
परिस्थिती चांगली किंवा वाईट…
पद्मा साहेबराव
खूप असे प्रसंग येतात की, परिस्थितीशी कसा सामना करावा सुचतच नसतं. अर्थात ती वेळ चांगली असू शकते किंवा एखादी समस्याही ही असू शकते..बाकी ‘मधले,साधारण,कमी’ असं काही नसेल.असंच काहीसं मला वाटतं. आनंद आणि दु:ख याचं काही मोजमाप नसतं.ती एक जाणीव असते,संवेदना असते.तो क्षण आपण कसा स्विकारला हे महत्त्वाचं!
प्रत्येकाला क्षणा-क्षणाला दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागत असते. मनाला चटका किंवा उभारी देणारे अनुभव येतात. चांगल्या वेळी सोबत खूप लोक असतात.
पण समस्यांमध्ये माणूस खूप हतबल होतो, एकटा पडतो, टोकाचे पाऊल उचलतो, चुकीचे निर्णय घेतले जातात.
म्हणजेच काय होत असेल, ती परिस्थिती आपल्याला तिच्या हातातलं बाहुलं बनवते,हातात घेते त्याच वेळी आपल्या मनाला.. आणि कधी शरिरालाही..! हतबलता येते..शरणागती पत्करणं किंवा प्रतिकार शक्ती वाढवणं! तोच क्षण असतो, जो आपण काय करायला हवं हे आपल्याला शिकवत असतो. मला तरी असंच काहीसं वाटते.
दोन पर्याय समोर असतात.एक परिस्थितीच्या हातात जायचं की परिस्थितीलाच आपल्या हातात घ्यायचं!?
कुठल्याही परिस्थितीत आपण तिच्या आहारी न जाता त्यातून मार्ग काढायला हवा.
मग आपल्याला अनेक मार्ग दिसतात.कोणता मार्ग निवडावा, हा त्या-त्या वेळेवर अवलंबून असतो,
कधी नम्रतेने किंवा कठोर होऊन!
त्यानंतर एक नक्की असतं की, आपण खूप खंबीर झालेलो असतो. आपल्या बुद्धीला आपण खूप ताण देत असतो बाहेर पडण्यासाठी..!
आपल्याला समस्या स्वतःलाच सोडवायची असते किंवा त्यावर मात करायची असते.त्याच क्षणी आपण फक्त यातून चांगलं काय करता येईल ,या दृष्टीने विचार करायचा.
जमतं मग आपल्याला! दगडासारखी टणक किंवा मातीसारखे मऊ व्हायला लागलं तरी चालेल. पण मार्ग शोधणं आवश्यक असते.
म्हणून कुठल्याही क्षणी मनाला कणखर ,खंबीरपणे उभे करून परिस्थितीलाच हातात घ्यावे…!
मोठ्या समस्यांवरही आपण मार्ग शोधू शकतो!
हा माझा अनुभव!!!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

