
अपेक्षांच्या पलीकडे….
विद्या जाधेकर
चार एकरातील कोथिंबीरीला ४१ दिवसात १२ लाख ५० हजार रूपये मिळाले आणि या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना..!!
ही बातमी पाहून(फोटो प्रतिकात्मक असेल) त्या शेतकर्यांच्या तोंडावरील ते हास्य पाहून एक गोष्ट जाणवली…बर्याचदा अनपेक्षित घडलेल्या गोष्टी अनपेक्षित भावनाही निर्माण करतात. मग ते पैश्याशी निगडीत असो किंवा नसो..,.
आपण साध्या साध्या गोष्टीं करताना त्यातुन काही मिळण्याची घडण्याची अपेक्षा धरत असतो. काही वेळा तर खुप ‘planning’ करून आपण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करतो आणि या सगळ्यात जर आपल्याला अपेक्षित असे काही घडले तर आनंद समाधान मिळतेही पण अपेक्षाभंग झाल्यावर मात्र मानसिक स्थितीत गडबड होते मग पुन्हा नवीन जिद्दीने ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात पण कधी कधी अपेक्षित फळ मिळेल की नाही असा संभ्रम काहीशी भितीही मनात येते.
असेच काहीसे आपल्या जवळील माणसांबाबतही घडते.आपण कुणासाठी काही केले तर त्यांनी आपल्यासाठीही काही करावे, समोरच्याने आपला मान ठेवावा आपल्याला आदर द्यावा, प्रेमाने वागावे,अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे कमीअधिक प्रमाणात सर्वानाच असे वाटत असते आणि अशा एकनाअनेक अपेक्षा आपल्याला असतात….
या अपेक्षा एका मर्यादेपर्यंत असतील तर त्या ग्राह्य असतातही आणि वेळेनुसार त्याच्या प्रमाणात वाढ होण साहाजिक असले तरी समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या स्वतःलाही त्यांच ओझ वाटायला लागते. मग त्यातुन राहाते फक्त “adjustment”… आपल्याला हवी तशी वागणूक, इच्छित फळ नाही मिळाले की मग मन मारून, मनाची समजूत घालुन आपल्याला न मिळालेल्या गोष्टींचा विचार करायचीच सवय लागून जाते…
अशावेळी स्वतः च्या अपेक्षांना आवर घालुन आपण केलेल्या कामावर विश्वास ठेवुन समाधानी आयुष्य कस जगता येईल हे पाहु शकतो.. आपली क्षमता आोळखुन त्यानुसार प्रयत्न करू शकलो तर कदाचित त्यातून मिळणारा आनंद जास्त असेल, फक्त कुणीतरी सांगते बोलते म्हणून स्वतःवर लादलेल्या अपेक्षा ओझ वाटण्यासोबत आपल्यातील वेगळेपण बाजूला करते….
‘जेवढ्या अपेक्षा कमी तेवढे अपेक्षाभंगही कमीच असतील’…. कमी अपेक्षा ठेवून चांगले काम करून मिळणारे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले तर त्यातुन मिळणारा आनंद ,समाधान कुठल्याही आनंदापेक्षा माेठाच असेल.. आपण कुणासाठी खुप काही केले, प्रामाणिकपणा दाखवला, मानसन्मान दिला प्रेम दिले तरी समोरचा व्यक्ती आपल्यासोबत तसाच वागला पाहीजे अशी अपेक्षा करणे चुक नसले तरी ‘कुणी कसे वागावे’ हे आपण ठरवू शकत नाही बर्याचदा आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीनुसार, त्या व्यक्तिंचे आपल्या आयुष्यातील महत्व,आपल्या गरजानुसार वागणुक बदलतो.. अगदी हेच इथेही होत असावे.
अपेक्षाचे ओझे होऊ न देता त्यांना अपेक्षांच्या पलीकडे विचार केला तर त्यात मिळणारा आनंद, समाधान, अनपेक्षित फळ आपल्या चेहर्यावरन निखळ हास्य निर्माण करू शकेल….. !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

