
एकवेळेस कोरोना झाला तरी चालेल, पण ‘कोरोना फोबिया’ नको!
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
आज कोरोना संदर्भात तो एक फोन आला!
साधारण फोन आला, सायंकाळी ७ च्या दरम्यान. एक ज्येष्ठ नागरिक होते. त्यांच्या बायकोची कोरोना टेस्ट पोसिटीव्ह आली होती, दोन आठवड्यापूर्वी!
ते काका साताऱ्याचे होते. केवळ एक अनुभव शेअर करण्यासाठी त्यांनी फोन केला..
त्यांचा तो अनुभव असा होता की,
दोन आठवड्यापूर्वी काकूंना ताप आला आणि तो वाढत गेला. मग त्यांच्या जवळच्या संबंधितांनी त्यांना जवळच्या Covid-19 सेंटर मध्ये चाचणी करण्याचा सल्ला दिला. पण काकांना ते ऐकूनच अजब वाटलं. कारण सध्या ऍडमिट झाल्यानंतर कोरोना पेशंटची होणारी वाताहात आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये लुबाडणारी टोळी हे सर्व अनुभव काकांना चक्रावून सोडणारे होते. त्यांनी एक दिवस घरीच थांबून दुसऱ्या दिवशी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. पण काकूंचा आजार काही कमी होईना…
दुसऱ्या दिवशी चाचणीसाठी ते काकूंना घेऊन गेले. आधी त्यांचं ऑक्सिजन तपासलं. ऑक्सिजन नॉर्मल होतं, त्यानंतर कोरोना चाचणी केली. रिपोर्ट २ दिवसानंतर कळणार होते. तोपर्यंत काकांनी आवश्यक घरची पथ्ये पाळली, वेळेवर काकूंची काळजी घेतली.
रिपोर्ट पोसिटीव्ह आला…
काकांनी तिकडे फोन करून विचारले तेव्हा समजले. पण त्यांनी काकूंना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे असे सांगितले. ‘फक्त त्यांनी घरगुती पथ्ये पाळा आणि आठवड्या नंतर यायला सांगितले’ असे काकांनी काकूंना सांगितले.
घरच्या पथ्यांची काटेकोरपणे पालन केले. नंतर पुन्हा टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले. आश्चर्य रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांनी आता मात्र काकूंना खरं सांगितलं…..की रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.
——————————
आता यामध्ये जर सुरुवातीलाच काकूंना रिपोर्ट पोसिटीव्ह असल्याचं कळलं असतं तर त्या कोरोना विषाणूपेक्षा मनात येणाऱ्या त्या नकारार्थी विषाणूनेच काकूंचा बळी घेतला असता. कारण रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमचं मन जेव्हा तुमच्या शरीराची साथ सोडतं.
कोरोना होणं, हा आता एक मानसिक धक्का झाला आहे. अन त्याचा धसका घेऊनच मृतांची संख्या वाढत आहे, असा अंदाज करण्यात काहीच वावगं नाही.
म्हणून मनाची सकारात्मक ताकद आपल्याला एकवटायला हवी आणि कोरोनाविषयी अवास्तव भिती आपल्याला पळवायला हवी.
अनेक डॉक्टर सांगत आहेत, कोरोना हा काहीच नाहीये…यापेक्षा डेंगू आणि मलेरिया या साथीच्या रोगांशी आपण लढलोय…
कोरोना हा विषाणू इतरांसारखा नॉर्मल आहे, पण कोरोना फोबिया हा नॉर्मल नाहीये…
म्हणून हा फोबिया मनातून उपटून टाकायला हवा.
म्हणजेच कोरोना ऐकवेळेस झाला तरी चालेल, पण ‘कोरोना फोबिया’ होऊ देऊ नका.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

