Skip to content

खऱ्या नात्यांना शब्दांच बंधन नसतं!

खऱ्या नात्यांना शब्दांच बंधन नसतं


श्रीकांत मेहरे


काही व्यक्तींशी बोलण्याचा मोह झाला ना, की तो नाहीच आवरता येत मनाला. कारण ते आपल्या हातात नसतंच ना… एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचे विचार आपसूकच आपल्याला भावतात. आपल्या मनाची तार छेडतात. अन मग आपल्याही नकळत ती व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटायला लागते.

एकमेकांना समजण्यासाठी संवादाची खुप मदत होते. कोणत्याही नात्यांमध्ये संवाद होत नसेल तर गैरसमज आणि शंकेचा मळभ वाढत जातो. ज्याप्रमाणे एखादी पारदर्शक काच गरम वाफेणे धूसर होत जाते. त्याचप्रमाणे सुदृढ नात्याची रेषा अंधुक होत जाते. आणि मग तिथेच नात्यांचा अंत होतो.

काही नात्यामध्यें मन जुळायला शब्दांची ही गरज भासत नाही. तसा शब्दाविनाही त्यांच्यात संवाद होत असतो. अशा व्यक्तींना जाणून घेण अगदी सोपं असतं. त्यांचा चेहराच त्यांचा आरसा असतो. फक्त त्या आरशात आपल्याला हळुवार डोकावून बघता यायला हवं. प्रत्येकाचे डोळे हे बोलत असतात. फक्त त्यांच्या डोळ्यात बघून शब्दांचे मोती वेचता यायला हवेत. तेंव्हाच शरीरा पलीकडल सौंदर्य दिसायला लागत.

मग त्यांच्या अस्तित्वाच प्रतिबिंब तुमच्या मनाच्या पटलावर परावर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यातूनच उलगडून येतील त्यांच्या स्वभावाचे रंगीबेरंगी पैलू… कुणाचा शांत, सात्विक आणि निरागसपणा… तर कुणाचा आत्मकेंद्री, अहंकार आणि स्वार्थीपणा. मग यापैकी काय निवडायचं आणि कुणाला स्वीकारायचं.

ते मात्र आपल्या हातात असतं.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!