Skip to content

समस्या रोज समोर उभ्या असतात, म्हणून जगणं सोडायचं का??

समस्या आणि नियोजन


श्रीकांत कुलांगे
9890420209

वेबसाईट


समस्या रोज समोर उभ्या असतात म्हणून प्रदिपला हाच एक प्रॉब्लेम होता की ही कटकट कशी थांबवायची. समस्या सोडवणे ही एक मानसिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये समस्या शोधणे, विश्लेषण करणे आणि निराकरण करणे समाविष्ट असते. समस्येचे मुळ शोधून त्यावर कायमस्वरूपी मात करणे महत्वाचे.

समस्या सोडवण्यासाठी लागणारी मानसिक टेस्ट घेऊन त्याला त्याच्या स्किल् व काय कमी आहे ते सांगितल्यावर त्यालाच आश्चर्य वाटले की किती सोपे आहे समस्या सोडवणे. प्रत्येक समस्येला सोल्युशन असते.

१. समस्या ओळखणे – समस्या काय आहे याबद्दल स्पष्टता, याबद्दल भिन्न लोकांचे मत भिन्न असू शकतात.

२. सर्व समस्या लिहून घेऊन त्यांची लिस्ट तयार केली की स्पष्ट कल्पना येते कारण फक्त विचार करून फायदा नाही.

३. प्रत्येक समस्येचं विश्लेषण करण्यासाठी त्या का घडल्यात याबाबत उहापोह करणे आवश्यक. म्हणून समास्येसमोर त्या घडण्याचे कारणे लिहून घेतले की स्पष्टता येते.

४. कारणे स्पष्ट झाली की त्यावर असणारे उपाय व पर्याय शोधायला वेळ लागत नाही. ते सुद्धा लिहिणे गरजेचे आहे. अर्थात हे समस्या किती मोठी आहे त्यावर अवलंबून.

५. समस्या सोडवण्यासाठी लागणारे मानसिक बळ असेल तर सर्व पर्यायावर उपाय शक्य होतो. त्यासाठी सकारात्मक विचारसरणी हवी.

६. जर काहीच समजत नसेल तर योग्य व्यक्ती कडून सल्ला घेणे आवश्यक. त्यात काही गैर नाही.

७. समस्या पुन्हा निर्माण न होण्यासाठी उपाय करणे गरजेचे म्हणून प्लॅनिंग योग्य असले पाहिजे.

८. योग्य निर्णय तपासून पाहिल्यास मनस्ताप होणार नाही.

प्रदिपला याची कल्पना नव्हती असं नव्हे परंतु कसं करायचं हे सगळं म्हणून कन्फ्युज. मनुष्य जन्मजात समस्येला तोंड देण्यासाठी बुध्दी घेऊन आला आहे. फक्त काही कारणास्तव ते जमत नाही.

१. घाबरून, गांगरून जाणे.
२. माहिती व कौशल्याची कमी.
३. समस्येला चिंतेच्या रूपाने पाहणे.
४. मानसिक किंवा शारीरिक बळ नसणे.
५. योग्य नियोजनाचा अभाव.
६. कुठलाही प्रयत्न न करता सपशेल पराभव मानण्याची वृत्ती.
७. अती रागात अयोग्य निर्णय घेतला तर समस्या उग्र रूप धारण करण्याची भीती.

प्रयत्नांती परमेश्वर. समस्या आपण किंवा नैसर्गिक निर्मित असतात. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यांचा वापर करून त्यावर उपाय योजणे हे सर्वस्वी आपल्या सुनिश्चित विचारसरणीवर अवलंबून असते. म्हणून याची जाणीव लहानपणापासून मुलांना घरी, शाळेत, समाजात दिली जाते परंतु त्यावर अंमलबजावणी कशी करायची त्याबाबत जास्त लक्ष न दिल्याने नुकसान अधिक. कारण वेळ प्रसंगी काहीच न सुचणे हे आपल्याला अनेकदा दिसून येते. म्हणून एकतर समस्या निर्माण होऊच नये त्यासाठी अगोदर योग्य काळजी घ्या असे वडीलधारी मंडळी सांगतात ते उगीच नाही.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!