Skip to content

आपण प्रेमात का पडतो? पडल्यावर नेमकं काय घडतं??

आपण प्रेमात का पडतो? पडल्यावर नेमकं काय होतं?


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


प्रेम ही एक अत्यंत संवेदनशील अशा स्वरूपाची एक अंतर्गत भावना आहे. आजकाल पाहीलं गेलं तर कोणीही व्यक्ती सहज कोणाच्याही प्रेमात पडू शकतं, असं वातावरण हल्ली खूप वाढतंय, याचा मोठा पगडा आपल्या मनावर या चित्रपट सृष्टीचा आहे असं प्रकर्षाने वाटतं.

याचा उलगडा करायचा झाला तर आपल्याला जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण येते त्यावेळी राधा-कृष्ण, रोमिओ-जुलियट, शाहजहान-मुमताज यांच्या जुनाट गोष्टी आठवण्याच्या फंदात आपण पडत नाही किंवा त्यांचे चेहरे सुद्धा डोळ्यासमोर आणत नाही, तर ‘मुस्कुराने की वजह तुम हो’, मेरे रशके कमर’, मन धागा-धागा जोडते नवा, जीव रंगला-गुंगला इ अशी गाणी पटकन मनात डिस्को डान्स करतात.

म्हणजेच या चित्रपटसृष्टीतील प्रवाहाचा मोठा पगडा आपल्या प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेवर पडतो आहे. मग याला खरं प्रेम म्हणावं की नाही, हा प्रश्न नसून या प्रवाहामुळे प्रेम व्यक्त करण्याच्या व्याख्या बदलत आहेत आणि पुढेही बदलणार ही वस्तुस्थिती आहे.

आजच्या तरुण-तरुणींनी हीच वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. कारण लहानपणापासून आपल्याला प्रेम म्हणजे काय ? याच समाधान देणारं उत्तर कोणीही देत नाही, तो आपणच आपला शोधतो आणि त्या शोधण्यावर चित्रपट, गाणी, सिरियल्स, मिडिया हे महत्वाची भूमिका बजावतात. पुष्कळ वेळा या सर्व माध्यमांमार्फत पब्लिकला आकर्षित करण्यासाठी भावनांची अतिशयोक्ती केली जाते आणि त्यामार्फत आपल्या दबलेल्या भावना जागृत झाल्यामुळे सारा-सार विचार करण्याची क्षमता आपण हरवून बसतो, मग तो प्रवाह जाईल त्या दिशेने जाण्याची आपण तयारी दर्शवतो.

आणि ज्यावेळी खऱ्याखुऱ्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडतात तेव्हा गोंधळून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात, म्हणजेच फिल्मी विश्वात पाहिलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्षात असणाऱ्या जबाबदाऱ्या यांमधली दरी त्यावेळी प्रकर्षाने लक्षात येते, (ज्यांच्या लक्षात येत नाही, ते पुन्हा दुसरी ट्रेन, बस पकडायला सज्ज होतात किंवा ज्या व्यक्ती याचा नकारार्थी विचार करतात त्यांच्यासाठी ‘जग सुना सुना लागे’, ‘अच्छा चलता हू दुवा मे याद रखना’ या गाण्यांची सोय केलेलीच आहे)

यामार्फत आपल्याला एवढाच संदेश द्यायचा आहे की कोणी प्रेम कसे करावे आणि कोणावर करावे हा ज्याचा-त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या वस्तुस्थितीवर आपल्याला प्रेम झाल्यास आपण लांबचा प्रवास आनंदाने गाठु.

तेही मनापासून.

नाहीतर चिंता, दुःख, नैराश्य यांना आमंत्रणच आहे !



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!