Skip to content

‘आत्महत्या’ हा खरंच पर्याय असू शकतो का??

आत्महत्या खरच पर्याय असू शकतो??


विद्या जाधेकर


आजकाल आपण टिव्ही, सोशल मीडियावर रोजच आत्महत्येचा बातम्या ऐकतो. मग ते अगदी अभिनय क्षेत्रातील कलाकार असो की अधिकारी असो की शेतकऱ्यांशी संबधीत असो… माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे खूप वेळा हारायला होत… आपल्याला जे पाहीजे ते घडत नाही… स्वतःला प्रुव करु शकत नाहीये याच वाईट वाटत.. त्याच त्याच गोष्टी चा सतत विचार केल्यास आपल आयुष्य खूप unfair या जाणीवेने डिप्रेशन सारख्या समस्यांना सुरुवात होते.

कधी तरी आत्महत्येचा विचारही मनात येऊन जातो. या काळात आपले जवळचे लोक आपल्या आपल्याला विचार करू नका, खचु नका असे सल्ले देत असतात त्यावेळी आपल्याला सगळे कळते पण वळत नाही. आत्महत्या हा एकमेव पर्याय असल्यासारखा आपण विचार करतो. आपल्यातील अनेकांच्या आयुष्यात अशी वेळ केव्हातरी येतेच…

पण आत्महत्या हा खरच पर्याय असू शकतो का???

जर गोष्टी मनासारख्या नाही म्हणून खचून आत्महत्या केल्याने त्या साध्य होतील का?? आयुष्यात खचुन आत्महत्या करण्यापेक्षा त्यावेळेला स्वतःला सावरू शकलो तर कदाचित आपल्या इच्छेपेक्षा जास्तीच आपण साध्य करू शकतो. आत्महत्या करून आपण आपल्या जवळच्या लोकांना निष्कारण दुःख , मनस्ताप देत असतो.

हारून काहीच न मिळवण्यापेक्षा जगुन काहीतरी मिळवण्याची अपेक्षा ठेवणे केव्हाही चांगले.

रस्त्यावर बसलेला भिकारी जर जगू शकतो तर आपणाकडे त्याच्या तुलनेत बरीच कारणे असतात जगण्यासाठी… जगात असे खुप लोक आहेत जे रोज जगण्याची धडपड करत असतात. त्यांच्याकडे पाहून आपल्याला जगण्याची नवी उर्जा मिळेल.

आत्महत्या हा कधीही आयुष्य संपवण्यासाठी चा मार्ग असु शकत नाही… प्रत्येक समस्येला कुठे तरी काही मार्ग आहे हा विचार जगण्याची उमेद देत असतो.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!