Skip to content

मानसिक ‘कोरोना’ जगभरात कसा पसरला असेल??

मानसिक ‘कोरोना’ जगभरात कसा पसरला असेल??


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


एक प्रयोग घेऊया…

तुम्ही एका १५०० लोकसमुदाय असणाऱ्या लग्न समारंभात गेलेला आहात. ते लग्न फारसे जवळचे नसल्याने पटकन रिसेप्शनचे फोटो उरकून व जेवण करून निघून जावं ही चलबिचल तुमच्या मनात आहे. तसं तुम्ही करता ही. जेवण्यासाठी तुम्ही जेवणाच्या हॉलमध्ये प्रवेश करता. एका लाईनमध्ये ६०-७० माणसं बसतील अशा ५ लाईनीत तुम्हांला कुठेतरी कोपऱ्यात एक जागा मिळाली आहे.

मेन्यू आहेत….. पुरी, बटाटा-वांग, डाळ-भात आणि जिलेबी.

तुम्ही जेवण सुरू करता. काही सेकंदातच अचानक २ ऱ्या लाईनीच्या मधात अनेकांचा गोतावळा आणि आरडाओरडा ऐकू येतो. सर्वजण उठतात. तुम्हीही उठता. तुम्हांला आता तिकडे काय झालंय हे पाहण्याची तीव्र इच्छा दाटून येते. तेथे गेल्यावर तुम्ही पाहता, साधारण ७०-७२ वयाचे गृहस्थ जेवता-जेवता अचानक मागे जमिनीवर तोल गेल्यासारखे पडले. काही सेकंदातच त्यांनी जीव सोडला. त्या गृहस्थांच्या हातात जिलेबी होती. ते पाहून बाजूच्या माणसाला जिलेबीत काहीतरी विष असावे असा साक्षात्कार झाला (तो माणूस हायपरटेंशनने ग्रस्त होता). त्याने त्याच्याही तोंडातली जिलेबी ओकून टाकली…

आता हे दोन्ही चित्र पाहून एक वेगळंच रसायन त्या गर्दीतनं मेंदूत पसरायला लागलं. ते हळू-हळू असं पसरलं की शेवटच्या माणसापर्यंत अशी हवा गेली की पूर्ण ताटच बाधलेलं आहे…

क्षणार्धात सामान्य स्थिती हाताबाहेर जायला लागली. मनाचा कप्पा चिंतेने आणि अतिविचाराने व्यापत गेला. आता काहीच सुचेनासं झालं. लोकं बोटं नरड्यात टाकून उलट्या करायला लागली. काहींनी तर तेथून लगेचच जवळचं हॉस्पिटल गाठलं. हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला हा प्रकार कळल्यावर त्यांनी त्यांचे चार्जेस वाढवले.

तुम्ही सुद्धा काही वेळेपूर्वी नॉर्मल होतात. पण आजूबाजूचं प्रदूषण पाहून आता तुम्हांला सुद्धा मानसिक खोकला आणि सर्दी सुरू झाली. जेवण बनवणारे सर्व ओरडून सांगत आहेत की आमच्या पैकी ३ महिला आधीच जेवून मोकळ्या झाल्या आहेत (जसे काही डॉक्टर आणि तज्ञ मंडळी सुद्धा आपल्याला ओरडून सांगत आहेत) पण त्यांच्या आवाजाच्या डेसीबल पुढे सर्वांचं मन सुन्नच…

यालाच आपण म्हणतो, समूह मानसशास्त्र (Mob Psychology).

त्या १५०० लोकांपैकी ढोबळपणे जर आपण गृहीत धरलं तर…

◆१०% माणसं ही अशी असतील ज्यांना डायबिटीस आणि रक्तदाबाचा त्रास असेल.
◆१९% माणसं ही हायपरटेंशनने ग्रस्त असतील (जे उपचार घेत नाहीये).
◆११℅ माणसं अशी असतील जे मानसिक समस्येवर कुठला ना कुठला उपचार घेत आहेत.
◆आणि इतर टक्के काही इतर मानसिकता असलेली.

या चिंता निर्माण करणाऱ्या प्रसंगात वरील माणसांनाच त्याचा जास्त त्रास सहन करावा लागेल. जो कोरोनाच्या या प्रसंगात आपण सर्वजण अनुभवतोच आहोत.

प्रयोगाच्या शेवटी इन्वेस्टिगेशन केल्यावर असं निदर्शनास येतं की ज्या गृहस्थांनी जेवता जेवता जीव सोडला त्यांना तीव्र प्रमाणात शुगर होती. म्हणून जिलेबी आणि त्यामागची त्यावेळी त्या गृहस्थांची असणारी मानसिकता त्यांच्या मृत्यूला बळी पडली.

या प्रयोगाची परिस्थिती आणि कोरोनाची स्थिती ही फार वेगळी आहे. परंतु यामध्ये भीतीच्या मानसिकतेचं जे जाळं पसरलं जातं त्याच्यातून कमजोर आणि हळव्या व्यक्तींनाच आधी त्याचा त्रास होतो परंतु पुढे हा नियम आपण सर्वानाच लागू केलाय..

जितकी भीती वाढेल किंवा अज्ञानापोटी मन हळवं करू तितका आपला मेंदू संसर्गित होण्याची शक्यता जास्त आहे.

म्हणजे प्रत्यक्षात होणारा कोरोना हा इवलासाच असेल परंतु मानसिक कोरोनाची त्याला साथ मिळेल आणि आपण दगावले जाण्याची शक्यता वाढेल.

म्हणून मानसिक कोरोना वाढवू नका.. तो स्वतःला आणि इतरांना सुद्धा होऊ देऊ नका.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!