Skip to content

आकर्षणाचा सिद्धांत हा त्यांनाच लागू होतो….

!!जसा विचार तसे फळ!!


विद्या जाधेकर


आपण शाळेत असताना कृतघ्न आणि कृतज्ञ हे दोन विरूद्धअर्थी शब्द अनेकदा पाहिले. परंतु रोजच्या आयुष्यात त्यांचा असणारा त्यांचा वावर क्वचितच लक्षात घेतो. जसा साॅरी हा शब्दाचे वेगळे महत्व आहे तसाच थँक्यू शब्दाचा वापरही आपल्या व्यक्तिमत्वाचे वेगळे पैलु दाखवतो.

‘द मॅजिक’ नावाच्या पुस्तकामध्ये gratitude या शब्दाचा खरा अर्थ अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलाआहे की आपण रोजचे आयुष्य जगताना आपल्याला भेटणार्या सर्व गोष्टींशी कृतज्ञता व्यक्त केले पाहिजे.जीवनात आपल्याला येणारे चांगले वाईट अनुभव, भेटणारी माणसं यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर आपल्या लक्षात येते की या सर्वांमुळे आपल्या आयुष्यात किती अनपेक्षित, अमुलाग्र बदल घडला, कधीकधी माणूस ठरवुनही स्वतःमध्ये बदल घडवु शकत नाही परंतु परिस्थिती अगदी नकळतपणे तो बदल घडवून आणते.

अनेकदा आपल्याला असेही अनुभव येतात जिथे आपण एखाद्यासाठी खुप करतो पण त्याबदल्यात कृतज्ञता तर नाहीच पण त्या व्यक्तीकडून विरोधी वागणूक पाहायला मिळाली की मन दुःखी, नाराज होते पण अशा लोकांचे प्रसंगांचे पण आभार मानले पाहिजे कारण ते आपल्याला कुठे ,कुणासाठी आणि किती वाहावत जायचे याची जाणीव देते.

या बरोबरच पुस्तकात नोंद केलेला आकर्षणाचा सिद्धांत रोजच्या आयुष्यात अनुभवयास मिळतो.

अनेकदा आपण जेव्हा एखाद्या अडचणीत असतो तेव्हाच आपल्याला सगळीकडे संकट दिसु लागतात. एखादा वाईट प्रसंगाने दुनिया च वाईट वाटू लागते आणि सातत्याने आपल्यासाेबत वाईट घडल्याचे जाणवते.

“We attract what we feel” . आपण सातत्याने दुःखाचा ,संकटांचा विचार करून आयुष्याचा आनंद गमावुन बसु. आज आयुष्यात जे भेटलय त्याबद्दल ऋणी राहुन त्याचा आनंद घेऊ शकलो ,तर कदाचित आपल्यालाही आकर्षणाच्या सिद्धांताचे मॅजिक अनुभवता येईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!