Skip to content

ज्यांना कुणाच्याही सहवासाची गरज वाटत नाही, त्यांनी लग्न करावे काय?

ज्यांना कुणाच्याही सहवासाची गरज वाटत नाही, त्यांनी लग्न करावे काय?


सोनाली जे.


आज पर्यंत जे शिकलो, जे अनुभव घेतले त्यात नेहमी एक गोष्ट मी सांगत आले आहे की , मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, अवती भवती चे वातावरण , लोक, मित्र – मैत्रिणी , नातेवाईक , शिक्षक , आई – वडील, नवरा – बायको , मुले – मुली, अगदी गाडी बिघडली तरी मेकॅनिक, दुकानात गेलो तरी दुकानदार या सगळ्यांचे सहवास आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे लाभत असतो त्या शिवाय पुढे जाणे शक्य नसते..
असे जर म्हणले की मला कोणाच्या सहवासाची गरज नाही तर आजारी पडलात तर वेळेत डॉक्टर कडे कोण घेवून जाणार ? आणि dr ही एक व्यक्तीचं आहे ना!!

ज्या लोकांना असे वाटते की मला कोणाच्याही सहवासाची गरज नाही त्यांनी खरेच सारासार विचार करावा.. अशी मानसिकता का झाली ?? असे का वाटू लागले??

१. स्वतः मधल्या उणिवा : तुमच्या स्वतः मध्ये उणिवा असतील तर इतर लोकांबरोबर पुढे जाताना, पटवून घेताना , आपल्यातल्या उणिवांची जाणीव होते. जसे शैक्षणिक दृष्ट्या आपल्याकडे knowledge नसेल तर आपण आपल्या गोष्टी पटवून देवू शकत नाही..कारण माझ्या कडे त्या विषयातले ज्ञान च नाही तर मी कोणते मुद्दे मांडू शकेन ? नाही ना..??

तसेच व्यवहारातही आहे..व्यवसायात ही आहे..आणि नात्यांमध्ये ही आहे. याचे कारण काय तर नाती ही एका बाजूने सांभाळली गेली , दुसऱ्याला त्याची गरज नाही असे असेल तर किंवा एखादा खूप हुशार आहे , अनुभवी आहे , आर्थिक दृष्ट्या उच्च पातळी वर आहे आणि दुसऱ्या व्यक्ती मध्ये हे बघून कॉम्प्लेक्स येत असेल, त्याला आपल्यातल्या उणीवांची जाणीव होत असेल तर तो समोरच्या हुशार परंतु अतिशय down to earth असणाऱ्या समोरच्या नातलागा पासून दूरच राहण्याचा प्रयत्न करेल…

२. सततचे नकारात्मक विचार कधी स्वतः विषयी तर कधी इतरांच्या विषयी.
३. पूर्वी आलेले अनुभव : – जसे व्यक्ती , नातेवाईक यांच्या बाबतीत वाईट अनुभव आले असतील.

४.सतत चिंता, भीती: – रोजच्या जीवनातले प्रश्न सोडविताना वाटणारी भीतीनं, किंवा असे घडून गेले पुढे काय याची चिंता सतावत असते.

५. मनाची अवस्था : अनेकदा असे विचार येतात की आपण एखाद्याच्या जास्त जवळ गेलो तर ती व्यक्ती आपल्यापासून कायम दूर जाईल..किंवा आपल्या नशिबात च सगळ्यांपासून दूर राहणे आहे..मला कोणीच जवळ करत नाही.

६. Introvert personality : काही व्यक्ती स्वतच्या कोशात च गुंग असतात..त्यांना इतरांच्या बरोबर बोलावे , त्यांच्यात मिक्स व्हावे असा त्यांचा स्वभाव च नसतो.

७. गरजा मर्यादीत : काही व्यक्तींच्या गरजा खूप मर्यादित असतात.जसे मी एकटा / एकटी असेल तरी काही फरक पडत नाही..माझे मी सर्व करू शकते.मग दुसऱ्या कोणाच्या सहवासाची काय गरज.

८. इगो..काही व्यक्ती खूप egoistic असतात..कोणावाचून माझे काहीच अडत नाही असेच कायम म्हणणारे..माझे सगळे करण्यास मी समर्थ आहे असे म्हणणारे असतात.

आपल्याला कोणाच्या ही सहवासाची गरज नाही असे वाटणे हेच चुकीचे वाटते ना..कारण आयुष्यात पावलोपावली आपल्याला सहवासाची गरज असते . आपण बाळ असताना आई वडील , भावु , बहीण , आजी , आजोबा , काकू , काका, या सगळ्यांच्या सहवासात असतो .मोठे होत जातो तेव्हा मित्र मैत्रिणी, शिक्षक, मोठे झाल्यावर प्रियकर , प्रेयसी, नवरा , बायको, मुले, ऑफिस मधले सहकारी , जिथे राहतो तिथले शेजारी , आजू बाजूचे लोक, रोजच्या जीवनात लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्याकरिता त्या पुरविणाऱ्या लोकांची ही ..आपल्याला गरज लागतेच..त्यांचा सहवास पाहिजे असतो तर च गोष्टी सुखकर होतील ..आपल्या भावना , आनंद , दुःख असेल किंवा गरजा एकमेकांसोबत शेअर करुन, चर्चा करून तोडगा काढून , किंवा विचार , ज्ञान, अनुभव यांची देवाणघेवाण करून मनात साठलेला ताण , चिंता , भीती , थोडक्यात भावनाना वाट मोकळी करून देत असतो..

आयुष्यात एकटे राहायचे ठरविले तरी ही एकटे राहूच शकत नाही कारण मनुष्य हा प्राणी असला तरी तो बुद्धिवंत आहे..आणि त्याला मन, भावना , गरजा सर्व आहेतच..त्याच करिता त्याला व्यक्ती , समाज यांची गरज आहेच..

भले एखाद्याला असे वाटत असेल की मला कोणाच्या ही सहवासाची गरज नाही तरी त्याने लग्न जरूर करावे..कारण लग्न हा भारतीय संस्कृती प्रमाणे संस्कार मानला गेला आहे पण Freud या प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञाच्या मते जसे भूक, तहान , ही basic need आहे..तसेच सेक्स ही सुधा बेसिक need आहे.आणि ही पूर्ण करण्याकरिता भारतीय संस्कृती लग्न संस्थेवर विश्वास ठेवते..

दुसरे म्हणजे आयुष्यभर कोणीच एकटे राहू शकत नाही..लग्न हे दोन विरुद्ध लिंगी लोकांमध्ये समाजाने मान्यता दिलेली एकत्र येण्याची समंती च.. जेव्हा ज्यांना वाटते की कुणाच्याही सहवासाची गरज नाही,तेव्हा लग्न हे त्यांनी तर ते जरूर करावे कारण , ही त्यांना मिळालेली संधी च असते..

आपल्या जोडीदाराच्या सहवासात राहून अनेक चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतात च, शिवाय जोडीदार जर सोशल असेल तर आपणही त्याच्याकडून social interaction करायला शिकतो. जर इतर लोकांच्यात जाण्याची भीती, बोलण्याची भीती , social phobia असतो..त्यावेळी जोडीदार जर खूप सोशल असेल तर त्याच्या सोबत इतरांबरोबर interaction करणे सोपे जाते आणि सोशल फोबिया कमी तर होतोच शिवाय आत्मविश्वास वाढतो.एक वेगळा कॉन्फिडन्स येतो की काही चुकले , उणिवा असल्या तरी आपला जोडीदार खंबीर साथ देणारा , पाठिंबा देणारा आणि सांभाळून घेणारा आहे.

उणिवा असतील तर जोडीदार कधी सांभाळून घेतो तर कधी त्या सुधारणा करण्याकरिता प्रयत्न , मग कधी स्वतः मार्गदर्शन , सहवासात तर कधी जे तज्ञ असतील त्यांचे मार्गदर्शन घेवून , एकट्याला भीती वाटत असेल तर आपण ही सोबत थांबून.

जोडीदाराच्या सहवासात जगण्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मोकळेपणाने घेता येतो, शिवाय सकारात्मक ऊर्जा मिळते..शिवाय लग्न संस्थेचे जे मूळ आहे वंश वृध्दी यातून आपण परत आपले बालपण जगत असतो .आपल्या जगण्याला , आयुष्याला एक नवीन उमेद मिळते.आपले विश्व च पूर्ण बदलून जाते..त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकवताना आपल्याला ही शिकण्याची संधी मिळतेच पण जिद्द वाढते, आयुष्याच एक ध्येय प्राप्त होते.. आपला परिवार आणि स्वतः काही तरी करत राहिलेच पाहिजे जसे आर्थिक स्थैर्य मिळण्याकरिता असेल, शैक्षणिक उन्नती करिता असेल , किंवा कौटुंबिक स्थैर्य असेल, किंवा समाजात एक स्टेटस असेल.

थोडक्यात ज्यांना कुणाच्याही सहवासाची गरज वाटत नाही, त्यांनी लग्न करावे च पण सहजीवनाचा आनंद लुटून घ्यावा..सहवासातून आपल्या एकाकी जीवनापेक्षा सहवासातले सुख उपभोगत जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे..आपले वाईट करण्याचा हेतू आपल्या सहवासात असलेल्या व्यक्तीचा कधीच नसतो..उलट आपले आई वडील आपली साथ आयुष्यभर देवू शकत नाहीत अशा वेळी आपल्या जीवन साथी चा सहवास आपल्याला आधार तर देतोच , पण आपले दुःख विसरण्यासाठी साथ देते.जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवते..नवीन

आशा निर्माण करतेच पण कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्या एकटेपणाची उणीव भरून काढते. जीवन सुंदर आहे त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्या करिता सहवासातून आयुष्याचा सुंदर बगीचा फुलविता येतो.स्वतः काही खुलविण्यासाठी हा सुंदर सहवास पाहिजेच पाहिजे..खूप साधी सोपी गोष्ट टाळी सुधा एका हाताने वाजत नाही..किंवा कोणाच्या पुढे नतमस्तक होताना आदराने केलेला नमस्कार याकरिता ही दोन हात च लागतात..

बैलगाडी करिता दोन चाके जशी महत्वाची असतात तसेच जरी इतरांचा सहवास आवडत नसेल तरी त्यांनी लग्न करावेच..नाही केले तर अजून एकलकोंडा होत जातील..आपण एखादी गोष्ट केली जसे ऑफिस मध्ये प्रमोशन असेल किंवा एखादे मोठे स्वप्न पूर्ण केले तर आपल्याला आपल्या माणसाला सांगावे त्याने कौतुकाचे दोन शब्द बोलावे , असे नक्कीच वाटते आणि अशावेळी अपयशातून यशाकडे केलेली वाटचाल , याची योग्य कदर आणि त्याचा अभिमान आपल्या सहवासातील आपली जवळची व्यक्ती जसे जोडीदार , मुले , यांच्या शिवाय अजून जास्त कोण करू शकेल??

आणि जसा सोबत असण्याचा सहवास तसेच सहवासातल्या व्यक्तीचा एक हलकासा स्पर्श ही आपल्याला भावनिक दृष्ट्या शांत करत असतो..उत्साहित करत असतो.

व. पु. काळे यांनी किती सुंदर मांडले आहे की, असा पार्टनर प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटतो. जो उपदेश करणार नाही पण साथ देईल. जो उणिवा दाखवून देईल पण दोष देणार नाही. कौतुक करेल पण अहंकार फुलवणार नाही. भेटेल असा पार्टनर? पण असं भेटेल का म्हणून? आपणच का नाही तसं व्हायचं? कुणासाठी तरी अशा स्वरुपाचा पार्टनर? किती कठीण आहे. आणि सोपंही.

बघा तुम्ही ही बघा प्रयत्न करून ज्यांना कुणाच्याही सहवासाची गरज वाटत नाही, त्यांचा पार्टनर होण्याची त्यांच्या बरोबर लग्न करून खऱ्या सहवासाची गोडी निर्माण करून सहजीवनाची सुंदर साथ.

आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला हे समजतच नाही उलट तो कमीच पडतो आणि प्रत्येक वेळी भेटण्यातली ओढ वाढवितो.
जीवन सुंदर आहे , जोडीदारासोबत ते अजून फुलवीत रहा.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!