
विश्वास आणि विश्वासघात
सौ. सुलभा घोरपडे
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी , कोणी ना कोणी विश्वासघात केलेल्या घटना घडलेल्या असतात …
प्रत्येकजण कोणावर तरी विश्वास ठेवत असतो अगदी काही वेळेस स्वतःपेक्षा पण दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवतो …
कोण आईवडीलावर विश्वास ठेवते …
कुणाचा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर विश्वास असतो , कुणाचा एखाद्या जीवलग मित्रावर विश्वास असतो , पतिचा पत्नी वर विश्वास असतो तर पत्नीचा पतिवर विश्वास असतो …
अमुक तमुक आपलं काम करणारच असा ठाम विश्वास असतो …
कुणाचा देवावर विश्वास असतो पण त्याआधी स्वतःवर विश्वास पाहिजे तरच देवावर विश्वास बसेल कारण आपला अंतरिक विश्वास म्हणजेच देवाचे अधिष्ठान …
हे झालं आपला कोणावर तरी विश्वास असण्याबद्दल …
पण जर कोणी विश्वासघात केला तर …एखाद्या मित्राने किंवा पति ने , पत्नी ने किंवा कुटुंबातील एखाद्याने , किंवा नातेवाईकातील कोणीतरी , अगदी पैशावरूनही विश्वासघात झालेली लोक आहेत , किंवा आपण एखादी गोष्ट विश्वासाने , आपला ज्याच्यावर विश्वास आहे अशा एखाद्या व्यक्तीला सांगतो आणि आपल्याला वाटते ती व्यक्ती कोणाजवळ बोलणार नाही पण जेव्हा आपल्याला समजते त्या व्यक्तीने ती गोष्ट सर्वत्र सांगितली यामुळेही आपला त्या व्यक्तीवरील विश्वास उडतो… ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला असेल त्याने विश्वासघात केला तर …काही माणसे पार कोलमडून जातात , काहींचे जीवन उध्वस्त होते …मग त्यांचा कुणावरच विश्वास राहत नाही.
म्हणून आपल्यावर विश्वास ठेवणार्याचा कधीही विश्वासघात करू नका
असं म्हणतात विश्वासावर जग चाललय. विश्वास म्हणजे जगण्याची शक्ती आणि विश्वास हाच प्रेमाचा पहिला सोपान आहे. विश्वास म्हणजे माणसाला जिवंत ठेवणारी शक्ती आहे आणि जर विश्वासाचा अभाव असेल तर माणसाचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही
म्हणून आधी स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास असेल तर मनुष्य अंधारातही प्रकाशाचा अनुभव घेईल ….
विश्वासातून विश्वास निर्माण होईल आणि अविश्वासातून अविश्वास निर्माण होईल…
स्वतःवर आंतरिक विश्वास असणे म्हणजे ईश्वरावर , शक्तीवर विश्वास असणे होय.
शेवटी एवढंच सांगावं वाटत …
प्रेम सर्वावर करा , द्वेष मात्र कोणाचच करू नका आणि विश्वास मोजक्याच लोकांवर ठेवा …..
आणि स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका , कायम स्वतःवर विश्वास ठेवा…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

