
खरच आपण कमी पडतोय का?
विद्या जाधेकर
“कुणासाठी कितीही केल तरी कमीच पडतय!!!” “कितीही चांगल वागल तरी आपली कुणाला कदरच नाही”,….असा सुर आपण सगळेच कधीनाकधी वापरत, एेकत असतो….आपण सर्वच जण बर्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या परीने खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अस करत असताना आपण स्वतः खुश राहाणे किती गरजेचे आहे हेच आपण विसरून जातो…….दुसऱ्या च्या सुखात सुख शोधताना आपल सुख कशात आहे तेच समजत नाही..
आपल्यापैकी सर्वानाच कमी अधिक प्रमाणात असे अनुभव येत राहतात जिथ आपण कितीही १००% देण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे काहीना काही कमी पडतेच. आणि आपण कमी पडतोय याच प्रमाणापेक्षा जास्त शल्य मनात साचले की मग स्वतः वरच्या विश्वासाला, कार्यक्षमतेला तडा जाऊ शकतो. घरातील गृहीणी दिवसरात्र घरासाठी राबते घरातील लहानथोरांची मने जपण्याचा त्यांना खुष ठेवण्याचा प्रयत्न करत असते. या सगळ्यात जेव्हा कुणी ती कमी पडत असल्याची जाणीव करून देत तेव्हा ती अजुन प्रयत्न करते पण त्यातही कुठे कमी पडल कुणी बोलले तर मात्र ती दुःखी होते स्वतःचा आनंद गमावुन बसते.
असच काहीस आपल्या सर्वांच्या आयुष्यात होत असते अनेकदा आपण जवळ च्या लोकांसाठी, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या साठी काही गोष्टी करतो परंतु बर्याचदा केलेल्या गोष्टी कडे लक्ष न देता आपल्याला त्यात असणाऱ्या कमी वरून हिणवले जाते तेव्हा कुणासाठी काहीही न करण्याची, आपण कुठेतरी कमी असल्याची हिण भावना मनात बळावते…
अशावेळी एका हिंदी चित्रपटातील ‘जितना भी ट्राय करो कुछ ना कुछ तो छुटेगा ही, इसलीये इसी पल का मजा लेते है ‘ ही वाक्य मनाला दिलासा देणारी ठरतात.
आपण सर्व च ठिकाणी स्वतःला चांगले सिद़्ध नाही करू शकत…..आणि हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आपणच इतरांना आपल्याला कमी लेखण्याची जणु परवानगी च देत असतो मग आपणच आपल्यातील सद्गुणांची पारख न करता दुसऱ्याच्या तालावर जगायला लागतो…असे न करता आपण जसे आहोत तसे स्वतःला स्विकारून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवु शकतो..
काही लोकांना आपली बाजू योग्य वाटेल काहींना तीच बाजु चुकीची वाटेल आणि आपण सगळीकडे योग्य च सिद्ध झालो पाहीजे हा अट्टाहास आपल्याला घातक ठरू शकतो. जिथे आपण कमी पडू तिथे अधिक प्रयत्न करण्यात गैर नाही परंतु हे करताना आपण स्वतः च्या आनंदाला मागे तर टाकत नाही ना हे पाहाणे अधिक गरजेचे आहे जिथे आपल्याला पुर्ण प्रयत्न करूनही हवे ते समाधान मिळत नसेल तिथे आपल्या प्रयत्नांना वेगळी दिशा देण्याची गरज पडेल.
जे आयुष्यात आहे ते आनंदाने अॅक्सेप्ट करून जे आपल्या सोबत आहे त्यांना साेबत घेऊन जे नाहीत त्यांचे आभार मानून पुढे चाललो तर आपण स्वतः ला काही प्रमाणात समाधानी ठेवु शकु. यासाठी कुणावर राग न धरता आपण चुक कि बरोबर ही त्यांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे हे मान्य करून सगळीकडे स्वतःस्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न न करता प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला आयुष्यात हवे ते समाधान काही प्रमाणात मिळु शकेल…!!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

