
कुढत बसणं आहे.

रडायला जर जागा नसेल
लावा प्रॉपर्टीला काडी,
काय करायचं सोनं चांदी
बंगला फ्लॅट गाडी.

जे होईल ते होईल म्हणून
झुगारून टाका भीती,
प्रत्येक क्षण जगून घ्या
नका म्हणू ‘आत्ता उरले किती ‘?
म्हणूनच समजा प्रियकर प्रेयसी ची जोडी आणि शोधा  एकमेकात नवरा बायको पेक्षा प्रियकर प्रेयसी ची गोडी..

सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत, कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून नवरा बायको दोघांनी ही कायम एकमेकांची गरज आहे आणि एकमेकाला रोज प्राप्त करायचे आहे, मिळवायचे आहे  ही भावना ठेवून हास्य आणि सहनशीलता ठेवली तर पती पत्नी चे रूपांतर प्रियकर प्रेयसी मध्ये च होवून सुखी जीवनाचा मूलमंत्र च जणू..

लाभलेल्या पत्नीचे प्रेयसी त ज्याला रूपांतर करता येते तोच खरा प्रियकर.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!