Skip to content

लग्न झाल्यानंतर दोघांच्याही प्राॅब्लेममध्ये भर पडतें, असचं चित्र का दिसतं….?


लग्न झाल्यानंतर दोघांच्याही प्राॅब्लेममध्ये भर पडतें, असचं चित्र का दिसतं….?


सौ. मयुरी महेंद्र महाजन

पुणे.


लग्न ही आपल्या समाजव्यवस्थेची एक खूप छान अशी परंपरा किंवा त्याला रीतीरिवाज म्हणता येईल, परंतु बदलत जाणारी जीवनशैली, याबरोबरच जनरेशन मध्ये घडून येणारे बदल ,यामध्ये लग्न नावाची कन्सेप्ट खरंतर ती ज्या उद्देशाने निर्माण केली गेली.. त्याचे आजचे चित्र काही अंशीचं ऊरलेले बघायला मिळते ……

का? कारण लग्न ही प्रथा असली तरी ती खूप मोठी जबाबदारी आहे ,एकमेकांना सांभाळून घेण्याची सोबतीने एकमेकांना साथ देण्याची सर्वात आधी आपण दोन भाग बघू…

*एक लग्नाआधीचा भाग*

अवस्थेत आपल्या पदार्पण होत असताना किंवा किंबहुना याला अपवाद आहेतच ,काही ठिकाणी आजही लवकर लग्न करून दिली जातात काहींना आपल्या जाती धर्माची परंपरा पार पाडावी लागते, वगैरे….!

असे काही बालपणापासून पौगंडअवस्थेपर्यंत शरीरात होत जाणारे विविध बदल ,आणि यासोबत जुळवून घेणे प्रत्येकजण यातून जात असतो… जो पर्यंत आपण आपल्या आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच असतो तोपर्यंत आपल्याला कुठली संकटे, असतात, कुठली दुःख असतात, याची जाणीव होत नसते… आपली दुःख त्यावेळी वेगळी असतात… आपल्याला आपल्या घरासाठी कमवायचं नसते फक्त आपलं शिक्षण, मित्र मैत्रिणी आणि एन्नजाॅयमेंट बस..,….! काही जणांच्या वाट्याला बालपणातच घराची जबाबदारी असते, त्यामुळे त्यांचे खांदे लहानपणापासूनचं मजबूत झालेले असतात …शिक्षण घेणारी काही लोकं लवकर लग्न करत नाही…

सेटल होण्याच्या विचारात असतात, पण एकदा निघून जाणारं वय मात्र आपल्या हातात नसतं… आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात… आजची जनरेशन त्याला जास्त प्राधान्य देताना दिसून येते ….

लग्नानंतर दोघांच्याही प्रॉब्लेम मध्ये भर पडते असे चित्र बघायला मिळते…. त्याला काही अंशी कारणेही तशीच आहेत …..

1 – आजकालची जनरेशन ही स्वतंत्र विचारसरणी घेऊन वावरते, जेव्हा तुम्ही लग्नासारख्या गोड बंधनात एकत्र येतात त्यासाठी दोघांनाही काही अंशी एकमेकांच्या विचारांचा आदर करून आपले विचार मांडले पाहिजेत .

2 – मुली ह्या त्यांचं घर सोडून आलेल्या असतात, त्यांना नवीन माणसं नवीन घर यामध्ये रुळायला वेळ द्यावा लागेल.मुलींनी जरं याआधी आपल्या घराची जबाबदारी सांभाळलेली असेल तर अवघड जात नाही…

3- त्यातच कमावणारी व कामाला जाणारी असेल….. तर तिच्याकडून जास्ती कुठल्या कामाची अपेक्षा नको असंच काही चित्र असतं….. त्यात दोघेही काम करणारे म्हटल्यावर घराची जबाबदारी मात्र दोघांनी मिळून केली तर काही गोष्टी टाळता येतील …..

4 -मुलं जरी कमवतं असली तरी लग्नानंतर अजून एक वाढणारी जबाबदारी यामुळे नक्कीच समस्यांमध्ये वाढ होते .

5) -मुलगा असो व मुलगी जिथे दोन जीव एकत्र आले म्हटल्यावर समस्याही उद्भवणारचं… पण आलेल्या प्रत्येक समस्येला आपण दोघांनी साथीने सामोरं गेलं तर आपलं आयुष्य अजूनच सुखाचं होऊ शकते… जोपर्यंत लग्न झालेलं नसतं तोपर्यंत आपण जगण्यासाठी स्वतंत्र असतो… परंतु लग्नानंतर येणारी जबाबदारी ,मर्यादा ,बंधन एकार्थी असं नाही की लग्नानंतर स्वातंत्र नसते ,पण आपल्या जीवा सोबतचं अजून कोणीतरी जोडलेलं असतं प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट करत असताना आधी आपल्या साथीदाराचा, कुटुंबाचा, सर्वतोपरी विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो…

“जिथे मनुष्य आहे तिथे प्रॉब्लेम आहेचं….”

मग कोणाच्या स्वभावाचा असो, वागण्या बोलण्याचा असो, इतकच काय विचारांचा सुद्धा असतो, कारण बहुतेकदा असे दिसते की आपण ज्या पद्धतीने विचार करतो समोरचा सुद्धा त्याच पद्धतीने विचार करेल असे होत नाही ना….!

विचारांमध्ये गॅप निर्माण होतो, कधी कधी आपणही बरोबर असतो आणि समोरचा सुद्धा बरोबर असतो, मग विचारांमध्ये गॅप असतो,
तो गॅपचं आपला प्रॉब्लेम बनतो कधी कधी आपण दोघं बाजूंनी विचार केल्यावर कोणाला तरी एकाला माघार घ्यावीच लागते, तेव्हाच कुठलाही निर्णय लागू शकतो.

म्हणून सारासार विचार करूनच आपण कुठलीही समस्या सोडविली पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या मताचा आदर करू आणि समोरच्या व्यक्तीच्यासुद्धा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न दुखावता काटा काढण्यासारखे…… अगदी

प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत, यामध्ये जर आपण नको असलेल्या गरजा किंवा खरंतर काहीच आवश्यकता नाही अशा गरजा कमी करू शकलो तर मला वाटतं नक्कीच आपण एकमेकांचे थोडे का होईना प्रॉब्लेम नक्कीच कमी करू शकतो ,आणि हो शेवटचं आपला जोडीदार कसाही असू दे रंगाने गोरा असेल, सावळा असेल, कमाई कमी असेल जास्त असेल, स्वभाव दुसऱ्या पेक्षा काही कमी-जास्त असेल, शरीराने काही गोष्टींमध्ये अपंगत्व असेल एकच निर्धार असावा कायम एकमेकांना पाठिंबा देत राहायचं .

कारण या जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे, आपण कितीही ठरवलं तरी कुणालाच कुणासारखे बनवू नाही शकतं, त्यामुळे सतत स्वतःला सांगत राहा, ” येऊ देत प्रॉब्लेम कितीही सोडत राहु साथीने सारी”


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!