Skip to content

प्रेम त्यांना कधीच मिळत नाही, त्यांच्या मनात केवळ घेण्याचा भाव असतो.

प्रेम हे एक मृगजळा सारखं आहे…


अजय धागे


जेव्हा तळपत्या उन्हा मध्ये एखादे हरणाचे पाडस तहाणल्याने व्याकुळ होते, तेव्हा उन्हाच्या झळांनी त्याला दूर कुठे तरी पाण्याचा भास होताना दिसतो. तेव्हा ते पाण्याच्या शोधात सैरा वैरा धावू लागते. जेव्हा ते त्या ठिकाणी पोहचते तेव्हा त्या ठिकाणी त्याला पाणी दिसत नाही तो फक्त भास असतो..

पुन्हा जेव्हा ते पुढे पाहते तेव्हा पुन्हा त्याला पाणी चमकताना दिसते आणि ते पुन्हा धावायला लागते..

पाण्याचा भास त्याला धावायला मजबूर करतो..

धावून ते खूप थकून जाते..
पण तहानल्याने व्याकुळ असल्यामुळे त्याला थांबता येत नाही.. आणि ते सारखे इकडून तिकडे धावत असते..

पण मृगजळ हा एक भास आहे त्याच्या लक्षात ही येत नाही…
पण तेच मृगजळ त्याला धावायला शिकवते आणि पाण्याच्या प्रवाहा पर्यंत नेऊन सोडते…कुठे तरी त्याला पाण्याचा प्रवाह दिसतो आणि त्याची तहान भागते..

असच काही प्रेमाचं आहे माणूस प्रेम मिळवण्यासाठी धावत असतो धावत असतो..

धावून तो थकून जातो निराश होतो.
पुन्हा स्वतःला धीर देऊन पुन्हा धावतो.. धावत असताना त्याला अनेक ठिकाणी असे प्रेमाचे भास होतात.

हे प्रेम आहे का ते प्रेम आहे पण कधी कधी हाती काहीच लागत नाही..

प्रेम हे धावायला शिकवते..
तेव्हा कुठे आपण आपल्या मंजिल पर्यंत जाऊन पोहचतो..आणि कुठे तरी त्याला आपली मंजिल मिळते..
तेव्हा त्याचं धावणे थांबते..

पण खरा संघर्ष तर पुढे चालू होतो..
जेव्हा मिळालेलं प्रेम टिकवायला कधी कधी तारेवरची कसरतच करावी लागते तेव्हा खूप वेळा आयुष्यात निराशा हाती येते..

जसे आपल्याला प्रेम हवं असते, तसचं समोरच्याला ही प्रेम हवं असते त्यात एक जण जरी कमी पडला तरी ते प्रेम संपायला वेळ लागत नाही..

त्यासाठी प्रेम हे देण्यासाठी असावे..
घेण्याचा भाव मनात असेल तर प्रेम कधीच मिळत नाही, आणि मन ही संतुष्ट होत नाही..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!