Skip to content

स्रीत्व ही संकल्पना निसर्गनिर्मीत नसून समाजनिर्मीत असावी.

नायिका..


मधुरा धायगुडे


स्रीत्व ही संकल्पना निसर्गनिर्मीत नसून समाजनिर्मीत असावी असा निष्कर्ष आधुनिक स्त्री चा विचार करताना निघत असला तरी सध्याच्या सामाजिक मानसिकतेच्या बदलत्या काळात त्या धुसर होतात का?…असा विचार आला…

सामाजिक परिस्थिला स्त्री बळी पडते आहे मग साठोत्तर कालखंडानंतर स्त्रीमुक्तीची वृद्धिंगत झालेली चळवळ तिला मुक्त करते कि पुन्हा त्याच पुरुषप्रधान संस्कृतीदर्शक समाजाकडे जाण्याचा मार्ग दाखवते …स्रीचा सन्मान ही तर भारताची संस्कृतीयाचे ही भान विसरत गेलो तर ..

विनयभंग,बलात्कार,हुंडाबळी ,आत्महत्या अशा अनेक विकृत परिस्थितीत तिला सामोरे जावे लागते आहे स्त्री पुरुष समानता द्योतक कि घातक असाही विचार आला. स्त्री ला कमी लेखणारे निर्णय घेणे चुकीचे ठरेल

स्त्री सक्षमीकरणाचा विचार करताना स्री संरक्षण हा विचार प्रथम परस्रीला इजा पोहचवताना आपल्या स्त्री नात्यातील काही स्त्रियां चा विचार आठवला तर ..मन परावृत होईल.

प्रत्येक परिस्थितीत दोष कुणा चा म्हणता येणार नाही …चंगळवाद भोगवादाकडे झुकणारी जीवनमुल्ये रुजवण्याची परंपरा दिसून येते जीवनमुल्यांचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का?

स्त्री सुरक्षित तर समाज सुरक्षित खरे स्त्री सक्षमीकरण म्हणजे स्त्री संरक्षण महत्वाचे “स्त्री भृण हत्या “बेटी बचाओ बेटी पढाओ”असे असंख्य उपक्रम आपण राबवू लागलो खरे पण “स्त्री दाक्षिण्य” स्त्री संरक्षणासाठी नुसत्या तक्रारी नोंदून हे थांबेल ??

सुरुवात घरातूनच व्हायला हवी एक मुलगा वाढवताना स्रीचे चित्रण सकारात्मक हवे..

आधुनिक कालखंडात स्रीचे चित्रण कथांमधून कमी मात्र मालिकांमधून जास्त होते ते गृहीतक समाज मान्य करुन अनुकरण करतो ते सकारात्मक हवेच…असे ही वाटले

एका स्त्री मुळेच आपला प्रवास सुरु झाला याचे भान कोणत्याही वाईट क्षणी जपता येणं हीच कसोटी…मग खरी स्त्री संरक्षणचळवळीला सुरुवात झाली असे वाटेल स्त्री आपली अस्मिता ख-या अर्थाने सिद्ध करु शकेल सक्षम आधार असलेल्या भक्कम हाताची साथ तिला मिळाली जसे भाऊ पती वडील सहकारी अशा अनेक नात्यांची उकल घट्ट करु शकेल

हा ज्याचा त्याचा प्रश्न असा संकुचित विचार न करता प्रत्येकाने स्त्रीच्या अस्मितेची जपणूक सकारात्मकतेने केली पाहिजे अगदी स्त्रीनेही. कारण टाळी एका हाताने वाजत नाही हा मुद्दा ही महत्त्वाचा… प्रयत्न समान पातळीवर झाले तर आधुनिक कालखंडातील ती ख-या अर्थाने आजची नायिका ठरेल…..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!