
मनुष्याचे मुळ स्वभाव
एखादी गोष्ट जेव्हा वरचेवर एखाद्याच्या कृतीतून , वागण्यातून दिसते तेव्हा तो मनुष्य तशा स्वभावाचा आहे असंच आपण म्हणतो मग त्यावरून आपण म्हणतो अमुक मनुष्य ( स्त्री किंवा पुरूष ) रागीट स्वभावाचा आहे , अशाप्रकारे कपटी , दुष्ट , स्वार्थी , असे अनेक स्वभावाची माणसे असतात .
अगदी पूर्वंपारपासून अशा स्वभावावरून हा असा आहे तो तसा आहे हे ठरविले जाते.
काही लोकांना आपण दयाळू , मायाळू , प्रेमळ समजूतदार , खेळकर , आनंदी असे संबोधतो तर ते त्या लोकांच्या स्वभावावरून म्हणजे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असते जे त्यांच्या वागण्यातून ,कृतीतून दिसते.
वाईट स्वभावाची माणसे आपल्याला आवडत नाहीत आणि चांगल्या स्वाभावाची माणसे आपल्याला आवडतात त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो .
मग आपण हा विचार केला तर , की जर वाईट स्वभावाची माणसे आपल्याला आवडत नाहीत तर मग आपणच दुष्ट , कपटी , रागीट, किंवा अजून काही वाईट वागलं तर आपल्याला आवडेल का !
काहीवेळा परिस्थितीने सुद्धा मनुष्य वाईट वागतो. जर समोरचा आपल्याशी वाईट वागत असेल तर काहीवेळा जशास तसे उत्तर देण्यासाठीसुद्धा चांगल्या माणसाला मग त्याच्याशी वाईट वागावे लागते. कारण काही वाईट प्रवृत्तीचे लोक चांगल्या मनुष्याचा फायदा घेतात ( तो चांगला आहे ना , तो काही करू शकणार नाही , मग त्याला वाट्टेल तसं वागणूक देणे )
पण हे उत्तर देण्यापुरतच असाव , तसा आपला स्वभाव बनून देऊ नये.
तसेच परिस्थितीने काही लोक हळवे होतात तर काही कठोर होतात .
आपल्याला आपला स्वभाव बदलायचा असेल तर आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावातला चांगला भाग जर आपण आत्मसात केला तर बदल घडू शकतो , तरीही असं म्हणतात मुळ स्वभाव हा डोक वर काढतच असतो पण जाणीवपूर्वक लक्ष दिले , जसे की आपल्याला खूप राग आलाय , तेव्हाच आपण विचार केला पाहिजे की एवढा राग येण्यासारखी ही गोष्ट आहे का? मग आपल्यालाच उत्तर मिळेल , अरे ही तर शुल्लक बाब आहे .
असे करत करत रागावर नियंत्रण येऊ शकेल आणि रागीट स्वभाव कमी होईल.
असे म्हणतात ना मूळ स्वभाव बदलत नाही पण नक्कीच जाणीवपूर्वक ठरवलं तर स्वभाव बदलू शकतो आणि आपण इतरांना हवेहवेसे वाटू लागतो. आपण इतरांना आनंद देऊ शकतो…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

