
व्यक्त होऊया…
Shruti Waikar
(Counsellor)
संभाषण,संवाद,बोलणं आणि व्यक्त होणं, सारे एकाच स्वभावा चे वेगवेगळे पैलू. पण या सारयावर उमटणारया प्रतिक्रीया आणि प्रतिसाद मात्र खुप भिन्न.सहज कुणाशी तरी सामाजिक, राजकीय विषयांवर बोलायच म्हंटलं की बोलकी व्यक्तीच काय तर एरवी अबोल असणारी माणसं पण आपल मत देतात बरेचदा. याचं उत्तम उदा. म्हणजे,आपण कुठल्यातरी प्रवासाला जात असु तर आपण शेजारी बसलेल्या व्यक्तीशी अख्खा प्रवास गप्पा करत जातो,बरेचदा. हो! एका अनोळखी व्यक्ती सोबत. कारण तो संवाद फक्त त्या वेळे पुरताचाच असतो.तो आपल्या वैयक्तीक आयुष्याशी निगडित नसतो.
पण जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात कधीतरी व्यक्त होण्याची नितांत गरज असते, तेव्हा अबोल व्यक्तीच काय? तर वरकरणी अत्यंत बोलकी वाटणारी माणसं देखील गप्प असतात. हा अनुभव मी माझ्या समुपदेशन सत्रात (Counselling session’s) बरयाच मंडळींकडून ऐकलाय. की, मॅडम मला माझ्या पालकांना, जोडीदाराला, मित्र-मैत्रिणीला इ. कुणालातरी अमुक एक गोष्ट सांगायची होती. पण कसं सांगु? त्यांना काय वाटेल? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? मला माझ म्हणणं नीट मांडता येईल का? या सगळ्या विचारांनी बोलायचा धीरच होत नाही.
याचं कारण आपण बरेचदा त्या क्षणी व्यक्त होणं टाळतो, आणि कालांतराने जेव्हा मनात खूप गोष्टी दाटतात तेव्हा त्याचं ओझं घेऊन वावरतो. काही लोक छोट्यात छोटी गोष्ट व्यक्त करायला देखील योग्य वेळेची वाट बघत असतात.पण ही योग्य वेळ एकतर कधीच येत नाही किंवा फार उशीर झाल्यावर येते,जेव्हा अव्यक्त भावनांचे पडसाद नात्यांवर उमटू लागले असतात.
व्यक्त होता येणं यात एक समाधान आहे. कारण,यामुळे नात्यांमधे येणारा कडवटपणा ,समज, गैरसमज,हेवे-दावे हे सगळं टाळता येऊ शकतं. व्यक्त होण म्हणजे फक्त्त आपल्या भावनांचा निचरा होऊ देणं नाही,तर
– अंतरीचा जिव्हाळा जिवंत ठेवत बोलणं.
– नात्यातला गोडवा जपत बोलणं.
– परस्परांतला विश्वास जपणं.
– समोरच्याचा सन्मान ठेऊन आपलं मत देणं.
– समोरच्यात आधाराचा खांदा शोधत असतांनाच, आपणही समोरच्याचा आधार होणं.
मित्रानो,व्यक्त होता येण्यासारखं सुख नाही. आणि बोलावं की नाही? या विचाराने स्वछ,सुंदर मनाचा एक कोपरा अडकवून ठेवुन रोज चोवीस तासातले काही क्षण त्यात गुरफटुन स्वत:लाच बेचैन करणं यासारखं क्लेशकारक दुसरं काही नाही.
जसे कधी कधी काही प्रश्न सोडवायला “स्माईल अँड सायलेन्स” या तत्वाची मदत होते. तसे बरेचदा, बरेच तिढे, हे फक्त आपल्या व्यक्त होण्याने सुटणार असतात. तेव्हा मनमोकळे बोलुया,”व्यक्त होऊया”.आणि सतत कसलंतरी दडपण मनावर घेऊन वावरण्यापेक्षा,व्यक्त होऊन निश्चिंत होऊया.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

