Skip to content

जवळची व्यक्ती आयुष्यातून सोडून गेल्यावर…

जवळची व्यक्ती आयुष्यातून सोडून गेल्यावर…


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


‘मला तर आता जगावसंच वाटत नाहीये, जीवन आणि जेवण नकोसं वाटतंय, मनात एक शांतता पसरलीये, जीव द्यावा वाटतोय, घरातनं बाहेर पडुशी वाटत नाहीये, झोप लागत नाहीये, सारखं तेच-तेच आठवतंय आणि ते/तो/ती मला अचानक का सोडून गेलेत’

अशा अतिशय तीव्र भावना आपल्या जागृत मनावर कब्जा करतात…ते ही अनेक वर्षानुवर्षे. फक्त वय वाढतं, मनाचा ग्राफ ढासळत असतो. अशा तीव्र भावना सोबत घेऊन जगणं एकप्रकारे जिवंतपणी मरणं आणि मारणं च आहे. कारण ते आपल्यालाही पुढे सरकू देत नाहीत आणि इतर जवळच्या लोकांनाही त्रासदायक ठरतात.

मग ती जवळची व्यक्ती आई असेल, वडील, भाऊ, बायको, मित्र किंवा बहीण असेल… यांपैकी कोणीही व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं निघून गेली तर निसर्गाच्या नियमानुसार काही दिवस, महिने सावरायला वेळ लागतोच. पण वर्ष झालं, पाच-दहा वर्ष झालं तरीही तुम्ही तेथेच अडकला आहात. म्हणजेच तुम्ही एक अवास्तव आयुष्य जगत आहात.

मग अशावेळी काय करायचं…

काही ठराविक कालावधीनंतर जेव्हा भावना तीव्र कोरड्या होत जातात…तेव्हा ती एनर्जीच दुसरीकडे आपण वळवू शकतो आणि हे काही रॉकेट सायन्स नव्हे. फक्त मनावर घ्यायला हवं. म्हणजेच करायचं काय…

मस्त गार्डनमध्ये बसून लहान मुलांचे खेळ पाहत रहायचे, थंडीत आईस्क्रीम खायची, चिंच-बोरं हजम करायचे, पाणीपुरी, मलई कुल्फी किंवा झाडाच्या पानावर देतात ती दूध मलई खायची, कोमेडीवर जोरात हसून पडायचं, टिंगल करायची वगैरे वगैरे..

आता तुम्ही म्हणाल की हे करणं काय सोपं आहे का…आता पुढचं वाचल्यावर ते सोपं होईल. वरील ज्या गोष्टी सुचवलेल्या आहेत ते त्याच गोष्टी आहेत जे तुम्हांला सोडून गेलेल्या व्यक्तीला आवडायच्या..असंच तुम्हांला आपापल्या सोडून गेलेल्या व्यक्तींबद्दल काही चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि त्या जपायच्या आहेत.

मग बघा कसा पोसिटीव्ह तडका लागतो आयुष्यावर….आणि त्या पोसिटीव्ह एनर्जीत इतरही धुवून निघतील. कारण जवळची व्यक्ती गमावणे हा झटका इतका कडक असतो की त्यातून अमर्याद प्रमाणात एनर्जी ही उत्पन्न होते.

आणि आपण निगेटिव्हीटी कडे ती सर्वाधिक वाया घालवत असतो…जवळची व्यक्ती गेल्याने शेवटच्या श्वासापर्यंत आपण मरत-मारत जगलो त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी जपून आपण स्वतःही जगलो आणि इतर माणसंही जगवली. हे ऐकायला किती भारी वाटतं ना…

“४ दिन की जिंदगी हें, २ दिन तो टेंशन मेही चला जाता हें”

म्हणून आज आरशासमोर उभे रहा आणि डोळ्यात डोळे घालून एवढंच म्हणण्याचा प्रयत्न करा की..

सुधर जरा! ??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!