Skip to content

एखाद्याचा सहवास आपल्यासाठी किती महत्वाचा असतो, बघा!

सहवास


सौ राजश्री भावार्थी
पुणे


सहवास या शब्दातच प्रेमाची , मायेची इतकी जादू आहे की त्यावर खुप काही मते मांडण्यासाठी आपली लेखणी उचलावी लागेल ….!
म्हटले तर मला निसर्गाच्या , बालगोपाळ अगदी कुत्र्यांच्या सहवास ही खूप आवडतो . कुत्रा या प्राण्याला एकदा माया , प्रेम दिले तर तो आयुष्यभर त्या मालकाशी इमानाने राहतो . तसेच आपल्या मैत्रीबाबत असते ….इथे एखाद्या विवाहित , घटस्फोटिता याना मैत्रीच्या सहवासात रमायला आवडते का ? तसेच चाळीशी पार केलेल्या स्त्री , पुरुषांची मैत्री कशी असावी ? असा प्रश्न उपस्थित केला आहे

….तर माणसाला स्वतःचा मन नावाचा कोरा आरसा असतो त्याच्या अंतरंगात डोकावून पाहिले तर नक्कीच स्वतःला काय हवे नको ते कळते ….स्त्री असो वा पुरुष त्यांच्या शारीरिक पेक्षा मानसिक गरजा जास्त असतात . समाजात आज काही कारणाने एकाकी पडलेल्याना आधार , सांत्वन याची गरज जास्त असते ……प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसलेले असतात ….राहता राहिला प्रश्न एखाद्या चाळीशी पार केलेल्या स्त्री , पुरुषांची तिच्या किंवा त्यांच्याबाबतीत असलेले नाते !! …..

नवरा किंवा पत्नी सोबत आपण फिरलो तर समाज त्याची दखल घेत नाही का तर त्यांच्या नात्याला एक विशिष्ट ‘लग्न’ रुपी लेबल असते …पण जर का हेच मित्र – मैत्रिणी ….पूर्वपार असलेल्या मैत्रीबाबत थोडे मोकळे वागले तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ……!

समाज म्हणजे काय हो !! आपणच ना ! !

….तर त्या साठी आपण बदलायला हवे !! समोरच्याशी , ओळखीच्या नात्यातील मैत्रीकडे आपण निर्लेपपणे पाहिले पाहिजे …!!

आज स्त्री चा ऑफीशियल कामानिमित्त अनेकांचा परिचय होतो .वेगवेगळ्या मिटिंग , काँफरन्स निमित्ताने ती आपल्या सहकाऱ्याबरोबर बाहेर जाते …त्या वेळेस तिच्या घरचे तिच्या सोबत नसतात ….तर सोबत असते मैत्रीच्या नात्याची !! एक जबाबदारी ती यशस्वीपणे पार पाडत असते . आलेल्या संकटावर मात करून , वेळप्रसंगी समाजाचे टक्के टोणपे सहन करून पुढे जात असते ….अगदी पूर्वपारपासून त्या वेळेस सावित्रीबाई फुले यांना देखील शिक्षणाचा प्रसार करताना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले . तर समाज काय म्हणेल हा प्रश्न दुय्यम मानून आपल्याला काय योग्य वाटते ह्यावर फोकस ठेवा !!

….माणसाला एकदा का संशयाने पिछाडले की त्याची विचार करण्याची , पाहण्याची दृष्टी ही तशीच राहते…..!

काहीवेळा पार्टनर पुढे रोजची कटकट , किरकिर करण्यापेक्षा मैत्रीत ती बोलून दाखवली तर हा तिढा सुटायला मदत होते

मैत्रीचा आश्वासक शब्द खूप काही आधार देऊन जातो .
चाळीशी नंतर खेळासारखे नवा गडी , नवे राज्य ..!

मोठ्या उमेदीने जगावेसे वाटते ह्याचे कारण संसारात आपण बऱ्यापैकी सेटल झालेले असतो

…..मुले मोठी होऊन त्यांच्या करिअर च्या कक्षा रुंदावतात …..
आकाशात फिनिक्स भरारी घ्यायला ते सज्ज असतात …!!
सहवासाची मैत्री जरूर असावी पण स्वतःची स्पेस राखून
…..कारण काचेला तडा गेल्यावर ती तडकते …..तसेच मैत्री बाबत असते …

आणि मुख्य म्हणजे आपले घरटे , नाती विसकटू नये यासाठी दक्ष असावे लागते , तरच नात्याची , मैत्रीची घडी सुंदर घातली जाते .

थोडक्यात …

कालच वाचलेली सुंदर वाक्ये ……!!

परमेश्वराने मैत्रीचा सुंदर , कोमल गजरा गुंफला आहे ….!!
कोणी हातात बांधला . तर कोणी केसात माळला आहे
…..कोणी त्यातील फुले अजूनही पुस्तकात ठेवली आहेत . पण राहिला तो सदैव त्याच्याजवळ …!!

ज्यांनी ….त्याचा सुगंध मनात जपला आहे !! ??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!