Skip to content

दैनंदिन व्यवहारात मानसशास्त्राचा काय उपयोग??

मानसशास्त्र आणि दैनंदिन व्यवहार


श्रीकांत कुलांगे
9890420209

वेबसाईट


दैनंदिन व्यवहारात मानसशास्त्राचा उपयोग काय? काल एका मित्राने प्रश्न केला. वास्तविक मानसशास्त्र फक्त विद्यार्थी, थेरपिस्ट किंवा समुपदेशक यांच्या पुरतं मर्यादित नाही. रोजच्या व्यवहारात ठराविक गोष्टी आपल्याला जाणवत असतात त्या म्हणजे,

१. निद्रानाश.
२. नैराश्य, चिंता, भीती, डिप्रेशन, उदासीनता.
३. वैचारिक अपरिपक्वता.
४. भावनिक असंतुलन.
५. नकारात्मकता.
६. निर्णय क्षमताची कमी.
७. शारीरिक व्याधी ज्या मानसिक रोगामुळे होतात.

आपले रोजचे जीवन हे थोडेफार प्रमाणात या अवस्थेतून जात असते. मग मानसशास्त्राचा वापर आपण आपले मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी होतो. रोज आपण मानसशास्त्राचा करतो ते पाहिले तर समजेल की याचा उपयोग खरंच चांगला आहे.

१. प्रेरणा मिळणे – कुठलेही ध्येय साध्य करण्यासाठी मोटिव्हेशन लागते, ते आपल्याला मानसिक विचारातून मिळते.

२. आपले नेतृत्व कौशल्य सुधारते. नेतृत्वाचे गुण तयार होण्यासाठी लागणारे कौशल्याचा विकास होतो.

३. उत्तम वक्ता आणि विचारांची देवणघेवाण करण्याची पद्धती सुधारणे. देहबोलीतून बदल दिसतो.

४. योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता तयार होणे.

५. आपली मेमरी(स्मृती) शाबूत ठेवण्यास मदत.

६. आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यास मदत होते. पुढील येणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन कार्य करता येते.

७. अभ्यासामध्ये चांगलं प्रदर्शन करता येते. जेंव्हा आपल्या समोर असणाऱ्या समस्या व्यवस्थित सोडवतो तेंव्हा मनाची एकाग्रता वाढते.

८. आत्मविश्वास वाढतो. लक्ष विचलित होऊ देत नाहीत. हातात घेतलेले काम एकाग्रतेने केले जाते.

९. मानसिक व शारिरीक स्वास्थ्य उत्तम राहते.

जेंव्हा मित्राला या गोष्टी समजून सांगितल्या तेंव्हा त्याला आश्चर्य वाटले की खरंच दैनंदिन व्यवहारात आपण मानसशास्त्राच्या उपयोगाने किती सुंदर जीवन जगू शकतो. नेहमीची कामे, पण कळत नकळत आपल्या चांगल्या सवयी आपल्याला मानसिक आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात. तर चला मग, चांगल्या सवयी आपण ज्या विसरलो आहोत, त्यांना पुन्हा वापरून बघुया.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!