Skip to content

आपल्यावर परिस्थिती हावी होते की मनस्थिती??

आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती?


सौ.वैष्णवी व कळसे


जी परिस्थिती आपण नाही घडवून आणली….. तिथे आपली मनस्थिती का खराब होते? हा प्रश्न देतो ना ताण आपल्याला?

आपल्याकडून झालेली चूक नाही,
न पटणारी आपली वागणूक नाही,
कोणाच्या अधात नाही , कोणाच्या मधात नाही, कोणाच्या घरात नाही कोणाच्या दारात नाही….
कोणाचं घेणं नाही, कोणाला देणं नाही… कोणाला उगीच बोलणं नको, कोणाचं रिकामं ऐकणं नको…. कोणाचे कुटाने नको, फुकटचे फुटाणे नको, नेहमी कामाशी काम, कोणी दिसल्यावरच रामराम…***

मग सर्व एवढं नीट वागत असूनही का परिस्थिती मनासारखी नसेल बर? आपण जास्त विचार करतोय का? कदाचित जी परिस्थिती आपल्या हातात नाही, ती हातात घेण्याचा प्रयत्न करतोय… म्हणून होतं बहुतेक असं….

दुसऱ्यांच्या चुका आपण नाही सुधारू शकत, आपण फक्त त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो….

दुसऱ्यांची वागण्याची पद्धत नाही बदलवू शकत पण स्वतःला फरक ना पडू देण्याचे प्रयत्न करू शकतो आपण..

चूक सुधारावी म्हणून आग्रह करू शकतो, जबरदस्ती नाही…
आग्रह आणि जबरदस्ती मध्ये मोठा फरक…
Request करून ही गोष्ट करावी ही अपेक्षा करणं म्हणजे आग्रह
Order देऊन हे करावंच लागेल हे गृहीत धरून force करणं म्हणजे जबरदस्ती,
कोणाच्या वागण्यावर आपण कंट्रोल नाही ठेऊ शकत पण स्वतःच्या अपेक्षांवर ठेवू शकतो…..

मग कोणाच्या चुकीमुळे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ही गोष्ट अशीच आहे, हे स्वतःला पटवून द्यावं….
त्या गोष्टीच्या मागे लागून ती होणारी नाहीये, मात्र सोडून दिली तर नक्कीच होऊ शकते….

जसं की आपल्याला कोणी उगीच काही बोलून गेलं असेल तर त्याचा राग तिथे काढू शकत नसल्यानमुळे, बाकी सर्व गोष्टींवर काढायला लागतो… कधी जेवणावर काढतो,

कधी जे ऐकून घेतात त्यांच्यावर किंवा जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यावर, कधी हाताखालच्या लोकांवर… या बिचाऱ्यांची एवढीच चूक की ते अशा वेळेस आपल्या समोर आलेत… मग आपण पूर्ण दिवस एकतर विचार करण्यात घालवायचा नाहीतर चिडचिड करण्यात… अशा लोकांमुळे नाराज होऊन बाकी जवळच्या लोंकाना नाराज करतो… एवढं करून जो बोलून गेलाय त्याला भनक पण नसते आपण दुखावलोय याची… कधी ते ही दाखवायला गेलो तर समोरच्याला किती जगाचं टेन्शन आहे ते दाखवण्यात लागून जातात…

कधीकधी आपण एकाच गोष्टीमध्ये अडकून बसतो आणि बाकी भरपूर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो…. काही फालतू गोष्टी नीट करायच्या नादात सुंदर गोष्टींना वेळ देऊ शकत नाही….

कुठल्या गोष्टीत डोकं अडकलं की गप्पांमध्ये मन रमत नाही, कोणी आपल्याशी काही बोलत असेल तर तिथे लक्ष नाही, ताट वाढून दिसलं तरी घास घ्यावा वाटत नाही… बर चला हे सर्व ठेवुया बाजूला….

आता ज्यामुळे हे सर्व आपण करतोय तिथे काहीतरी बदल येतोय का? नाही ना? आपण कोणासाठी काहीही केलं तरीही शेवटी कदर असते का? नाही ना? उलट “तुला कोणी सांगितलं हे करायला?” म्हणून मोकळे होतील समोरचे…

त्यापेक्षा कोणाला काय करायचं ते करू द्यावे आणि आपण आपलं मन जपावे…. आपल्याला काय आवडतं ते करावे आणि स्वतःकडे थोडं लक्ष द्यावे….

आपल्या काही सवयी…

हसून बोललं कोणी की खुश आपण…?, चिडून बोललं कोणी की उदास आपण…..?, रडून बोललं कोणी की दुःखी आपण….?, जोश मध्ये बोललं कोणी की उत्साहात आपण…?, कोणी रिस्पेक्ट दिली की स्वतःच्या नजरेत मोठं आपण…?, disrespect केल की स्वतःच्या नजरेत छोटं आपण…..?,

काय फालतूपणा आहे हा….? दुसऱ्याचं वागणं बोलणं ठरवेल का की आपण खुश राहायचं की दुःखी….. आपली ख़ुशी डिपेंड आहे का कोणाच्या कौतुकावर? की कोणी कौतुक करेल मग मी आनंदी होणार? का असं?

शेवटी काय आपण कितीही आनंद दिला तरी return gift opposite च मिळतं…

शेवटी हे शब्दांचे घाव कधी भरतच नाही…
कितीही काळ गेला तरी विसरल्या जातच नाही…
बोलणारा विसरून जातो, ऐकणाऱ्याला लक्षात राहतं….
बोलणाऱ्या साठी incident असतो, ऐकणाऱ्या साठी accident बनतो….

ऐकणारा म्हणतो आज नाही, पण बोलणाऱ्याला लाज नाही…..
ऐकणाऱ्याला शक्तीच उरली नाही, पण बोलणार्यांची अजून खाजचं मुरली नाही….

बोलणार्यांची भाषा घाण, ऐकणाऱ्याला येतो ताण….
बोलणाऱ्याला कान नाही, पण ऐकणाऱ्याचा मान नाही….

या सर्व प्रकारच्या परिस्थितींवर उपाय आणि काही टिप्स पुढच्या पोस्ट मध्ये….



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!