Skip to content

एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढून आत्मविश्वास जागवणे हे मोठं समाधान!

आत्मिक समाधान…!


सौ.सविता दरेकर
नाशिक


खूप दिवसाने उमा सरीताकडे भेटायला गावाकडे निघाली होती…सरीताने आग्रहाने वास्तुशांतीचे आमंत्रण दिलेले आणि ते टाळणे उमाला अशक्य होते…कारण एके काळी शुन्यात गेलेल्या सरीताला उभारी देत उमानेच मोठे स्वप्न दाखवले होते…

आज तिची विस्कटलेली घडी सुरळीत झालेली उमाला बघायची आतुरता वाढत होती…गाडी वेग घेत होती…झाडसावल्या उलट दिशेला धावत होत्या…श्रावणाचा गारवा अन् धरतीचा हिरवा शालू बहरला होता…ते चैतन्य उमा आपल्या दृष्टीत भरून सुखावत होती !
शिगेला पोहचलेली तिची उत्कंठा अखेर संपली गावाजवळ गाडी येताच …सरीताचा मुलगा वाट पहात उभाच होता..

“कारे बाळा कसा आहेस” काम कसं काय चाललय ?
“मजेत आहे मावशी ..चाललय सगळं व्यवस्थित”…!

अगदी छोटासा होता जेव्हा तुझे बाबा जग सोडून गेले…आज एवढ्याशा वयात काॕलेज करुन जाॕबही करतोय…सरुला घरखर्चात हातभार लावतोय.. संस्कार वाया जात नाही हेच खरं….!

बोलत बोलत घरासमोर येताच सुंदर वन् बीएचके घर बघून उमाला समाधान वाटले…

सरीता उमाला बघताच गळाभेट घेत म्हणाली,काय ताई किती उशीर गं…”येतेय असा फोन आल्यापासुन तुझ्या वाटेकडेच डोळे लावून बसलेय मी केव्हाची”…चल घरात बोलुया…

नाही गं सरु,मी लवकरच निघाले पण वाटेत एक काम होते त्यामुळे वेळ झाला…बर कशी आहेस खूश आहेस ना आता… स्वतःचे घराचे स्वप्न पुर्ण केलेस गं…अभिमान वाटतो तुझ्या जिद्दीचा…

उमाताई तुझी साथ वेळेत मिळाली नसती तर हे शक्य नव्हतं …बरं जावुदे आता सगळं छान झालय..बघ दोन्ही मुलं शिकताय…सरकारी घरकूल योजनेचाही हातभार मिळाला काही कर्ज घेतलं…म्हणून शक्य झालय …नाहीतर शेतीकाम, शिवनकाम करून कितीसे शक्य झाले असते?

कष्टातच गेले दहा वर्ष कधी संपले कळलेच नाही …आता मुलांनी शिकून पायावर उभं रहावं हेच स्वप्न आहे बघ…मी हरणार नाही ..मुलंही मेहनती आहे हे माझं भाग्यच…बर ताई बोलु नंतर आधी जेवण कर…

बर बाई म्हणत उमा जेवताना सरीताची कामाची लगबग बघत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून भुतकाळात गेली…जेव्हा सरीता दुःखात एकाकी झाली होती.. म्हणाली होती…

उमाताई ,”माझ्या दुःखात अनेकजण माझं सांत्वन करुन आधार देत दुःखाची जाणीव करून गेले ….कित्येक बायका मला रडतं बघून रडल्या….माझं पुढे कसं होणार असं बोलून चिंता वाढवून गेल्या”…नातलगांनी पाठ फिरवली…या दोन जीवाकडंही बघवेना..काय करु ,कुठं जावू, कसं जगू त्या विचारातच दिवसरात्र सरत होते…

पण ताई तू भेटली हे माझं भाग्यच ..खरंच गं…जे कुणी नाही दिलं ..ते तु दिलय मला …”माझ्यात हिंम्मत भरली..सकात्मकतेने जगण्याची दृष्टी दिली….जन्माला एकटं आलोय, मरतानाही एकटंच जाणार… मग जगण्यासाठी आधाराची अपेक्षा का करावी” ….दारुड्या नवरा असूनही नसल्यासारखाच होता…मग या दोन पिलांची जबाबदारी दाखवली..माझ्यातल्या स्रीशक्तीची जाणीव करुन दिलीस…

” आता बघ मी हिंमतीने जगून दाखवेन.. माझ्या पोरांना कष्ट करुन मोठं करेन..संस्कार देईन”…!

आज उमाला सरीताकडे बघताना तिचे हे सारं बोलणं आठवत होते…
अन् “सरीताचा यशस्वी संघर्ष बघताना उमाचे मन समाधानाने भरून येत होते….आणि हे आयुष्यातील सर्वात मोठे आत्मिक समाधान असते”…

हे समाधान सगळ्यांनाच नाही मिळत…आयुष्यात काही मोठे कार्य जमले न जमले तरी चालेल, पण “एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढून त्याचा आत्मविश्वास जागवून …. न हारता, जगण्यासाठी सकारात्मकतेने उभं करायला जमले ना… तरी आयुष्य सार्थकी झाले समजावे”…!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!