Skip to content

वेळ सर्व ठीक करेल….अन तशी वेळ येतेच!

वेळ सर्व ठिक करेल.


विद्या जाधेकर

प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी माणसे भेटत जातात. आणि प्रत्येकाकडून आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकायला मिळतात अनुभव येत असतात त्यात आपला मित्रपरिवार, नातेवाईक, अोळखीचे, अनोळखी लोकही येतात.

चांगले अनुभव आनंद देऊन जातात तर काही वाईट अनुभव खोलवर जखम करून जातात. मग त्यात आपल्या विश्वासाला तडा गेलेला असो किंवा आपल्या प्रामाणिकपणाला खोटे ठरवले जाणे असो कि आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलेला असो. हे अनुभव मनात पोकळी निर्माण करतात त्यातुन डिप्रेशन, अति विचार, सतत स्वत:ला दोष देणे, स्वत:च स्वत:ला कमी लेखणे अश्या अनेक समस्यांची निर्मिती होते.

अतिविचाराच्या सवयीमुळे या सर्वातुन बाहेर पडण्याचे मार्गच दिसत नाही… या सर्वातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आपणच स्वतःला वेळ देण गरजेचं असते.Time heals Everything हे लक्षात ठेवले आणि काही काळ जाऊ दिला तर घडलेल्या गोष्टींचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतात.

एखाद्या गोष्टीसाठी, व्यक्तीसाठी चांगल्या हेतूने खर्च केलेला वेळ आपल्याला चांगल्याच गोष्टी शिकवत असतो. जेव्हा घडलेल्या गोष्टी अनपेक्षित असतात तेव्हा मनात अनेक प्रश्न पडतात आणि आपण सगळीकडे त्या प्रश्नांची उत्तरे शोधत राहतो परंतु Time is solution to every Problem म्हणतात त्याप्रमाणे स्वत:ला किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःला थोडा वेळ दिला. तर पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळू लागतात. या काळात अनेकदा आपल्यातील सुप्त गुणांची आपल्याला माहिती होते आणि जगण्याची नवी दिशा मिळते.

जस जस आपण नकारात्मक गोष्टींना दुर करतो आपोआपच सकारात्मक गोष्टी आपल्याकडे येतात.आपले कर्म चांगले असतील तर त्याचे फळ योग्य वेळ आल्यावर भेटणार आहे. आयुष्यात स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाही न देता प्रत्येक दिवस ,क्षण आनंदाने जगायचे आपणच ठरवले तर आपोआपच जग सुंदर वाटू लागते.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!