Skip to content

पसारा मनातला की घरातला ???

पसारा मनातला की घरातला ???


Swapnaja Karajagi


काल खर तर आमच्या शेजारच्या काकुकडे खूप गोंधळ चालू होता , खर तर सध्या कोरोना मूळे कुठे जात येतं नाही आम्ही , पण शेवटी राहवलं नाही म्हणून डोकावले शेजारी.. शेजारधर्म शेवटी. काकूंच्या सुनेने घर डोक्यावर घेतलं होत कारण काय तर घरात पसारा झाला होता . काकु बिचारी कावरीबावरी झाली होती.. आधी तिला शांत केलं मग तिच्या सुनेला विचारलं का बाई एवढा त्रागा करून घेतेस ? दमत असशील कामामुळे सगळे कराव लागत तुला मान्य आहे ,पण त्रास करून नको घेऊ नकोस बाई.. तेवढ्यात काकु हळूच पुटपुटली नेहमीच आहे पसारा दिसला की घर डोक्यावर घेते..

कसबस दोघींना शांत करून घरी आले पण माझ्या डोक्यामधून हा विचारच जात नव्हता खरच घरातला पसारा हे शुल्लक कारण असू शकत का मोठ्या वादच.. मग शांतपणे विचार केल्यावर जाणवलं मला खूप घरी थोडया बहुत फरकाने पसारा हे वादाच करणं असत.. कधी कोणाला घरातील माणसेच पसारा वाटू लागतील क्या नेम लोकांचा खर सांगू तर अस्वच्छता आणि पसारा ह्या दोन खूप वेगवेगळ्या किंवा भिन्न गोष्टी आहेत.. दोघांचा एकमेकाशी काही एक संबंध नाही..

तरीही घरात पसारा आहे अस्वच्छता आहे म्हणून त्रागा करणारेही खूप जण आहेत. अहो गैरसमज करून नका घेऊ पसारा करण्याला समर्थन नाही करत आहे मी.. पण प्रत्येक घरी थोडयाफार फरकाने पसारा हा असतोच.. लहान मुलांचा खेळण्याचा , मोठ्यांचा अभ्यासाचं , घरात वयस्कर माणसे असतील तर त्यांच्या औषधचा असे अनेक पसारे असतात घरी .

पण त्यात आनंद शोधला पाहिजे म्हणजे कस पहा घरभर खेळणी म्हणजे पसारा नाही ते तर भरल गोकुळ,काय रे तुझी पुस्तक घरभर पडली असतात पण हा तर अभिमान घर शिकत आहे माझे , प्रगती करत आहे , आजी आजोबांची काठी , चष्मा , औषधांचा डबा म्हणजे त्यांच्याबद्दलची काळजी . असा विचार केला तर दिसणारच नाही तो पठ्ठ्या ( पसारा ) वक्तशीरपणा , शिस्त , हवीच माणसाला पण काही ठिकाणी अतिरेक असतो ह्या गोष्टीचा उदाहरण द्यायच झाल तर जसकी लादी पुसली आता एकाच जागी बसून रहा , बेडवर चादर घातली आता अजिबात विस्कटली नाही पाहिजे .

घरी आमचे मित्र मैत्रिणी येणार आहेत एकतर तुम्ही थांबू नका आणि थांबणार असाल तर आवरून बसा, मध्ये मध्ये बोलू नका एक नाही अश्या कितीतरी बंधन मुल आई वडिलांवर नकळत पणे लादत असतात , चुकून एखाद्या गोष्टीची जागा बदलली कि घर डोक्यावर घेणे , स्वतःला त्रागा करून घेणे कितपत योग्य आहे ? अशाने आपण स्वतःला त्रास करून घेतो पण घरातल्या बाकिच्या लोकांना पण खूप त्रास होतो किंबुहना जास्त वाईट वाटत , मग घरच्या लोकांना तुमचं मन सांभाळत सगळ करावं लागत.. सतत एक भीती मनात घर करून राहते तुमची नाही हा, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की होणाऱ्या तुमच्या मानसिकतेची ह्याला वेळीच आवर घातला पाहिजे.. तुमच्यावर प्रेम करतात म्हणून तर तुमचं मन जपण्यासाठी आटापिटा करत असतात.

घरात प्रत्येक वस्तू ठेवणासाठी नियोजित अशी जागा असते , पण कधी कधी ठेवल्या जात नाहीत वस्तू जागेवर तर त्यामागे बरीच कारणे असतात ती शोधली पाहिजे आरडाओरडा करून काही साध्य होत नाही… मला तर अस वाटत एखादी गोष्ट वेळेवर योग्य जागी नाही मिळाली की पुढच्या वेळी माणूस सावध होतो आणि ठेवतो वस्तू जागेवर बरोबर .

कधी कधी ही मानसिकता एवढी वाढते की एखाद्या छोट्या गोष्टी साठी पण खूप मोठा वाद होतो.. “हम करे सो कायदा ” अस नसत हो दरवेळी. एकत्र एकमेकाची मन जपत राहण्यातच खर सुख असत.

घर म्हणजे शोकेस नाही ना नेहमी छान टापटीप असायला, हे समजून घेतले पाहिजे.. आवड म्हणून कोणी पसारा करत नाही .. मनाची अशी अवस्था असणाऱ्या लोकांना वेळीच समजावले पाहिजे , नाही सुधारणा वाटली तर वेळीच तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे .कधीतरी होणारी चिडचिड साहजिक आहे , पण हीच चिडचिड रोज होऊ लागली तर ह्याचे परिणाम फार भयंकर असू शकतात…

असो मी काही तज्ञ नाही फक्त कालच्या प्रसंगाने अंर्तमुख होऊन गेले , आयुष्य सुंदर आहे प्रेम द्या , प्रेम घ्या नाहीतर तुमची अवस्था ही सुगंध नसलेल्या फुलासारखी होईल . खरं आहे पटतय ना !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!