
…….मोठ्या आनंदाची छोटी गोष्ट……
मनोज शेट्टी
पुणे.
चाकू, सूरी, कैची, घरातील किचनमध्ये वापरात येणारी छोट्या छोट्या वस्तुंना धार लावणारे दुकान आज बाजार पेठात सहज उपलब्ध झाले आहेत.
साधारणपणे १५/२० वर्षांपूर्वी याचं अवजारांना धार लावण्यासाठी गल्लोगल्ली, बाजारामध्ये एखादी व्यक्ती धार लावणारी मशीन (यंत्र) घेऊन येत, प्रत्येक अवजाराला एक रुपयांत दोन रुपयांत धार लावून देत. धार लावताना त्या विशिष्ट दगड आणि चाकूच्या घर्षणाने आगीच्या ठिणग्या बाहेर निघत ते पाहण्यासाठी आम्हा सर्व लहान मुलांची गर्दी होत असे. पण काळानुसार सर्व बदली झालं. जुन्या पारंपरिक मशीनची जागा नव्या आधुनिक मशीनने घेतली आणि अनेकांच्या रोजी रोटीचं साधन गेलं.
दोन दिवसांपूर्वी अशीच एक व्यक्ती आपली पारंपरिक धार लावायची मशीन घेऊन दुकानावर आली. “साहेब हा मोबाईल आहे पण यामध्ये टॉर्च चं लागत नाही. खूप प्रयत्न केले पण काहीही फायदा झाला नाही, तेवढं टॉर्च चालू करून घ्या की…”
त्यांच्या मोबाईल ला माझ्या मोबाईलचं हॉट स्पॉट चं कनेक्शन जोडून प्ले स्टोर मधून टॉर्च लाईट अप्लिकेशन डाउनलोड केलं आणि क्षणात मोबाईलचा टॉर्च सुरू झाला, हे पाहून त्या व्यक्तीला ऐवढा आनंद झाला की जणू त्याच्या मोबाईल सोबत त्याच्या आयुष्यात देखील या मोबाइल च्या टॉर्च ने प्रकाश पडला.
“साहेब तुम्ही खूप मोठं काम केलंत पहा.. देव तुम्हाला आशीर्वादात करो” मी असं काय मोठं काम केलं आहे, नुसतं टॉर्च चं अप्लिकेशन डाउनलोड करून दिल होत पण कोणाच्या आयुष्यात एखादी छोटी गोष्ट देखील किती महत्वाची असू शकते हे कधीच सांगता येणार नाही म्हणून नेहमी आपापल्या परीने मदत करत चला…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

