Skip to content

आपला मृत्यू कसा होणार ???

मृत्यू


नितीन ओंबळे


सर्व मानव जातीला पडलेला एक विचारणीये प्रश्न म्हणजे मृत्यु… आपला मृत्यु कसा होणार, मृत्यु वेदनादायी असतो की सुखद असतो, कधी होणार इ. अनेक प्रश्न आपल्याला जीवनामध्ये एकदा तरी पडलेला असतो. मृत्यू होताना स्वतःला समजून येते का? मला असे वाटते की नाही.. स्वतःला सोडून सर्वांना समजून येईल आपला देह जग सोडून गेला आहे पण स्वतःला समजू शकत नाही. या पृथ्वी वरील कोणत्याही जीवाला स्वतःचा मृत्यु समजून नाही येवू शकत. आपण एखाद्या चिकन सेंटर्स मध्ये असणाऱ्या कोंबड्यांना आता आपण काही मिनटात मरण होवू शकते असे वाटत पण नसेल समुद्रा मध्ये असणाऱ्या माशांना स्वप्ना मध्ये पण वाटत नसेल आपल्या ह्या अखंड विश्वा (समुद्र) मध्ये कोणीतरी अचानक मासेवाला येवुन आपल्यावर जाळी टाकून कैद करून आपला अंत होईल असे त्यांना पण वाटत नसेल

म हेच उदाहरण संपूर्ण मानव जातीला पण लागू होते त्या मुळे आपला मृत्यु कसा, कधी, केव्हा, वेदनादायक आहे का थरारक आहे ह्याची चिंता कशाला. कधी मृत्यु येवुन जाईल कळू पण शकू शकत नाही.. आपण कोणी वारल्यावर बोलतो ना अचानक वारला त्या मरण पावल्याल्या व्यक्ती ला पण माहित असेल का मी काही वेळेत मरण पावणार आहे नाही ना जे सर्व पशू, पक्षी सर्व जीवन निसर्गाचा नियम लागू आहे तोच नियम आपल्या सारख्या मानव जातीला पण लागू आहेच..

हा निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो. मरण हे वेदनादायी असू शकतं नाही आपण जे पेरणार तेच उगवणार, आपण जसे वागणार तसेच आपल्याशी लोक वागणार वेगळे काही घडत नाही..नाहीतर श्रीमंतांना वेगळा नियम आणि गरिबांना वेगळा असे मुळीच नाही सर्वांना समान..

आपण बोलतो ना ह्या माणसाला मरण अगदी खराब आले खूप त्रास दिला झटकीपत नाही गेला कारण त्या माणसाने जीवना मध्ये कारस्थाने एवढी केली असतील की निसर्गाला त्याला रडत रडत मरण्याताच योग्य वाटत असेल आपण जे सत्कार्य करू नाही तर दुस्थ्याकर्मा करू ते आपल्याच त्याच स्वरूपा मधेच भोघायचे आणि अनुभवाचे पण आहेत.

आयुष्य हे दोन क्षणांचे असून माणूस मृत्यूच्या आगमनामुळे बर्‍याचदा मरतो, माणूस जेवढा आजाराने मरत नाही. त्यापेक्षा जास्त विचाराने मरतो, म्हणून हासत राहा. फालतू गोष्टींचा विचार करणे सोडा. जर जिवंत राहणे आवश्यक असेल तर माणसाला जिथे हसत खेळत जगायचे असेल तिथे राहायला हवे.

म आता आपल्याला ठरवायचे आहे की स्वतःला मरण कोणत्या स्वरूपा मध्ये पायजे आहे…मरण हे आपल्या जरी हातात नसले तरी पण कसे मरणे म्हणजे (सुखदायी की वेदनादायी) हे नक्कीच आपल्या हातात आहे..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!