
एक कथा जिवन कसे असते यावर …
Madhuri Manikkuwar
एकदा एका गुरुकडे शिष्य गेला असता त्याने विचारले कि मला जिवनात काहीही करायचे असल्यास पण निर्णय कसा घेऊ कळत नाही काय करु काहीच कळत नाही तुम्ही मला मार्गदर्शन कराल काय ?
गुरु म्हणालेत त्याकरीता अनुभव असायला हवा आणि हव्यास नको …पण शिष्याला याचा अर्थ काही कळेना …
मग गुरुने शिष्यास एका गहूचा शेतात जा आणि गव्हाची एक छान सुंदर लांब बाली घेऊन ये .पण अट आहे कि एकदा समोर गेला तर परत वळायचे नाही समोर चालत जायचे ….
मग काय शिष्य गेला शेतात आणि त्यानी शेतात पाय ठेवल्याबरोबर त्याला सोनेरी रंगाचा छान टुमदार , सुंदर सुबक बाली दिसू लागल्यात आणि त्यात त्याला सर्वात लांब बाली दिसली ..
.पण त्याला विचार आला कि आताच मी शेतात आलो आणि पहिल्याच रांगेत मला सुंदर लांब बाली मिळाली कदाचित पुढे शेतात अजून याचापेक्षाही सुंदर बाली सापडेल …म्हणून तो तिला न तोडता समोर सरकतो ….
नंतर पुढे गेल्यानंतर तो अजून अजून वेगवेगळ्या बाली बघतो पण प्रत्येक वेळी ही पहिले दिसलेल्या बालीसोबत तुलना करतो आणि तोडत नाही कारण त्याला कधी ती लहान वाटते कधी कमी सुरेख , कधी कमी सुंदर कधी कमी टपोरी दाणे भरलेली …।
असे पुढे सरकत जात जात शेवटी तो शेताचा शेवटचा बांध्यावर येतो आणि आता त्याला लक्षात येते कि त्यानी एकही बाली तोडली नसते ..मग तो विचार करतो कि गुरु विचारतील तर काय सांगणार मी म्हणून शेवटी अगदी न विचार करता एक बाली तोडून घेतो …..
यानंतर तो बुद्धाकडे येतो व तेव्हा बुद्ध विचारतात आणली का गव्हाची बाली …तेव्हा तो म्हणतो आणली गुरु पण त्याचा चेह-यावर मात्र खूप उदासी बघत गुरु विचारतात तू उदास दिसत आहेस का काय झाले …।
तेव्हा शिष्य म्हणाला मला हि तेवढी आवडली नाही तरी मी ही बाली आणली आणि त्याने त्याचा अनुभव मांडला …
तेव्हा बुद्ध म्हणाले कि सत्य हे आहे कि जी तुला सर्वात पहिली मिळाली ती तुझा मनात भरली पण तु अजून हवे या हव्यासापायी पुढे सरकत गेला आणि नंतर तू तुझा पूर्ण वेळ पहिली सोबत तुलना करण्यात घालवला …शेवटी अनुभवाने लक्षात येता रिकाम्या हाती न येता निर्णय घेत बाली घेऊन आला आणि आताही पहिली नाही निवडली त्यासाठी उदास आहेस …।
यातून तू हे शिक कि जिवनात प्रथम प्राप्त झालेले सर्व आपल्यासाठी आहे ते उत्तम असते कारण तूझे मन स्वच्छ.असते …पण हव्यास येता तुलनेत आम्ही वेळ घालवतो …
आता तुला जे मिळाले आहे हे सत्य आहे हे तुझे आहे तू निवडले आहे तर त्याचा निर्वाह कर खुश हो आनंदी रहा …।
आपले विचार मांडा कि यातून आपण काय शिकायचे …
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

