
नेमकं आयुष्य
अनिल वाघमारे
आज धावपळीच्या जगात माणूस फक्त ताणतणाव राहतो आहे पळतोय धावतोय किती कोणासाठी कशासाठी माहिती नाही.हे सर्व चालू फक्त आणि फक्त भौतिक सुख ,पैसा,हव्यास याच सर्व गोष्टीमूळ आपण स्वतःवर अवजड परिस्थिती निर्माण करून घेतो त्यानंतर मानसिकता बिघडते म्हणजेच या सर्व परिस्थितीला आपण स्वतः कारणीभूत ठरत असतो कारण आपण आयुष्य कधी गरज म्हणून पाहत नाही म्हणूनच कमी वयामध्ये जास्त तणाव निर्माण करून काहीजण अगदी टोकाची भूमिका घेऊन स्वतःला शांत करतात खऱ्या अर्थाने या आयुष्याचा नेमका आनंद घेण्याआधी त्यांचं जीवनप्रवास थांबलेला असतो.
आपण माणूस जन्म घेतला माणूस या पदावर आपण विराजमान झालो. परमेश्वराने आपली निर्मिती ही फक्त आणि फक्त या जगाची जबाबदारी आपल्या सर्वांवर सोपविली आहे. मग आपण माझी जबाबदारी म्हणून नेमकं काय करतो. आणि काय केलं पाहिजे. याच विचार करणं गरजेचं वाटत नाही. का फक्त स्वतः साठी जगलात की आयुष्यातील प्रसन्नता आनंद समाधान मिळते का ??? तर आपल्याला इतरांसाठी माणुसकीची भावना जपता आली पाहिजे.आपण समाधानी राहतो का समाधान म्हणजे आपल्याकडे जे आहे जसे आहे. त्याचा विचार करून आपल्याकडे जे नाही त्याचा जाणीवपूर्वक विचार टाळणे म्हणजे समाधान होय.
प्रत्येकाणे आपली स्वतःची जबाबदारी ओळखून समाज देश निसर्ग या सर्वांशी आपले आपुलकीचे नाते आहे. हे नाते आपल्या सर्वांना प्रत्यक्षात कृतिमध्ये जगायचं आहे.कारण आपण सर्वचजण या देशाचे समाजाचे निसर्गाचे काहीतरी देणं लागतो की नाही म्हणूनच आपल्याला निरपेक्षपणे देता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तीची क्षमता वाढविणे सोपं पण त्याच्या वृत्तीत बदल करून कठीण असते.
आपल्या अंतकरणात पहा स्वतःशी एकदा संवाद करा कुठेतरी दिशाहीन झालेला माणूस सापडेल. अगदी स्वतःच्या आयुष्याला कंटाळलेला सदैव नैराश्य जीवन जगणारा स्वार्थासाठी जगणारा मी आणि माझं यातून गुंतून राहणारा यामध्ये तुम्ही जितका सखोल विचार कराल।तितकं तुम्हाला एक सामान्य माणूस सापडेल. तो सापडला तुम्हला खऱ्या माणसाची जाणीव होऊ लागेल.
तद्नंतर माणसाने माणसाशी माणसंसम कसे वागावे हे नक्की समजेल हे बोलायला फार सोपं जातं प्रत्यक्षात राहताना वागताना मात्र असंख्य वेळ अपमान सहन करावे लागतात प्रत्येकवेळी मन जपावे लागते एक पाऊल पाठी घेण्याची तयारी दाखवावी लागते नम्रपणा तितकाच गरजेचं वाटतो आणि यांमध्ये आपला आणि परका अशी भूमिका कधीही नसते सर्वकाही आहोत ही परमेश्वराची लेकरे आहोत
माणूस प्रत्येकाची एक भूमिका दिली आहे ती निरपेक्षपणे जबाबदार नागरिक म्हणून पार पाडूयात
आपलं दैनंदिन जीवन जगत असताना असंख्य आपल्याला मदतीची संधी मिळत असते आपण मात्र हा आपला आणि परका करत असतो परमेश्वर आपल्याला देत असतो ते आपल्या क्षमतेनुसार उपलब्धतेनुसार मग आपल्या पोटाला जितकं लागेल तेवढं घेऊन उरलेल आपल्या बांधवांसाठी देणं गरजेचं वाट्तनाही का मूठभर कमवून चिमुठभर देण्याची वृत्ती असायला हवी ना काही ठिकाणी अस जाणवते दोनी हातात भरभरून घेतात राहिलेलं खाली पडत असते त्यांनतर पडलेलं ही उचलून घेतात याही मानिसकतेचे काही बांधव आपल्याकडे आहेत
अपेक्षा आणि उपेक्षा सोडून एक साधं सरळ आयुष्य जगुयत उच्च विचार आणि साक्षी राहणीमान ठेवून जीवनाचा आनंद समाधान मिळवुयात नेहमी इतरांना सहकार्य सहयोग देऊन विचारपूर्वक जिव्हाळायुक्त कृती करूयात.
अर्थपूर्ण समृध्द जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहुयत आणि या मानवी देहाचा समाजसाठी काहीतरी उपयोग करून मनुष्यजन्म सार्थक करूयात.
म्हणूनच माणसाने माणसाशी माणसासम वागून माणूस या पदासाठी खरे उतरुयात…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

