
‘त्याला एकटं राहायला सांगितलंय , एकटं पाडायला नाही ‘
रसिका क्षीरसागर
सर्वानी हि जाहिरात पहिली असेल . परवा हि जाहिरात पाहत होते आणि एक विचार मनात आला , कि खरंच आपण सगळे त्या जाहिरातीतील बाई प्रमाणे आहोत का?
कोरोना ने अख्या जगाला विळखा घातला आहे . आपल्या आजूबाजूला राहणारे अनेक लोक, आपले अनेक नातेवाईक , मित्र परिवार या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहेत. देव न करो पण अशी कल्पना करा कि आपल्यावर अशी वेळ आली आणि कोणी आपल्याला या संकटात साथ द्यायची सोडून एकटं पाडलं तर आपल्याला कस वाटेल?
मी काल माझ्या एक मैत्रिणीशी बोलत होते जिला व जिच्या पूर्ण कुटुंबाला कोरोना ला सामोरे जावे लागले.
आणि तिने काही गोष्टी सांगितल्या जे ऐकून मन सुन्न झाले आणि तितकीच चीड हि आली . खरंच काही लोक शिकलेले असले तरी त्यांची बुद्धी मात्र लहानच असते.
तिने सांगितले कि जेव्हा त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोना झाला ,तेव्हा त्यांनी शेजारच्यांना काळजीपूर्वक या गोष्टीची कल्पना दिली जेणेकरून तेथील आजूबाजूचे लोक स्वतःची काळजी घेतील. आणि ते सांगितल्यावर त्यातले काही लोक आधल्या दिवसापर्यंत त्यांच्याशी बोलत होते त्यांनी यांच्याशी बोलणे हि बंद केले.
घरासमोरून जाताना जे लोक आवर्जून थांबून बोलायचे , त्यांनी घराकडे बघणे हि बंद केले. काही लोकांनी बोलणे एकदम कमी केले. रोज बोलणारे लोक , समोरून आले तरी बघून न बघितल्यासारखे करायला लागले. काय म्हणावं अशा मानसिकतेला ?
माझे मत असे नाही कि सगळ्यांनी घरी येऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे , पण डिस्टन्स ठेऊन त्या लोकांची विचारपूस केली असती तर नक्कीच काही झाले नसते व त्यांनाही बरे वाटले असते आणि त्यांना एकटे पडल्याची जाणीव नसती झाली.
जेव्हा हे सर्व कुटुंबीय हॉस्पिटल आणि quarantine सेंटर मध्ये होते तेव्हा तिथल्या काही लोकांनी याबद्दल अजून अनुभव त्यांच्याशी शेर केले .
काही लोकांच्या घराशेजारील लोक तर त्यांना फोने करून ‘आता घरी येऊ नका लवकर, तुमच्यामुळे आम्हाला पण होईल ‘ असे म्हणून त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला देऊ लागले , तर काही लोकांच्या घरचे (ज्यांना कोरोना झालेला नाही ) जर घराबाहेर पडले तर त्यांना शिव्या देऊन घराबाहेर पडायच नाही असे शेजारी सांगू लागले .
काही लोकांच्या शेजारचे जर हे लोक घराबाहेर पडले तर पूर्ण रास्ता धून घेऊ लागले . तिथे असणाऱ्या लोकांना हॉस्पिटल मधून घरीच जाऊ नये असे वाटू लागले होते . कारण घरी गेलो तर अश्या लोकांना सामोरे जावे लागणार होते. ते हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करत होते कि आम्हाला काही दिवस इथेच ठेवून घ्या . तिथे एक आज्जी आणि एक नात होत्या , त्या तिथून निघताना रडत रडत डॉक्टरांना विनंती करत होत्या कि आम्हाला इथे राहू द्या , आमच्या शेजारील लोक आम्हाला जगू देणार नाहीत .
हे सगळे असे ऐकून खरंच मन सुन्न झाले. खरंच आपण इतके माणुसकीहीन असू शकतो का? एखादी व्यक्ती जर संकटात आहे तर त्याला मदत नसेल करता येत तर करू नये पण त्याच मानसिक संतुलन तरी बिघडवू नये असे माझे मत आहे.
मला माहित आहे कि कोरोना मुळे सगळे घाबरून आहेत आणि प्रत्येकाला आपल्या जीवाची चिंता आहे . पण हे असे वागल्या मुळे आपण फक्त आणि फक्त समोरच्याला दुःखी करत असतो . फक्त आपल्याला समोरच्याच्या जागी ठेऊन पहिले तर बरीच प्रश्नांची उत्तरे सुटतात आणि आपली वागणूक हि सुधारते .
म्हणूनच कृपया आपल्या जवळ किंवा कोणीही कोरोना च्या संकटात असेल तर त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत करा (नक्कीच स्वतःची काळजी घेऊन ). त्यांना एकटं पाडू नका . त्यांना कोरोना झाला आहे म्हणजे काही गुन्हा झाला नाहीये . हि वेळ आपल्या कोणावर हि येऊ शकते असे मला वाटते . त्यांना फोन करून त्यांना मानसिक आधार द्या . कोरोना या आजारामुळे बरेच जण फक्त मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मेले आहेत . कोरोनाग्रस्तांना मनातून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा . त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आपला हातभार लावू नका.
वरील सर्व माझे प्रामाणिक विचार होते . आवडले नसतील तर सोडून द्या आणि आवडले असतील तर नक्कीच आपण सगळ्यांनी या संकटातून आपल्या आजूबाजूच्यांना बाहेर काढण्याचा प्रयन्त करू
(अगदी सगळेच लोक असे नसतात ते हि तितकंच खरं आहे . अनेक लोक अश्या काळात शेजारच्यांना सर्वतोपरी मदत हि करतात याची अनेक उदाहरणे हि पहिली आहेत 🙂 )
Thanks !
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

