Skip to content

हस्तमैथुनाबद्दल प्रचंड प्रमाणात पसरलेले गैरसमज दूर करूया..

हस्तमैथुन समज-गैरसमज


नागेश मादेशी, समुपदेशक
ग्रामीण रुग्णालय,चामोर्शी


केस नंबर 1-

हॅलो मादेशी सर ,मै xyz बोल रहा हू ,मै बहुत मुसीबत मै हू सर आपको अर्जेंट मिलना है , हस्तमैथुन करणे के वजह से मेरा लिंग ढिला हुआ है , लिंग तेडा हुआ है,आपको तुरंत मिलना है, मुझे आपकी सलाह की बहुत जरुरी है.

केस नंबर 2-

माझे नाव xyz आहे वय वर्ष 24.लॉकडाऊन मध्ये आमच्या मित्र मंडळींचा एक व्हाट्स अँप ग्रूप मधून रोज एक नवीन ब्लू फ्लिम पाठवत असत मग मी ते ब्लु फिल्म पाहून रोज रोज हस्तमैथुन करत आहे .त्यामुळे मी खूप कमजोर झालो आहे, माझे वजन कमी झाला आहे ,लवकर थकवा येतो, चक्कर येतो, डोळे खोलवर गेले आहेत.

केस नंबर 3-

सर माझा लग्न ठरला आहे परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून जे मनसोक्त हस्तमैथुन केला आहे, त्यामुळे माझा विर्यातील चिकणाई पणा कमी झाला आहे. मी आता लग्न करण्यास लायक नाही, मला काही सेक्स टॉनिक असेल तर कृपया सांगा.

केस नंबर 4-

माझे वय 20 वर्ष मी नागपूरला शिक्षण घेत आहे माझे गर्ल फ्रेइंड होती तिच्यासोबत अनेक वेळा सेक्स होत होते आता लॉकडाऊन मध्ये मला तिला भेटता येत नाही म्हणून मला तिची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा तेव्हा मी हस्तमैथुन करतो दिवसातुन 4 ते 5 वेळा करतो .मला खूप अशक्तपणा जाणवतो, लिंग ताठर होत नाही, उपाय सांगा.

केस नंबर 5-

माझी पत्नी प्रसुती साठी माहेरी गेली मला खूप लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते मला माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी दुसऱ्याकडे बाईकडे जात नाही परंतु मी तिची आठवण आली की ,मी हस्तमैथुन करतो .हस्तमैथुन करतांना चांगला वाटते परंतु त्यानंतर मात्र मला आपण खूप मोठी चूक करत आहोत .पाप करत आहोत, त्यामुळे आपल्याला समोर नपुंसकत्व येहू शकतो असे नानाविध विचार मनात येतात कृपया मला योग्य सल्ला दया मी आपला आभारी असेन.

वरील सर्व केसेस बद्दल मी एकच सांगू इच्छितो की, हस्तमैथुन ही एक अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक प्रकिया आहे. जवळपास 95%लोक आयुष्यात कधी न कधी हस्तमैथुन करतात. वीर्य हे मानवी शरीरातील एक स्वाभाविक घटक आहे .ज्या प्रमाणे शरीरातून अश्रू, लाड, आणि रक्त असते त्याचप्रमाणे वीर्य पण वीर्य कोषातून निघणारे घटक आहे.

शरीरातील रासायनिक बदल होऊन लैगिक इच्छा जागृत होते तेव्हा आपल्या लैगिक भावना शांत करण्यासाठी हस्तमैथुन हा एक सहज आणि साधा मार्ग आहे.ज्या पद्धतीने प्रेशर कुकरला वाफ बाहेर निगण्यासाठी शिटी आणि व्हॉल्व असतो त्याचप्रमाणे मानवी लैगिंक भावना शमविण्यासाठी हस्तमैथुन आणि स्वप्नदोष हे दोन नैसर्गिकरित्या घडून येणाऱ्या क्रिया आहेत.

(जे पुरुष हस्तमैथुन करत नाही त्यांची अतिरिक्त वीर्य स्वप्नदोष होऊन वीर्य बाहेर पडते)

म्हणून हस्तमैथुन बद्दल कोणतेही चुकीचा समज धरू नयेत. हस्तमैथुन केल्यानंतर लिंगामध्ये काहीच बदल होत नाही किंवा लैंगिक क्षमतेमध्ये काहीच फरक पडणार नाही .मनातील दडपण, नकारात्मक विचार, धास्ती, अपराधीपणाची भावना, यातूनच लैगिंक समस्या उद्भवतात. याचे परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर होतो. हस्तमैथुन विषयी असलेले गैरसमज दूर होण्यासाठी हा लेख एक प्रेरणादायी ठरेल अशी आशा बाळगतो.

(टीप-सदर लेख मधून हस्तमैथुन करण्याला प्रोत्साहन देत नसून त्याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे.)



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!