Skip to content

आपल्या रागामुळे आपणच एका चक्रव्यूहात अडकत जातो..

छोडो भी,माफ कर दो!


Ms.Shruti Waikar
(Counsellor)


आपण जेवढ्या चटकन कुणावर पण चिडतो,रागावतो,रुसतो. तेवढ्याच पटकन आपण कुणाला माफ करतो का? लाखात एखाद्या माणसाला.

हे जमत असावं,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
समोरची व्यक्ती कुणीही असो,

जोडीदार,भावंड,पालक,मुलं,नातलग,मित्र-मैत्रिणी,
कामाच्या ठिकाणी दिवसभर सोबत करणारे सहकारी,अगदी कुणीही.

ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आयुष्याचा एक भाग असतात.आणि यांच्यातल्या कुणाशीही आपले मतभेद होऊ शकतात. पण ते मतभेद किती काळ जपायचे हे आपल्याला ठरवता यायला हवं.
मी व.पु. काळे यांच्या एका पुस्तकात एक सुंदर वाक्य वाचलं होतं की,”रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारं डस्टर”. आणि वाटलं खरंच किती खरयं! गुड नाईट म्हणण्यापूर्वी, तो दिवस संपतांना त्या दिवसाचे मतभेद, संघर्ष त्याच दिवशी संपवता यायला हवेत.

खुप लोकांना वादविवाद,भांडणं झाले की चार-चार दिवस अबोला धरायची सवय असते. मग मनात पहले आप,पहले आप चाललं असतं.मग कुणीतरी एक जण माघार घेत रुसवा संपवतो. पण या सगळयात माघार घेतलेल्या व्यक्तीच्या मनात एक विचार घर करुन बसतो की दर वेळी मलाच माघार घ्यावी लागते. किंवा हे नातं टिकावं ही फक्त माझीच गरज आहे. तर त्या उलट माघार न घेतलेली व्यक्ती मनात शौर्यपताका लावून कसं माझं चुकलच नव्हतं,या खुळ्या विचारात गर्क असते.

हा रुसवा लटका असेल,तर तेवढा एक अपवाद म्हणता येईल. कारण तो राग,रुसवा लटका असेल तर तो प्रेम वृद्धींगत करतो. पण तसं नसेल तर,आपण समोरच्या माणसाला माफ न केल्याने आपणच एका चक्रव्युहात अडकत असतो. कारण जेवढा काळ आपल्या मनात त्या व्यक्ती बद्दलचा राग, द्वेष राहतो तेवढी ती भावना दृढ होत जाते. आणि मग आपल्याही नकळत आपली एक वाईट बाजू आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग व्हायला लागते.

ज्या क्षणी रागावतो,त्याच्या दुसरयाच क्षणी समोरच्याला आणि स्वतःला देखील माफ करता यायला हवं. त्यावर फार चिंतन मनन झालं की आपलं मन लगेच न्यायदेवता तर बुद्धी वकील होते.आणि मग कोण किती चुकलं याचा हिशोब.

त्यापेक्षा आपल्या मनाला सांगुयात,”छोडो भी,माफ कर दो!”आणि जन्माने,कर्माने मिळालेली सगळी नाती सुदृढ राहण्यासाठी या रात्रीच्या डस्टर चा उपयोग करुयात. नव्या दिवसाला कोरुया मनाने सामोरी जाऊन,नवा मजकूर लिहुया.आणि हे आयुष्यरुपी पुस्तक अधिक सुरस व रंजक करूयात.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!