Skip to content

आपली मुलं खोटं का बोलतात, चला जाणून घेऊया..

आपली मुलं खोटं का बोलतात, चला जाणून घेऊया..


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


लहानपणापासून आपणच मुलांना खोटं बोलायला शिकवतो, असे जर कोणी उघडपणे म्हटले, तर त्यात काही वावगे असण्याचे कारण नाही. उदाहरण देतो, समजा तुमचा मुलगा ६ वर्षाचा आहे. तुम्ही आंघोळीला गेलेले आहात. अचानक तुमच्या दाराची बेल वाजते आणि तुम्ही तुमच्या मुलाला दरवाजा उघडायला लावता. दरवाज्यावर एक सेल्समन त्याच्या काही वस्तू विकण्यासाठी तुमच्याकडे आलेला असतो. तुम्ही मुलाला विचारता आणि मुलगा सांगतो की, “एक माणूस भांडी विकायला आलाय, तो तुला बोलावतोय” तेवढ्यात तुम्ही मुलाला सांगता की “त्याला सांग की आता घरी कोणीही नाहीये”

वरील प्रसंगात गैर असं काहीच नाहीये, परंतु हीच ती सुरुवात असते. ज्यातनं मुलं शिकतात की, काही वेळेस नको असलेली परीस्थिती टाळण्यासाठी खोटे बोलावे लागते. दुर्दैवाने हेच प्रसंग जर मुलांच्या सानिध्यात वारंवार घडत गेले तर मुलं बाहेरच्या लोकांशी खोटे बोलायला लागतात आणि यातून हवा तसा प्रतिसाद मिळत गेला तर या नाटकाचे शो घरी सुद्धा लागतात.

●केस :-

सुप्रिया वयवर्ष १४. सध्या ९ वीत शिकत आहे. आई-बाबांची इच्छा आहे की तिने डॉक्टर व्हावे. पण आई-बाबांच्या या इच्छेकडे सुप्रिया फार गंभीरतेने पाहत नाही. कारण या वयातल्या शारीरिक बदलामुळे मुलांच्या मानसिकतेत जो प्रभाव पडत असतो आणि जर तो पडणारा प्रभाव हा चुकीच्या वाटेने जात असेल तर बहुतेक मुलांच्या मनाचं नियंत्रण हे सुटतं. काहीसा असाच प्रकार सुप्रिया बद्दल घडत होता. कारण मुक्तपणे बोलायला, मनातले प्रश्न विचारायला घरात तशी सोय नव्हती. म्हणून याच प्रश्नांची उत्तरं बाहेरून रंगवून-फुगवून मिळाली. ज्यावर हल्लीची मुलं फेसबुक-इन्स्टा च्या जगात डोळे बंद करून विश्वास ठेवतात. आणि वाटल्यास एखादी पॉर्न साईट सुद्धा “प्रोजेक्ट सर्च” च्या नावाखाली पाहतात. हे सर्व सुप्रिया बद्दल घडत होते आणि एक-एक गोष्ट अनुभवण्यासाठी ती आई-बाबांशी खोटे बोलत होती. अश्या या आभासी विश्वात तिचे खोटे बोलण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते आणि यालाच ती वास्तव जग समजू लागली होती. हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी सुप्रिया उठ-सूट खोटे बोलत होती. कारण लहानपणापासून आई-बाबांनी एकमेकांकडे खोटे बोलण्याच्या केलेल्या तक्रारी, भांडणे आणि त्यातून मग पुन्हा एकोप्यासाठी केलेली सारवासारव यातून सुप्रिया घडली होती, किंबहुना घडत आहे. पुढच्या वर्षी तिची १० वी आहे, डॉक्टरची स्वप्न पाहणाऱ्या तिच्या आई-बाबांना सुप्रिया त्यांच्यापासून दुरावून एका आभासी विश्वात जगत आहे, असे स्वप्न पडेल काय ? कोण जाणे ?

●लक्षणे :-

१) चपळपणे अशी मुलं एखाद्याच्या तोंडावर खोटं बोलतात आणि त्याचा थांग पत्ताही समोरच्याला लागत नाही.

२) वयोमानानुसार त्या-त्या वयाप्रमाणे इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी ते खोटे बोलतात.

३) काही वेळेस आपल्या ध्येयाप्रमाणे मार्गात अडथळे नकोत, म्हणून प्रत्येक व्यक्ती खोटं बोलते. परंतु या मुलांच्या खोटे बोलण्याचा आणि वस्तुस्थितीचा जवळजवळ काहीही संबंध नसतो.

४) खोटे बोलल्यानंतर अशा मुलांना केलेल्या कृत्याचा जराही पश्चाताप होत नाही.

५) खोटे बोलल्याचे पकडल्यानंतर ही मुलं समोरच्यांनाच वेठीस धरतात.

●कारणे :-

१) घरातल्या किंवा शाळेतल्या वातावरणात जर खोटे बोलायचे प्रमाण जास्त असेल आणि उघडपणे मुलं ते पाहत असतील तर ते मुलांच्या ठिकाणीही येऊ शकते.

२) खरं बोलल्यानंतर एखादी शिक्षा झाली असेल आणि ती शिक्षा सहन करण्यापलीकडची असेल तर मुलं खोटे बोलण्याचा पर्याय निवडतात.

३) खोटं बोलल्यामुळे इच्छा पूर्ण होतात, अशी भावना जागृत झाल्यास केवळ इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मुलं खोटं बोलतात.

४) घरातले अयोग्य वातावरण लपविण्यासाठी किंवा आपली पडकी बाजू झाकण्यासाठी अशी मुलं पुढे चालून खोटं बोलतात.

५) सतत खरं बोलल्यामुळे लोकं आपला फायदा करून घेतात, म्हणून खोटे बोलायला हवे, ही चुकीची समाज खोटे बोलण्याला कारणीभूत ठरते.

●उपाय :-

१) मुलं आणि पालक यांमध्ये सतत सुसंवाद होणे गरजेचे आहे. योग्य वयानंतर मुलांशी सुसंवाद प्रस्थापित करताना पालकांनी परिस्थितीनुसार पालक व मित्र या नात्यानुसार वागावे.

२) आई-बाबांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. खोटे बोलून, त्यांना फसवून आपल्याबद्दलचे मत वाईट करवून घेऊ नये, असे मुलांना वाटले पाहीजे. म्हणजे ती चांगली व सत्य वागण्याचा प्रयत्न करतील.

३) पालकांनी अधून-मधून मुलांच्या शाळेत गेले पाहीजे. मुलांच्या अडचणी समजून घेतल्या पाहीजेत. मुलांच्या मित्र-मैत्रिणी बाबत माहीती करून घेतली पाहीजे.

४) मुलांना अति सुरक्षित वातावरण आणि अति दुर्लक्षित वातावरण मिळाल्यास अशा गोष्टी घडत असतात, म्हणून त्या कटाक्षाने टाळाव्यात.

५) मुलांची ऊर्जा ही आवडत्या गोष्टींकडे वळवावी.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!