
ऑटोमॅटीक विचारांना शोधू या आणि दुरूस्त करू या…..
डॉ. प्रदीप पाटील
समोर पसरलेल्या अथांग समुद्र कडे पाहिलं की ती आठवते… मनात अनेक भावनांचा कल्लोळ उठतो !!
समुद्र आणि ती हे इतकं आपसूकपणे जोडले गेले आहे की कळतच नाही मी समुद्र पाहतोय की तिच्या आठवणी.
सकाळी उठून घाईघाईत मला एके ठिकाणी जायचं होतं. गाडीची किल्ली घेतली आणि गाडी चालू करायला सुरुवात केली आणखी काय.. गाडी चालू होईना आणि मग मी वैतागलो मनातल्या मनात चडफडत म्हणालो.. दुष्काळात तेरावा महिना, नेमकं घाईच्या वेळेतच हे सार घडतं!
राम्या समोर आला आणि माझं डोकं भणाणलं. मनात विचार आला हा राम्या नालायक माणूस आहे…
समुद्र आणि ती,
घाईची वेळ आणि गाडी चालू न होणं,
राम्या आणि त्याचं माझ्या समोर येणं,
अशी जोडी अनेक गोष्टींबाबत घडते. म्हणजे, “ऑटोमॅटिक विचार” डोक्यात येतात.
परवा रस्त्यावरून चालत निघालो होतो आणि शेजारी कडेला उभ्या असलेल्या एका गाड्याच्या जवळून जाताना अंडा भुर्जी चा वास नाकात घुसला आणि ऑटोमॅटिकली माझ्या डोक्यात मी जेव्हा हॉस्टेलवर राहत होतो आणि तिथे भुर्जी खायला जात होतो ते आठवलं. याचं मला आश्चर्य वाटलं की जेव्हा जेव्हा भुर्जी आठवते तेव्हा तेव्हा होस्टेल समोर येतं.
असे अनेक विचार हे एकमेकांशी जोडले गेलेले गेलेले आहेत.
गंमत आहे ना?
असंच गुलाब जामून खाताना होतं. पुण्यातल्या नाना पेठेत राहत असताना सांगली जिल्ह्यातल्या गावातून आमच्याकडे मामेभाऊ मी लहान असताना आलेला. मला त्याने काका हलवाई च्या दुकानात नेलं आणि गुलाबजाम खाऊ घातलं. गुलाबजाम आणि मामेभाऊ हे समीकरण इतकी वर्ष डोक्यात पक्क झालेले आहे.
खरंतर असे अनेक विचार ‘पक्के’ झालेले आहेत आणि त्या विचारातून ‘निर्माण होतात’ भावना.
म्हणजे..
समुद्राच्या काठावर भावनांचा कल्लोळ…
गाडी चालू होत नाही प्रचंड राग…
अंड्याची भुर्जी आणि आणि ते सरलेले दिवस आणि त्याचा आनंद…
गुलाबजाम आणि कृतज्ञतेची भावना…
विचार आले की भावना येतातच पाठोपाठ किंवा असंही म्हणता येईल भावनांचा तळ म्हणजे विचार! आणि हे नुसते विचार नाहीयेत हे विचार म्हणजे आपोआप येणारे विचार ऑटोमॅटिक थॉट्स होय.
खूपच स्ट्रेंज आहे हे सारं! म्हणजे आपोआप येणारे विचार हे आपल्याला आपोआप येतात हे कळायलाच खूप उशीर, खूप काळ जावा लागतो आणि मग आपोआप आले म्हणून की काय आपण फारसं लक्ष देत नाही त्यांच्याकडे.
हे आपोआप येणारे विचार असतात ना ते मनात रुजलेले असतात. ते पक्के झालेले असतात आणि ते आपसूकपणे जेव्हा येतात तेव्हा आपल्या भावना ही आपोआप येतात!
विचार हे जर सतार असतील तर भावना या त्यातून निघणारे झंकार आहेत….
आणि या सतारीच्या विशिष्ट तारा विशिष्ट झंकार निर्माण करणार. म्हणजे सतार आणि झंकार यांचं नातं अतूट बनलेले आहे आणि हे नातं कधीही तुटत नाहीये.
पण विचार पक्के झाले तर ते कधीतरी त्रास देणार ना. कारण सगळेच विचार हे आनंद देणारे नसतात. काही विचार हे दुःख देतात तर काही विचार हे तुम्हाला सुख देतात आणि जेव्हा दुःख देणारे विचार हे ऑटोमॅटिक बनतात तेव्हा मात्र सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तयार होतो. कारण दुःख ऑटोमॅटिक येतं आणि जेव्हा ते असे येतं तेव्हा आपण त्याला रोखू शकत नाही. त्याला रोखणे म्हणजे मोठा प्रश्न
मी हे पाहतोय की हे जे ऑटोमॅटिक विचार आहेत…आपोआप येणारे विचार आहेत ते नेमके कसे आहेत, काय आहेत, त्यांचे स्वरूप काय आहे, हे मला शोधून काढायला पाहिजे.
आणि म्हणून मी जेव्हा हे विचार शोधून काढायचा प्रयत्न केला तेव्हा मला त्या विचारांचे रूप समोर आले. जे आपोआप येणारे विचार असतात त्यांना आपण सहजपणे येऊ देतो. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आपण त्या विचारांची तपासणी करत नाही. आपण त्या विचारांची चिकित्सा करत नाही. आपण विश्वास ठेवतो अशा या आपोआप येणार्या विचारांवर कारण आपण त्याची तपासणी केलेली नसते म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा ते विचार पक्के झाले तेव्हा ते उत्स्फूर्तपणे आलेले होते त्यामुळे आपल्याला ते कळलंच नव्हतं कि ते विचार आपल्या मनात केव्हा येऊन पक्के झाले.
विवेकी विचारांचे हे पक्केपण आत्मविश्वास वाढविते.
अविवेकी विचारांच्या पक्केपणातून दुःख-राग-भीती या तीन भावनांचा उदय होतो.
आपोआप निर्माण होणार्या विचारांना वळण लावण्यापेक्षा ते आपोआप होण्याअगोदर विवेकी असणे जास्त महत्वाचे आहे आणि फायदेशीर आहे.
ऑटोमॅटीक विचारांना शोधू या आणि दुरूस्त करू या…..
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

