
पति-पत्नी पत्नीमधील विसंवाद- समुपदेशन एक प्रयत्न.
नितीन रेळेकर
पुणे.
माझ्या एक वकील मित्राचं म्हणणं आहे की अलीकडील काळात घटस्फोटांच प्रमाण वाढलं आहे. त्याच म्हणणं कारण काही विशेष नसतं पण ‘ इगो ‘ आडवा येतो. क्षुल्लक कारणावरुन मतभेद होतात व घटस्फोटापर्यंत वेळ येते. हे सर्व विचार करतानाच प्रसारमाध्यमे, वाढती लोकसंख्या मर्यादित सगळ्यांचा विचार केला पाहिजे. अवास्तव अपेक्षा, असुरक्षितता ह्या मुळे मनुष्य सैरभैर झाला आहे. समाधान पैशाने मिळेल किंवा देवधर्म करण्याने मिळेल ह्या संभ्रमात आहे.
पतिपत्नीमध्ये मतभेद व्हायला तीन कारण असु शकतात. मानसिक, शारिरीक व आर्थिक.
मानसिक कारणांमध्ये वैचारिक तफावत, संवादातील मोकळेपणा नसणे, संवेदनशीलता नसणे ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असु शकतो.
शारिरीक कारणांमध्ये लैंगिक समाधान न होणे किंवा पाॅर्न साईट्सबघुन खोट्या अपेक्षा असणे तसेच ऐकलेल्या गोष्टिंनी न्युनगंड निर्माण होऊन संबंध क्रियेमध्ये फरक पडल्याने जोडीदाराबरोबर नाराजी तयार होणे, वगैरे.
आर्थिक कारणांमध्ये दोघेही कमावते असले की अतिआत्मविश्वास तयार होणे. त्यामुळे जोडीदाराचा गरजेपुरता विचार करणे. इतरांच्या बरोबर आर्थिक तुलनेमुळे असमाधानी असणे. पर्याय शोधणे व त्यामुळे आर्थिक किंवा शारिरीक अडचणीत सापडणे असे वेगवेगळे प्रसंग घडु शकतात. ज्यामुळे पतीपत्नीमध्ये विसंवाद घडु शकतो.
ह्या सर्व गोष्टींमध्ये योग्य समुपदेशन केल्यास नक्कीच फरक पडतो. फक्त समुपदेशकास मनाच्या विवीध सर्व पैलुपासुन, वैद्यकिय तसेच विवीध मानसिक पातळीवर समाधान करता आलं पाहिजे. ते पटवुन देता आलं पाहिजे.
तरच त्यांच्यातील विसंवाद कमी करता येतील.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

