Skip to content

तुमच्या मुलांचा ‘टॅलेंट’ कुठेतरी वाया जातोय का??

तुमच्या मुलांचा ‘टॅलेंट’ कुठेतरी वाया जातोय का??


मिनल मोरे

वाडा, पालघर


साकेत एक असा मुलगा ज्याचा सर्व लोक कंटाळा करायचे. तो आजूबाजूला असला की जमेल ते कारण शोधून त्याच्यापासून लांब पळायचे.. सहजच कोणाला सुद्धा वाटेल की हा मुलगा खूप अतरंगी मस्तीखोर असणार. पण तस तर अजिबात नव्हतं. कारण साकेत असा मुलगा होता, ज्याला नेहमीच प्रश्न विचारायची सवय होती. शाळेत शिकताना शिक्षकांना प्रश्न विचारणार, घरी असल्यावर घरच्यांना आणि बाहेर असताना नविन असं काही पाहिलं जे त्याला माहित नाही तर माहिती असलेल्या व्यक्तींना प्रश्न विचारणार..

एकदा साकेत चे वडील त्यांच्या ऑफिस च काम घरी करत असताना अचानक त्यांची महत्त्वाची डॉक्युमेंट त्यांच्याकडून नकळत delete झाली आणि अशावेळी काय करावं हे त्यांना कळतच नव्हत. जॉब च टेन्शन त्यांचे वरिष्ठ अधिकारी यावर काय react होणार या सर्वाचा विचार करत असताना साकेत तेथे आला आणि त्याने वडिलांची ती डॉक्युमेंट अगदी सहज शोधून दिली. यावर वडिलांनी त्याला विचारलं असता…. आयटी चे शिक्षक शिकवताना मी त्यांना हा संबंधित प्रश्न विचारला होता. त्यामुळे मला माहित झालं…आणि आज ते आपल्या कामात आल..त्यावेळी साकेत च्या घरच्यांना त्याचा अभिमान वाटला आणि हे सर्व शाळेत सांगितल्यावर त्याच्या शिक्षकांना सुद्धा त्याच कौतुक वाटल..

सहसा आपण काही नवीन पाहिलं की आपल्या मनात प्रश्न येतात की हे कसं केलं असेल , याचा उपयोग कसा करतात, किती छान आहे पण मला हे करता येईल का, या प्रश्नाचं उत्तर काय असेल.. पण समोरचा काही बोलेल.. आपण कस विचारायचं, नाही बाबा मला हे जमणार नाही, मी हे कसं करावं या सर्वात अडकून लाजून किंवा भीतीने आपण नविन काही शिकत नाही. आणि साकेत सारखी मुलं ज्यांच्या मनात जिज्ञासा असते नविन शिकण्याची. ते मात्र जे नव्याने पाहतोय ऐकतोय त्याबद्दल शिकून मोकळं होतात..

खर तर साकेत सारख्या व्यक्तींना आपण बहुतेकदा हसतो सुद्धा पण जे knowledge असते ते काहीवेळेस कितीही शिक्षण घेतलेला व्यक्ती असेल त्याच्याकडे सुद्धा नसते.

आपण आपल्यापुरते शिकतो म्हणजे जर मी कॉमर्स ची मुलगी आहे तर बँक कंपन्या याबद्दल माहिती ठेवणार किंवा मी जर सायन्स मधे शिकतेय तर मेडिकल, इंजिनिअरिंग याबद्दल माहिती ठेवणार आणि आर्ट्स असेल तर कला क्षेत्र किंवा अजून काही…

पण आपण बाहेरची माहिती मिळवायचा प्रयत्न करत नाही कारण माझा त्याच्याशी संबंध नाही, मला ते गरजेचं नाही, मला त्याचा काय उपयोग.. पण जे आपण शिकतो त्याचा कुठेना कुठे नक्कीच उपयोग होतो..

मनात फक्त जिज्ञासा हवी असते जर जिज्ञासा असेल तर प्रत्येक गोष्ट नाविन्यतेने आपण शिकतोच..आणि शिकायलाच हवी..शिक्षणाला ना वयाच बंधन आहे ना दुसरी कोणती अट शिक्षण मिळवायचं असेल तर असावी लागते ती फक्त जिज्ञासा..


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!