
१४ दिवसाच्या quarantine चा अनुभव
नितीन ओंबळे
आपण आवड म्हणून कोणत्याही पशू किवा पक्षी यांना पिजऱ्यात बंद करून आपला छंद जोपासत असतो आणि एकप्रकारे खोटा दिखावा करत असतो की मी खूप मोठा पशुप्रेमी या पक्षीप्रेमी असल्याचा पण त्या पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवल्या ल्या पक्ष्याचं दुःख आपणाला कधी दिसत नाही.,
आज माझे १४ दिवसाचे quarantine संपले या १४ दिवसा मध्ये मला जे अनुभवायला भेटले ते एखाद्या बंदिस्त पिंजऱ्यातील पक्षा प्रमाणे अनुभव होते. १४ दिवस ३ रूम चा घरामध्ये एकटा न बोलायला कोणी नाही ना टीव्ही ना मोबाईल ला नेटवर्क वनवास काय असतो ते समजले.
या १४ दिवसामध्ये एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात बंद करून ठेवणे ते आपल्या अनुभवावरून त्या पक्षाचे काय अवस्था होत असेल ह्या वरून समजले. , आणि लोक स्वतःच्या फायद्यासाठी, सुरक्षेतेसाठी काय पण करू शकतात.,
अथाग समुंद्रा मध्ये विहरणारे मासे आणि ह्या निळ्या आकाश मध्ये उडणारे पक्षी यांना आपण कशा साठी ४*४ चा फिश टँक मध्ये पिंजरा मध्ये बंदिस्त करून स्वतःचा छंद जोपासत असतो काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आपला अधिकार दाखविण्याचा., त्यांना पण अधिकार आहे मन भरून कुठे पण फिरण्याचा हे भूतलावर जेवढा अधिकार आपण दाखिवतो तेवढा त्यांचा पण अधिकार आहे हे आपण सारखं का विसरतो आणि ह्याचा कुठे तरी अतीपणा जास्त झाल्यामुळे हा कोरोना सारखी महामारी आली आहे आणि ती आपल्याला इशारा करते आहे की हे ‘ मानवा’ तू प्रमाना पेक्षा जास्त प्रमाणात या सृष्टी वर आपला अधिकार दाखवत आहेस तू पण या अन्य जीवांसारखाच एक जीव असून तू इथे फक्त भाडोत्री आहेस मालक नाही.
पण तू हे विसरतो आहेस आणि तुझ्या हे लक्षात आणून देण्यासाठी कोणत्या न कोणत्या रूपाने ती जगासमोर येत आहे आणि जो पर्यंत तुझ्या लक्षात नाही येत तो पर्यंत हे सर्व असेच चालू राहणार अजून ही वेळ गेलेली नाही स्वतःला सावर हे मानवा….
तू स्वतः जग आणि दुसऱ्याला पण जगू दे !!
तेव्हा हे जग तुला दोन्ही हातानी हात जोडून नमस्कार करेल..
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

