Skip to content

मुलं उपदेशाने नव्हे, तर आपल्या वागणुकीतुन शिकतात !

मुलं उपदेशाने नव्हे, तर आपल्या वागणुकीतुन शिकतात !


डॉ.अमित बिडवे

(ऑर्थोपेडिक सर्जन)

काल मी आणि अनुष्का एका घरगुती हॉटेलमध्ये पार्सल आणायला गेलो होतो. बिल 130रु झालं, मी 100च्या दोन नोटा दिल्या, काउंटरवर सुट्टे नव्हते म्हणून तेथील माणसाने नवीन वेटर पोराला ते दोनशे रुपये तसेच देऊन बाहेरून सुट्टे आणायला पाठवलं.आम्ही दोघे हॉटेलच्या दाराशी जाऊन थांबलो.तो पोरगा सुट्टे घेऊन आला आणि दारातच माझ्या हातात पैसे दिले, आणि तो पळत आत गेला.

मी पैसे खिशात टाकताना लक्षात आलं की त्याने गडबडीत मालकाला 100ची नोट आणि मला सुट्टे 70 रुपये देण्याऐवजी मलाच सगळे पैसे दिले होते. क्षणभरच माझ्यातील ‘वाईट माणूस’ जागा झाला होता, पण ‘चांगल्याने’त्याला झोपवलं..

आम्ही आत गेलो,ते सगळे कामाला लागले होते, तेव्हतरी कोणाच्याच ते लक्षात आलं नव्हतं.

मी काय झाले ते सांगितले, तो वेटर मला पाहून काउंटरवर आला होता,मालकाने त्याला हसून झापलं, आम्हाला थँक्स म्हटलं, आणि आम्ही बाहेर पडलो.

“सर, बहोत शुक्रिया, बाद में ध्यान में आता तो मेरे पगारमेसे कट किये रेहते!” पळत पळत मागे आलेला तो वेटर म्हणाला. त्याचा तो तेव्हाचा चेहरा..आनंद, कृतज्ञता, आपुलकी.. असं काय काय दिसलं मला! मी हसलो त्याच्याकडे बघून आणि आम्ही निघालो.

मी लहान होतो तेव्हा, दिवाळीच्या खरेदीमध्ये एक शर्ट बिलात लावायचा राहून गेला होता, कारमध्ये बसल्यावर बिल चेक करताना आईच्या ते लक्षात आलं होतं, पप्पांनी परत गाडी वळवली, आम्ही दुकानात गेलो होतो, मालकाला आश्चर्य,आनंद वाटला होता, त्याने एक छत्री गिफ्ट दिली होती आम्हाला!

काल वाटलं, या मालकाने तसंच एखादा फूड आयटम गिफ्ट द्यायला हवा होता..

पण नंतर वाटलं, अनुष्काने ते सगळं पाहिलं होतं, मी तिला दिवाळीतला तो प्रसंगदेखील सांगितला होता, तिच्या चेहऱ्यावर मला खूप काही दिसलं होतं..

भविष्यात तिला जेव्हा असं काही चुकून मिळालं, तर तिला ते स्वतःहून परत करावं वाटलं पाहिजे..

तेच आपलं गिफ्ट समजायचं..नाही का?


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!